Nutrient management of Cauliflower

फुलकोबीमधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • फुलकोबी पिकवण्यासाठी सर्वाधिक पोषक तत्वांची आवश्यकता असते.
  • उर्वरकांची मात्रा जमिनीचा प्रकार आणि कार्बनिक पदार्थांच्या वापरावर अवलंबून असते.
  • शेतात रोपे लावण्यापूर्वी 4 आठवडे 15-20 टन शेणखत मातीत मिसळावे.
  • पिकाच्या चांगल्या वाढीसाठी उर्वरकांची शिफारस केलेली मात्रा – सामान्य वाणासाठी 100 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर, संकरीत वाणासाठी 120-180 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर|
  • शेताची मशागत करताना नत्राची अर्धी आणि फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्रा दिली जाते.
  • नत्रची उरलेली मात्र माती पसरताना दिली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cauliflower

फूलकोबीसाठी शेताची मशागत

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून माती मोकळी करावी आणि पाटा चालवून जमीन सपाट करावी.
  • पेरणीचा हंगाम आणि जमिनीच्या पोतानुसार वाफे आणि सर्‍यांमध्ये पेरणी करावी.
  • प्रगत जातींचे रोपण वाफ्यात, खार जमिनीत नळ्यात आणि कोरड्या हवामानात सपाट जमिनीवर करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery bed preparation for Cauliflower

फुलकोबीसाठी नर्सरीची निर्मिती

  • बियाणे वाफ्यांमध्ये पेरले जातात. साधारणता 4-6 आठवडे वयाच्या रोपांचे पुनर्रोपण केले जाते.
  • वाफ्याची उंचाई 10 ते 15 सेंटीमीटर असते आणि आकार 3*6 मीटर असतो.
  • दोन वाफ्यांमध्ये 70 सेंटीमीटर अंतर असते. त्यामुळे आत काम सहजपणे करता येते.
  • नर्सरीच्या वाफ्यातील माती भुसभुशीत आणि जमीन सपाट असावी.
  • नर्सरीच्या वाफ्यांची निर्मिती करताना 8-10 किलोग्रॅम शेणखत प्रति वर्ग मीटर प्रमाणात मिसळावे.
  • भारी जमिनीत उंच वाफे करून पाणी तुंबण्याची समस्या सोडवतात.
  • आद्र गलन रोगाने रोपांना होणार्‍या हानीपासून बचाव करण्यासाठी कार्बेन्डाझिम 50% WP चे 15-20 ग्रॅम/10 लि. पाण्याचे मिश्रण मातीत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Alternaria Leaf Spot in Cauliflower and Cabbage

फुलकोबी आणि पानकोबीवरील आल्टर्नेरिआ (पानांवरील डागांचा रोग):-

लक्षणे:-

  • पानांवर लहान गडद पिवळ्या रंगाचे ठिपके उमटतात.
  • लवकरच हे ठिपके एकमेकात मिसळून निळसर गोल व्रण बनवतात.
  • या डागांच्या मध्यभागी केंद्रामध्ये निळसर रंगाची बुरशी वाढते.
  • लागण तीव्र झाल्यावर सर्व पाने गळून पडतात.
  • रोगग्रस्त फुलांवर आणि पानांवर गडद जांभळे, काळे-करडे डाग दिसतात.

नियंत्रण:-

  • प्रमाणित बियाणी वापरावी.
  • गरम पाण्यात (50OC) बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे दिसू लागताच मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. पाण्याचे किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 3 ग्राम प्रति लीटर पाण्याचे मिश्रण बनवून 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cauliflower Diamondback Moth (DBM)

फुलकोबीवरील डायमण्ड बॅक मोथची अळी

ओळख:-

  • अंडी पांढरट पिवळी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळट हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे असतात आणि त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे असतात आणि त्यांच्या आतील कडा पिवळ्या असतात.
  • वाढलेल्या माद्या पानांवर समूहाने अंडी घालतात.
  • पंखांवर पांढर्‍या रेषा असतात. पंख मिटल्यावर हिर्‍याचा आकार दिसतो.

नुकसान:-

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांचा बाहेरील पृष्ठभाग खाऊन त्यात भोके पाडतात.
  • तीव्र हल्ला झाल्यावर पानांचा फक्त सांगाडा उरतो.

नियंत्रण:-

डायमण्ड बॅक मोथ रोखण्यासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मिश्रण फवारावे. स्पायनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share