द्विदल धान्यांच्या पिकावरील केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस)
केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस):- केवडा रोगाचा (पिवळा मोझेक व्हायरस) उपद्रव मुख्यत्वे खरीपाच्या हंगामात सोयाबीन, उडीद, मूग आणि इतर काही पिकांमध्ये होतो. सोयाबीन, उडीद इत्यादि पिकांची केवडा रोगामुळे मोठी हानी होते. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा रोग 4-5 दिवसात शेतात सर्वत्र पसरतो आणि पीक पिवळे पडू लागते. या रोगाच्या प्रसारात पांढर्या माशीचा महत्वाचा सहभाग असतो.
रोग पसरण्याची मुख्य कारणे:-
- रस शोषणारी कीड आणि पांढरी माशी या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करते.
- योग्य ते बीजसंस्करण न करणे, माहितीचा अभाव आणि दीर्घकाळ पडलेला दुष्काळ हे घटक देखील विषाणूच्या प्रसारास जबाबदार असतात.
- कीटकनाशकांचा अतिवापर, योग्य माहिती नसताना औषधांचे मिश्रण फवारणे.
- योग्य ते पीक चक्र स्वीकारण्यातील शेतकर्यांचे अपयश याचे मुख्य कारण असते.
- शेताभोवतीच्या बांधांची साफसफाई न करण्याने देखील रोगाचा फैलाव होतो.
- पांढरी माशी रोपच्या पानावर बसून रस शोषते आणि तेथेच लाळ गाळते. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढतो.
रोगाची लक्षणे:-
- सुरुवातीच्या काळात गडद पिवळे दाग दिसू लागतात.
- रोगग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
- रोगग्रस्त रोपांच्या पानांमधील शिरा स्पष्ट दिसू लागतात.
- रोपांची पाने खरखरीत होतात.
- ग्रस्त रोप खुरटते.
प्रतिबंधाचे उपाय :-
यांत्रिक पद्धती:-
- सुरुवातीलाच ओगग्रस्त रोपांना उपटून जाळून टाकावे.
- शेतातील पांढर्या माशीला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक हेक्टरात 5-6 पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
- पिकाच्या चहुबाजूला झेंडूची लागवड करून सापळा रचावा.
जैविक पद्धत:-
- सुरुवात होताच रोपांवर प्रत्येक हेक्टरसाठी 1-1.5 ली.निंबोणीचे तेल+चिकट पदार्थ+200-250 ली. पाण्याच्या मिश्रणाच्या मात्रेची फवारणी करावी.
- 2 किलो शेवग्याची पाने बारीक वाटून 5 ली. गोमूत्र आणि 5 ली. पाण्यात मिसळून ठेवावे. 5 दिवसांनी हे मिश्रण गाळून घ्यावे. 500 मिलीलीटर मिश्रण 15 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. हे पिकासाठी टॉनिक म्हणून कार्य करते.
रासायनिक पद्धत:-
- डायमिथिएट 250-300 मिलीलीटर किंवा थायोमेथाक्सोम 25WP 40 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 40 मिलीलीटर किंवा अॅसिटामाप्रीड 40 ग्रॅम प्रति एकर 200-250 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share