मिरचीच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे आणि पुनर्रोपणीसाठी सुयोग्य वेळ:-
- शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत करावी.
- एक हेक्टर शेतासाठी 180 मि X 1.2 मि.(3 मि. X 1.2 मि चे छोटे वाफे) आकाराच्या नर्सरीची आवश्यकता असते.
- उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कम्पोस्ट एक बैलगाड़ी आणि 10 किलो सुपर फॉस्फेट मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
- पांढर्या मुंग्यांपासून बचाव करण्यासाठी मातीत 30 ग्रॅम एलड्रिन किंवा विरघळणारे डायएलड्रिन मिसळावे.
- वाफ्यांची ऊंची सुमारे 15 से.मी. ठेवावी. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होईल.
- आर्द्र गलन रोगापासून बचाव करण्यासाठी नर्सरीतील मातीवर बियाणे पेरण्यापूर्वी एक आठवडा रासायनिक उपचार करावे. त्यासाठी फॉर्मेलीनची (फॉर्मेलडिहाईड 40%) 1:100 प्रमाणातील मात्रा वापरावी.
- निरोगी बियाणे वापरावे. कार्बेन्डाझिम+ मॅन्कोझेबची मात्रा 75% 2 ग्रॅम/किलों बियाणे या प्रमाणात वापरुन बीजसंस्करण करावे.
- एकाच जागी पुन्हा पुन्हा नर्सरी बनवू नये.
- जैविक नियंत्रक ट्रायकोडरमा विरिडीची मात्रा 1.2 किलो/हेक्टर प्रमाणात वापरावी.
पुनर्रोपणीसाठी सुयोग्य वेळ:-
- ऑगस्टचा महिना मिरचीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
- ऑगस्ट महिन्यात पेरणी केल्यास रोपांची वाढ आणि उत्पादन यात वृद्धी होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share