Suitable climate and soil for watermelon

कलिंगडासाठी उपयुक्त वातावरण आणि माती:-

  • कलिंगडाच्या शेतीस उष्ण आणि कोरडे वातावरण उत्तम असते.
  • बियाण्याचे अंकुरण आणि रोपांची वाढ यासाठी 22-26 डिग्री सेल्सियस तापमान उत्तम असते. हे उन्हाळी पीक असल्याने त्याला जास्त धुके सहन होत नाही.
  • हवेत जास्त आर्द्रता असल्यास फळे उशिरा पक्व होतात.
  • फळे पिकताना हवामान उष्ण आणि कोरडे असल्यास फळातील गोडी वाढते. पाण्याचा योग्य निचरा आणि जीवांशयुक्त बलुई किंवा लोम माती या पिकासाठी सर्वोत्तम असते.
  • या पिकासाठी मृदेतील सर्वोत्तम पीएच स्तर 5-7 असतो. पाण्याचा निचरा न झाल्यास अनेक रोगांची लागण होते. नदीकिनार्‍यावरील जमिनीत कलिंगडाची शेती यशस्वीरीत्या करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and Soil Condition For Bottle Gourd

दुषी भोपळ्याच्या लागवडीसाठी उत्तम वातावरण आणि माती:-

वातावरण –

  • दुधी भोपळा ही उपोष्णकटिबंधीय भाजी असून तिच्या वेगवान विकास आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण आणि आर्द्र हवामान आवश्यक असते.
  • अर्द्ध शुष्क परिस्थिती या पिकास उपयुक्त असते.
  • त्याच्या योग्य विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान क्रमशः 18-22 °C आणि 30-35 °C उत्तम असते.
  • 25-30°C तापमानात बीज अंकुरण लवकर आणि उत्तम होते.
  • योग्य तापमानात घेतलेल्या पिकात मादी फुले आणि फळे-फुले/ रोप यांचे प्रमाण उच्च असते.

माती –

  • दुषी भोपळ्याची लागवड सर्व प्रकारच्या मातीत होते पण खूप आम्ल, लवणीय आणि क्षारीय मातीत हे पीक घेऊ नये.
  • बलुई ही रेताड लोम माती मिट्टी दुषी भोपळ्यासाठी उत्तम असते.
  • पाण्याचा चांगला निचरा होणारी कार्बनिक माती दुषी भोपळ्याच्या लागवडीसाठी उत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and soil for Cabbage Cultivation

पानकोबीसाठी उपयुक्त हवामान आणि जमीन:-

  • पानकोबीची वाणे तापमानासाठी अति संवेदनशील आहेत. चांगल्या अंकुरणासाठी 10°C ते 21 °C तापमान उपयुक्त असते.
  • रोपे आणि पानकोबीच्या गड्ड्यांच्या विकासासाठी 15°C ते 21°C तापमान अनुकूल असते. 10°C हून कमी तापमानात रोपांचा विकास कमी होतो आणि गड्डेही उशिरा तयार होतात.
  • जमीन हलकी आणि दोमट असणे, पाण्याचा निचरा चांगला होत असणे आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असणे पानकोबीसाठी उपयुक्त असते.
  • लवकरच्या हंगामातील वाणांसाठी हलकी माती आणि मध्य अवधीच्या वाणांसाठी व उशीराच्या वाणांसाठी भारी दोमट माती उपयुक्त असते.
  • लवणीय जमिनीत बुरशी आणि जिवाणूंचा फैलाव होऊन रोग पसरतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and Soil for Brinjal

वांग्याच्या पिकासाठी उपयुक्त हवामान आणि माती:-

  • वांगी हे उष्ण हवामानात घेतले जाणारे आणि प्रकाशासाठी असंवेदनशील पीक आहे.
  • हे पीक धुक्यासाठी अतिसंवेदनशील आहे.
  • या पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी 21 ते 27 °C या दरम्यान तापमान असावे.
  • हे पीक पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात घेता येते.

माती:-

  • वांग्याचे पीक सर्व प्रकारच्या मातीत घेता येते.
  • भरघोस उत्पादनासाठी हलक्या ते मध्यम श्रेणीमधील पाण्याच्या निचर्‍याची उत्तम व्यवस्था असलेली जमीन निवडावी.
  • निवडलेल्या जमिनीचा पी.एच. स्तर 5.6 ते 6.6 दरम्यान असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and Soil for Cultivation of Okra

भेंडीच्या शेतीसाठी सुयोग्य हवामान आणि माती:-

  • भेंडीच्या भाजीचे पीक उष्ण हवामानात केले जाते. त्याला दीर्घकाळ टिकणार्‍या उष्ण आणि आर्द्र हवामानाची आवश्यकता असते.
  • हे पीक पावसाळी पीक म्हणून देखील घेतले जाते.
  • हे पीक धुके आणि थंडीबाबत संवेदनशील आहे.
  • सामान्यता उत्पादन करण्यासाठी 24°C से 28°C तापमान उपयुक्त असते.
  • 25°C पेक्षा कमी तापमानात बीज अंकुरण होत नाही. चांगल्या अंकुरणासाठी अनुकूल आर्द्रता आणि 25°C ते 35°C या दरम्यान तापमान उपयुक्त असते.

माती:-

  • भेंडी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत पिकवली जाऊ शकते परंतु या पिकाला सोटमुळ असल्याने जास्त उत्पादनासाठी हलकी, जीवांशयुक्त, ओल धरून ठेवणारी होणारी, दोमट माती अधिक उपयुक्त असते.
  • जमिनीचा पी.एच. स्तर 6 ते 6.8 असावा. क्षार आणि लवणीय जमीन तसेच पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था नसणे पिकास बाधक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and Soil for Tomato Cultivation

टोमॅटोच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि माती:-

उपयुक्त हवामान:-

  • टोमॅटोचे पीक प्रकाशासाठी असंवेदनशील असते आणि उष्ण हवामानात उत्तम येते.
  • त्याच्या चांगल्या वानस्पतिक वाढीसाठी दिवसाचे तापमान 21 ते 28 डिग्री से.ग्रे. आणि रात्रीचे तापमान 15 ते 20  डिग्री से.ग्रे. या दरम्यान असावे.
  • फळांचा लाल रंग विकसित होण्यासाठी 21 ते 24 डिग्री से.ग्रे. तापमान उपयुक्त असते.
  • या पिकाची लागवड जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात सहजपणे करता येत नाही.

उपयुक्त माती:-

  • टोमॅटोची लागवड रेताड ते भारी अशा सर्व प्रकारच्या मातीत सहजपणे करता येते.
  • पाण्याचा चांगला निचरा, पी.एच. स्तर 7 ते 8.5 या दरम्यान असलेली जीवांशयुक्त दोमट माती या पिकासाठी उपयुक्त असते.
  • सहसा रेताड जमीन लवकर पक्व होणार्‍या वाणांसाठी तर भारी माती असलेली जमीन उशिरा पक्व होणार्‍या आणि जास्त उत्पादन देणार्‍या वाणांसाठी चांगली असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Cauliflower

फुलकोबीसाठी अनुकूल वातावरण:-

  • फुलकोबीची वाणे तापमानासाठी अतिसंवेदनशील असतात.
  • अंकुरण चांगले होण्यासाठी 10°C ते 21°C तापमान उपयुक्त असते.
  • रोपे आणि फुलकोबीच्या विकासासाठी 10°C ते 21°C तापमान अनुकूल असते.
  • 10°C हून कमी तापमानात रोपांचा विकास कमी होतो आणि फुलकोबी उशिरा पक्व होते.
  • अधिक तापमानात फुलकोबीमधून पाने फुटतात.
  • सुयोग्य वाण निवडणे त्यामुळे अत्यावश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable climate for pea cultivation

मटारसाठी उपयुक्त हवामान:-

  • मटारचे उत्पादन वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात करता येते.
  • मटारसाठी थंड आणि कोरड्या हवेची आवश्यकता असते.
  • थंड हवा जास्त काळ राहिल्यास उत्पादन वाढते.
  • 15-20 डिग्री से. तापमान मटारच्या पिकासाठी उत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Pumpkin Production

दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान:-

  • ऊष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी उपयुक्त असते.
  • निम शुष्क आणि थंड वातावरण देखील या पिकासाठी अनुकुल असते.
  • या पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18-22 C आणि 30-35 C यादरम्यान असावे. 25-30 C तापमानात बीज अंकुरण वेगाने होते.
  • अनुकूल तापमान असताना रोपावरील मादी फुले आणि फळांच्या संख्येत वाढ होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Chilli

मिरचीसाठी उपयुक्त हवामान:-

  • गरम, आद्र हवामानात उष्णकटिबंधीय परदेशात पीक घेतले जाते.
  • 15-30  डिग्री से तापमान मिरचीच्या लागवडीस उत्तम असते.
  • सरासरी वार्षिक पर्जन्यमान 1200 मि.मि. असते तेथे मिरचीची लागवड पावसावर अवलंबून असलेले पीक म्हणून केली जाते.
  • अधिक उष्णतेने फुलोरा आणि फळे गळून पडतात.
  • डोज 9-10 तास सूर्यप्रकाश मिळाल्यास उत्पादन 21-24% पर्यन्त वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share