भेंडीच्या शेतीसाठी सुयोग्य हवामान आणि माती:-
- भेंडीच्या भाजीचे पीक उष्ण हवामानात केले जाते. त्याला दीर्घकाळ टिकणार्या उष्ण आणि आर्द्र हवामानाची आवश्यकता असते.
- हे पीक पावसाळी पीक म्हणून देखील घेतले जाते.
- हे पीक धुके आणि थंडीबाबत संवेदनशील आहे.
- सामान्यता उत्पादन करण्यासाठी 24°C से 28°C तापमान उपयुक्त असते.
- 25°C पेक्षा कमी तापमानात बीज अंकुरण होत नाही. चांगल्या अंकुरणासाठी अनुकूल आर्द्रता आणि 25°C ते 35°C या दरम्यान तापमान उपयुक्त असते.
माती:-
- भेंडी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत पिकवली जाऊ शकते परंतु या पिकाला सोटमुळ असल्याने जास्त उत्पादनासाठी हलकी, जीवांशयुक्त, ओल धरून ठेवणारी होणारी, दोमट माती अधिक उपयुक्त असते.
- जमिनीचा पी.एच. स्तर 6 ते 6.8 असावा. क्षार आणि लवणीय जमीन तसेच पाण्याच्या निचर्याची योग्य व्यवस्था नसणे पिकास बाधक असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share