Soil solarization in chilli nursery

मिरचीच्या नर्सरीसाठी मातीचे सौरीकरण

  • बुरशीजन्य रोग आणि कीड इत्यादीपासून बचाव करण्यासाठी मिरचीच्या पिकाची नर्सरी तयार करण्यापूर्वी  उन्हाळ्यात सौरीकरण करावे.
  • सौरीकरण करण्यासाठी एप्रिल-मे हा योग्य काळ असतो कारण त्यावेळी वातावरणाचे तापमान 40ºC पर्यन्त वाढते.
  • सर्वप्रथम मातीला पाण्याने ओले किंवा संतृप्त करावे.
  • त्यानंतर सुमारे 5-6 आठवडे पूर्ण नर्सरीवर 200 गेजचे (50 माइक्रॉन) पारदर्शक  पॉलीथीन पसरावे.
  • पॉलिथीनच्या कडाना ओल्या मातीने लिंपावे. त्यामुळे आत हवा शिरणार नाही.
  • 5-6 आठवड्यांनी पॉलीथिन शीट काढावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Disease Free Nursery bed preparation and Season of Transplanting for Chilli

मिरचीच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे आणि पुनर्रोपणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत करावी.
  • एक हेक्टर शेतासाठी 180 मि X 1.2 मि.(3 मि. X 1.2 मि चे छोटे वाफे) आकाराच्या नर्सरीची आवश्यकता असते.
  • उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कम्पोस्ट एक बैलगाड़ी आणि 10 किलो सुपर फॉस्फेट मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • पांढर्‍या मुंग्यांपासून बचाव करण्यासाठी मातीत 30 ग्रॅम एलड्रिन किंवा विरघळणारे डायएलड्रिन मिसळावे.
  • वाफ्यांची ऊंची सुमारे 15 से.मी. ठेवावी. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होईल.
  • आर्द्र गलन रोगापासून बचाव करण्यासाठी नर्सरीतील मातीवर बियाणे पेरण्यापूर्वी एक आठवडा रासायनिक उपचार करावे. त्यासाठी फॉर्मेलीनची (फॉर्मेलडिहाईड 40%) 1:100 प्रमाणातील मात्रा वापरावी.
  • निरोगी बियाणे वापरावे. कार्बेन्डाझिम+ मॅन्कोझेबची मात्रा 75% 2 ग्रॅम/किलों बियाणे या प्रमाणात वापरुन बीजसंस्करण करावे.
  • एकाच जागी पुन्हा पुन्हा नर्सरी बनवू नये.
  • जैविक नियंत्रक ट्रायकोडरमा विरिडीची मात्रा 1.2 किलो/हेक्टर प्रमाणात वापरावी.

पुनर्रोपणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • ऑगस्टचा महिना मिरचीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
  • ऑगस्ट महिन्यात पेरणी केल्यास रोपांची वाढ आणि उत्पादन यात वृद्धी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Chilli Thrips

मिरचीवरील थ्रिप्सचे (फुलकिडा) नियंत्रण:-

लक्षणे:-

  • रोगग्रस्त पाने वरच्या बाजूला मुडपली जातात.
  • कळ्या नाजुक होऊन गळून पडतात.
  • सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची वाढ आणि फुलांची संख्या घटते.

नियंत्रण:-

  • ज्वारीचे पीक घेतल्यावर लगेचच मिरचीचे पीक घेऊ नये.
  • मिरची आणि कांद्याची मिश्रपिके घेऊ नयेत.
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूएस @ 12 ग्रॅम/ किग्रा  वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कार्बोफुरन 3% जी @ 33 किलो / हेक्टर किंवा फोरेट 10% जी @ 10 किलो / हेक्टर मातीत मिसळावे.
  • पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:

 

           कीटकनाशक मात्रा
इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस.एल. 100 मिलि/एकर
डायमिथोएट 30 % ईसी 300 मिलि/ एकर
इमामेक्टिन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्रॅम/ एकर
प्रोफेनोफोस  50% ईसी 500 मिली/ एकर
फिप्रोनिल 5 % एससी 500 मिलि/ एकर
स्पिनोसेड  45 % एससी 70 मिली/ एकर

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit Rot and Dieback in Chillies

मिरचीतील फळ कुजव्या आणि डायबेक रोगाचे नियंत्रण

मिरचीतील फळ कुजव्या आणि डायबेक रोग:- याची लक्षणे फुलोरा आल्यावर आढळून येतात. पानांवर काळे डाग पडतात आणि रोप मधून तुटते. फुले सुकतात आणि रोप वरुन खाली सुकत जाते.

नियंत्रण:- रोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी थायोफिनेट मिथाईल 70% @ 30 ग्रॅम/पंप किंवा हेक्झाकोनाझोल 5 % +केपटान 70% WP @ 25 ग्रॅम/पम्प फवारावे. पहिली फवारणी फुलोरा येण्यापूर्वी, दुसरी फलधारणा सुरू होताच आणि तिसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of Transplanting of Chilli

मिरचीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • मिरचीची पेरणी जुलै ते सप्टेंबर या काळात केली जाते.
  • मिरचीच्या पेरणीसाठी ऑगस्टचा महिना सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबरचा महिना उत्तम असतो.
  • ऑगस्ट महिन्यात एरणी केल्यास रोपांची वाढ आणि उत्पादन यात वाढ होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Basal dose of fertilizers for Chilli

मिरचीच्या पिकासाठी उर्वरकांची मूलभूत मात्रा:-

  • उर्वरके मृदा परीक्षण अहवालानुसार द्यावीत.
  • मृदा परिक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास डीएपी 100 किलो, यूरिया 50 किलो आणि पोटाश 50 किलो प्रति एकर अशी मात्रा पेरणीपुर्वी द्यावी.
  • उर्वरकांची मूलभूत मात्रा माती, वाण आणि इतर घटकांनुसार बदलू शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Chilli

मिरचीच्या पिकासाठी शेताची मशागत:-

  • शेताची चार वेळा नांगरणी केल्यावर कुळव चालवून जमीन नरम, भुसभुशीत आणि सपाट करावी.
  • मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत द्यावे.
  • फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्रा  आणि नायट्रोजनची 25 ते 33 टक्के मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Soil for Chilli Production

मिरचीच्या उत्पादनास उपयुक्त मृदा:-

  • पाण्याचा उत्तम निचरा होणारी सर्व प्रकारची माती.
  • रेताड, दोमट माती सर्वोत्तम असते.
  • अधिक क्षारयुक्त आणि आम्लीय जमीन उपयुक्त नसते.
  • जमिनीचा पी.एच. स्तर 6- 7 असावा.
  • अधिक लवणीय जमीन अंकुरण आणि वाढ रोखते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Chilli

मिरचीसाठी उपयुक्त हवामान:-

  • गरम, आद्र हवामानात उष्णकटिबंधीय परदेशात पीक घेतले जाते.
  • 15-30  डिग्री से तापमान मिरचीच्या लागवडीस उत्तम असते.
  • सरासरी वार्षिक पर्जन्यमान 1200 मि.मि. असते तेथे मिरचीची लागवड पावसावर अवलंबून असलेले पीक म्हणून केली जाते.
  • अधिक उष्णतेने फुलोरा आणि फळे गळून पडतात.
  • डोज 9-10 तास सूर्यप्रकाश मिळाल्यास उत्पादन 21-24% पर्यन्त वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mosaic Virus in chilli

मिरचीमधील केवडा रोगाचा (मोझेक विषाणू) बंदोबस्त

लक्षणे:-

  • पानांवर गडद हिरवे आणि पिवळे डाग पडणे हे रोगाचे मुख्य लक्षण आहे.
  • उथळ खड्डे आणि फोड देखील आढळून येतात. |
  • कधीकधी पानाचा आकार बदलून त्यांची लहान गुंडाळी होते.
  • लागण झालेल्या रोपांना फुले आणि फळे कमी लागतात.
  • फळे विकृत आणि खडबडीत होतात.

प्रतिबंध:-

  • लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत.
  • पूसा ज्वाला, पन्त सी-1, पूसा सदाबहार, पंजाब लाल इत्यादी प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • डायमिथोएट चे 2 मिली/लीटर मात्रेत मिश्रण बनवून योग्य त्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share