मुगाच्या पिकासाठी जमिनीची मशागत
- खरीपाच्या पिकासाठी पलटी नांगराने एकदा खोल नांगरणी करावी. पाऊस सुरू होताच 2-3 वेळा देशी नांगराने किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून शेत तणमुक्त करावे आणि वखर वापरुन सपाट करावे.
- वाळवीपासून बचाव करण्यासाठी क्लोरपायरीफॉस 1.5 % डी.पी. चूर्ण 10-15 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात मशागत करताना मातीत मिसळावे.
- मुगाच्या उन्हाळी शेतीत रब्बी पिकाच्या कापणीनंतर लगेचच शेतात नांगरणी करून 4-5 दिवसांनंतर वेचणी करावी.
- वेचणीनंतर 2-3 वेळा देशी नांगर किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून आणि वखर चालवून शेताला सपाट आणि मातीला भुसभुशीत करावे. त्यामुळे त्यातील ओल संरक्षित होईल आणि चांगले बीज अंकुरण होईल.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share