Management of Anthracnose in Frenchbean

फरसबी मधील अँथ्रॅकोनोस जिवाणूजन्य रोगाचा (श्यामवर्ण रोग) प्रतिबंध

लक्षणे:-

  • फरसबीची पाने, खोडे आणि शेंगांवर या रोगाची लागण झाल्याचा परिणाम होतो.
  • शेंगांवर छोटे-छोटे लाल करड्या रंगाचे डाग पडतात आणि झपाट्याने वाढतात.
  • दमट हवामानात या डागांवर गुलाबी रंगाचे जिवाणू वाढतात.
  • पानांवर आणि खोडावरदेखील काळे ओलसर खड्डे पडतात.
  • पानाच्या शिरांवर देखील लागण होऊन त्या काळ्या पडतात.

प्रतिबंध:-

  • रोगमुक्त प्रमाणित बियाणे वापरावे.
  • रोगाची लागण झालेल्या शेतात किमान दोन वर्षे फरसबीची लागवड करू नये.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम/ किलो वापरुन बीजसंस्करण करावे.
  • मेन्कोजेब 3 ग्रॅम प्रति ली. पाणी मिश्रणाची फवारणी करावी किंवा क्लोरोथायोनील 2 ग्रॅम प्रति ली पाण्याचे मिश्रण पाने फुटल्यापासून शेंगा तयार होईपर्यंत दर आठवड्याला फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>