भेंडीच्या पिकासाठी सिंचन

भेंडीच्या पिकासाठी सिंचन:-

  • पहिले सिंचन पाने फुटण्याच्या वेळी करावे.
  • उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • तापमान 400C असल्यास थोडे थोडे सिंचन करत राहावे. त्यामुळे मातीतील ओल टिकून राहील आणि उत्तम फलधारणा होईल.
  • पाणी साचणे किंवा रोपे सुकवणे टाळावे.
  • ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) पद्धतीने 85% पर्यन्त पाणी वाचवता येते.
  • फल/बीजधारणा होताना दुष्काळी परिस्थिति असल्यास पिकाची 70% पर्यन्त हानी होते.

नीचे दिए गए बटन पर क्लिक करके अन्य किसानों के साथ साझा करें।

Share

The critical stage of irrigation in Potato

  • बटाट्याच्या पिकासाठी संपूर्ण हंगाम जास्तीतजास्त ओल राखण्यासाठी उच्च दर्जाचे सिंचन व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये सिंचन व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते:
  • 1) फुटवे येण्याची अवस्था
  • 2) कंद स्थापित होण्याची अवस्था
  • 3) कंद भरण्याची अवस्था
  • 4) पिकाची अंतिम अवस्था
  • 5) काढणीपूर्व सिंचन अवस्था

Share

Requirement of Irrigation in Pea

  • योग्य प्रकारे अंकुरण होण्यासाठी जमीन कोरडी असल्यास पेरणीपूर्वी सिंचन करणे आवश्यक असते. 
  • सामान्यता हंगामाच्या मध्यकाळात किंवा उशिरा लागवड केलेल्या मटार पिकास 2-3 वेळा सिंचन करणे आवश्यक असते.
  • फुलोरा येण्याच्या वेळी आणि शेंगात दाणे भरण्याच्या वेळी मातीत ओल असू नये. त्याने शेंगांच्या उत्पादन आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.

Share

Irrigation management on garlic

  • पेरणीनंतर लगेचच पहिले सिंचन करावे. 
  • त्यानंतर तीन दिवसांनी अंकुरण उत्तम होण्यासाठी पुन्हा सिंचन करावे.
  • आवश्यकतेनुसार सिंचन करावे. 
  • रोपांच्या वाढीच्या काळात आठवड्यातून एकदा तर कंद वाढीच्या काळात 10-15 दिवसातून एकदा सिंचन करावे.
  • कंद परिपक्व होण्याच्या वेळी सिंचन करणे टाळणे. काढणी करण्यापूर्वी 2-3 दिवस रोपे उपटण्यास सोपे जावे यासाठी सिंचन करावे.

Share

Critical stage of irrigation in Potato

बटाट्याच्या सिंचनातील क्रांतिकारक अवस्था

  • बटाट्याच्या पिकासाठी हंगामाच्या दरम्यान मातीत उच्चतम ओलावा राखण्यासाठी उच्च स्तरीय व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन खूप महत्वाचे असते –
  • 1). अंकुरण अवस्था
  • 2). कंद निर्माण होण्याची अवस्था
  • 3). कंद वाढण्याची अवस्था
  • 4). पिकाची अंतिम अवस्था
  • 5). खोदाईपूर्वी

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in muskmelon

खरबूजात सिंचनाची आवश्यकता

  • उन्हाळ्यात दर आठवड्याला सिंचन करावे.
  • सिंचन हलके असावे.
  • फळे परिपक्व होण्याच्या वेळी अत्यावश्यक असेल तरच सिंचन करावे.
  • सिंचन करताना फळ जास्त वेळ ओलीत राहणार नाही अशी खबरदारी घ्यावी. जास्त वेळ ओलीत फळे राहिल्याने ती कुजतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in cowpea

चवळीच्या पिकातील सिंचन व्यवस्थापन

  • चवळीत पाणी तुंबल्याने भारी हानी होते. या पिकाला इतर भाज्यांच्या तुलनेत कमी पाणी लागते.
  • दाणे उत्पादित करणार्‍या वाणांसाठी फुले आणि शेंगा लागण्याच्या वेळी 2-3 वेळा सिंचन करावे.
  • भाजीच्या उत्पादनासाठीच्या वाणांसाठी सुळे आणि शेंगा लागण्याच्या वेळी 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी सिंचन रोखावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation schedule in makkhan grass

चार्‍यासाठी मक्खन घास गवताच्या पिकाचे सिंचन

  • पहिले सिंचन पेरणीनंतर लगेचच करावे आणि दिसरे सिंचन पेरणीनंतर 5 ते 6 दिवसांनी करावे.
  • त्यानंतर दर 10 दिवसांनी किंवा आवश्यकतेनुसार सिंचन करावे.
  • पहिल्या सिंचंनानंतर 40 किग्रॅ/एकर युरियाची मात्रा द्यावी आणि त्यानंतर हाताने निंदणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation scheduling in Brinjal

वांग्याच्या पिकासाठी सिंचनाचे नियोजन

  • रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच फुले आणि फळांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी वेळेवर सिंचन करणे आवश्यक असते.
  • हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने हलके सिंचन करावे तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • थंडीत हलके सिंचन करून थंडीने होणारी हानी नियंत्रित करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Bottle gourd

दुधी भोपळ्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन

  • बियाणे पेरण्यापूर्वी शेतात पहिले सिंचन करावे आणि त्यानंतर एका आठवड्याने पुन्हा सिंचन करावे.
  • फेब्रुवारी – मार्च महिन्यात पेरलेल्या पिकस पेरणीनंतर 2-3 दिवसांनी पहिले सिंचन करावे.
  • त्यानंतर 7-8 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.

ठिबक सिंचन

  • ठिबक सिंचन यंत्रणा बसवून मुख्य आणि उपमुख्य नळ्यांना एकमेकांपासुन 1.5 मीटर अंतरावर ठेवावे. क्रमशः 4 लीटर प्रति तास आणि 3.5 लीटर प्रति तास क्षमतेचे ड्रिपर्स एकमेकांपासुन 60 सेमी आणि 50 सेमी अंतरावर बसवावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share