Control of White fly in Green Gram

मुगातील पांढर्‍या माशीचे नियंत्रण

मुगातील पांढर्‍या माशीचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील भागातून रस शोषतात आणि चिकट द्राव सोडून प्रकाश संश्लेषणात अडथळा आणतात.
  • पाने रोगग्रस्त दिसतात, सुटी मोल्डने झाकली जाते. ही कीड पिवळा शिरांचे मोज़ेक विषाणू आणि पान मुरड रोगाची वाहक असते.
  • नियंत्रण:- पिवळ्या रंगाचे चिकट कागद शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • डायमिथोएट 30 मिली./पम्प किंवा थायमेथोक्जोम 5 ग्रॅम/पम्प किंवा एसीटामीप्रिड 15 ग्रॅम/ पम्प ची फवारणी 10 दिवसांच्या अंतराने 4-5 वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Moong (Green Gram)

मुगाच्या शेतातील सिंचन:- मूग हे पीक मुख्यत्वे खरीपाचे पीक म्हणून घेतले जाते.  पाऊसपाण्याच्या परिस्थितीनुसार सिंचनाची आवश्यकता असते. उन्हाळ्यातील पिकासाठी मातीचा प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार तीन ते पाच वेळा सिंचनाची आवश्यकता असते. चांगल्या उत्पादनासाठी पेरणीनंतर 55 दिवसांनी सिंचन थांबवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Some Information of Moong Cultivation

मूग हे भारतातील प्रमुख द्विदल धान्य आहे. मूग हा फायबर आणि लोहासह प्रोटीनचाही समृद्ध स्रोत आहे. त्याची लागवड खरीपाच्या हंगामात तसेच उन्हाळ्यात करता येते. त्याची शेती वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत केली जाते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम ते रेताड लोम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत हे पीक घेता येते. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम आणि रेताड लोम माती त्यासाठी उत्तम असते. क्षारयुक्त आणि ओल धरून ठेवणारी जमीन त्यासाठी उपयुक्त नाही.

पेरणीची वेळ:- खरीपाच्या पेरणीसाठी जुलैचा पहिला पंधरवडा ही उत्तम वेळ असते. उन्हाळी शेतीसाठी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून एप्रिलपर्यंत पेरणीस अनुकूल वेळ असते.

ओळींमधील अंतर:-  खरीपाची पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 सेमी तर दोन रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर असावे. उन्हाळी पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 22.5 सेमी आणि दोन रोपांमधील अंतर 7 सेंटीमीटर असावे.

पेरणीची खोली:- बियाणे 4-6 सेमी एवढ्या खोलीवर पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share