Irrigation in Bitter Gourd

कारल्यासाठी सिंचन व्यवस्थापन

  • कारल्याचे पीक दुष्काळी आणि अतिरिक्त पाणी असलेल्या भागासाठी सहनशील नसते.
  • रोपण किंवा पेरणीनंतर लगेचच सिंचन करावे. त्यानंतर तिसर्‍या दिवशी आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा जमिनीतील ओलीनुसार सिंचन करावे.
  • जमिनीच्या वरील भागात (50 सेमी. पर्यन्त) ओल टिकवून धरावी. या भागात अधिक संख्येने मुळे असतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Coriander

कोथिंबीरीच्या शेतातील सिंचन:-

पेरणीनंतर लगेचच पहिले सिंचन करावे आणि दुसरे सिंचन त्यानंतर तीन दिवसांनी करावे. त्यानंतर दर 7-10 दिवसांनी पाणी सोडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Moong (Green Gram)

मुगाच्या शेतातील सिंचन:- मूग हे पीक मुख्यत्वे खरीपाचे पीक म्हणून घेतले जाते.  पाऊसपाण्याच्या परिस्थितीनुसार सिंचनाची आवश्यकता असते. उन्हाळ्यातील पिकासाठी मातीचा प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार तीन ते पाच वेळा सिंचनाची आवश्यकता असते. चांगल्या उत्पादनासाठी पेरणीनंतर 55 दिवसांनी सिंचन थांबवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation Water quality

उत्पादन आणि पिकाची मात्रा, मातीची उत्पादकता यांना राखण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सिंचनासाठी वापर केले जाणार्‍या पाण्याची गुणवत्ता उत्तम असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, माती, पूर्वीचे भौतिक आणि यांत्रिक गुण, मातीची संरचना (समुच्चयाची स्थिरता) आणि पारगम्यता सिंचनासाठी वापरलेल्या विनिमय आयनांच्या प्रकारास खूप संवेदनशील असते. रासायनिक प्रयोगशाळेतील तपासणीद्वारे सिंचांनाच्या गुणवत्तेचे सर्वात चांगले निर्धारण केले जाऊ शकते. शेतीत पाण्याच्या वापराची उपयुक्तता निर्धारित करण्यासाठी पुढील घटक सर्वात महत्वपूर्ण असतात:-

– पीएच मान

– लवणीयतेचा स्तर

– सोडियमचा स्तर (सोडियम अवशोषणाचे प्रमाण)

– कार्बोनेट आणि बायकार्बोनेट कॅल्शियम आणि मॅग्नीशियम अवयवाच्या संबंधी

– अन्य ट्रेस तत्व

– विषारी आयन

– पोषक तत्वे

– मुक्त क्लोरीन

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in Onion

कांद्याच्या पिकाची पाण्याची आवश्यकता ऋतु, मातीचा प्रकार, सिंचनाची पद्धत आणि पिकाचे वय यावर अवलंबून असते. सामान्यता पेरणीच्या वेळी, पेरणीनंतर तीन दिवसांनी पाणी देण्याची गरज असते आणि त्यानंतर मातीतील ओलीनुसार 7-10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. खरीप पिकाला सामान्यता 5-8 वेळा पाण्याची गरज असते. उशिरा केलेल्या खरीप लागवडीला 10-12 वेळा पाणी द्यावे लागते. रब्बीच्या पिकाला 12-15 वेळा पाणी द्यावे लागते. कांद्याच्या पिकाची मुळे उथळ असल्याने चांगली वाढ आणि कंदाच्या विकासासाठी जमिनीत आवश्यक ती ओल टिकवण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी देणे आवश्यक असते. पीक तयार झाल्यावर (काढणीच्या 10-15 दिवस आधी) आणि रोपे मान टाकू लागल्यावर पाण्याला ताण दिल्यास साठवणुकीच्या काळात कुजणे कमी होण्यास मदत होते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Management of Irrigation in Garlic

लसूण पिकासाठी पाणी व्यवस्थापन:-

पेरणीनंतर पहिल्यांदा पाणी द्यावे.

कोंब फुटल्यावर तीन दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे.

त्यानंतर 10-15 दिवसांतून पाणी द्यावे.

उन्हाळ्यात 5-7 दिवसातून पाणी द्यावे.

गड्डे तयार झाल्यावर पाण्याला ताण द्यावा.

एकूण 15 वेळा पाणी देण्याची आवश्यकता असते.

पीक पक्व होताना जमीनीत दमटपणा कमी असू नये अन्यथा गड्ड्याच्या विकासावर विपरीत परिणाम होतो.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Irrigation in Gram

हरबर्‍यासाठी पाणी:-

हरबर्‍याच्या पिकाला फार पाणी देण्याची आवश्यकता नसते.

फांदया फुटण्याच्या वेळी (फुलोरा येण्यापूर्वी) दोन वेळा आणि फळे धरण्याच्या वेळी पाणी देण्याने काही भागात चांगले उत्पादन मिळाले आहे. परंतु फांदया फुटण्याच्या वेळी (फुलोरा येण्यापूर्वी) एकदा पाणी दिल्याने उत्पादनात अपेक्षित वाढ होते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share