Management of Mosaic Virus in chilli

मिरचीमधील केवडा रोगाचा (मोझेक विषाणू) बंदोबस्त

लक्षणे:-

  • पानांवर गडद हिरवे आणि पिवळे डाग पडणे हे रोगाचे मुख्य लक्षण आहे.
  • उथळ खड्डे आणि फोड देखील आढळून येतात. |
  • कधीकधी पानाचा आकार बदलून त्यांची लहान गुंडाळी होते.
  • लागण झालेल्या रोपांना फुले आणि फळे कमी लागतात.
  • फळे विकृत आणि खडबडीत होतात.

प्रतिबंध:-

  • लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत.
  • पूसा ज्वाला, पन्त सी-1, पूसा सदाबहार, पंजाब लाल इत्यादी प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • डायमिथोएट चे 2 मिली/लीटर मात्रेत मिश्रण बनवून योग्य त्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>