Seed rate for Cauliflower

फुलकोबीसाठी बियाण्याचे प्रमाण

  • हायब्रीड वाणांसाठी:- 175-200 ग्रॅम/एकर बियाणे आवश्यक असते.
  • उन्नत वाणांसाठी:- 400-500 ग्रॅम/एकर बियाणे आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable soil for Cauliflower

फुलकोबीसाठी उपयुक्त माती

  • फुलकोबीच्या शेतीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असलेली हलकी आणि लोम माती उत्तम असते.
  • लवकर तयार होणार्‍या वाणांसाठी हलकी माती तर मध्य अवधी आणि उशिरा तयार होणार्‍या वाणांसाठी जड लोम माती उपयुक्त असते.
  • लवणीय मातीत बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांची जास्त लागण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil preparation for cauliflower

फुलकोबीच्या पिकासाठी जमिनीची मशागत

    • पलटी नांगरणाने 1 ते दोन वेळा 2 फुलीची नांगरणी केल्यानंतर 3 ते 4 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
    • अधिक उत्पादनासाठी चांगल्या वाणाची निवड करावी.
    • नांगरणीच्या वेळी एकरी 20 ते 25 टन शेणखत मातीत मिसळावे.
    • शेतात सूत्रकृमीचा (नेमाटोड) उपद्रव असल्यास एकरी 10 किलो कार्बोफ्यूरान कीटकनाशक फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing for Cauliflower

फुलकोबीच्या रोपांमधील सुयोग्य अंतर:-

  • फुलकोबीच्या पिकातील सुयोग्य अंतर वाण, जमिनीचा प्रकार आणि हंगामावर अवलंबून असते.
  • रोपातील अंतर पुढीलप्रमाणे असावे:
  • लवकरच्या हंगामातील वाणे:- 45 x  45 से.मी.
  • मध्य हंगामातील वाणे:- 60 x 40 से.मी.
  • उशीराच्या हंगामातील वाणे:- 60 x 60 से.मी. किंवा 60 x 45 से.मी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Cauliflower

फुलकोबीसाठी अनुकूल वातावरण:-

  • फुलकोबीची वाणे तापमानासाठी अतिसंवेदनशील असतात.
  • अंकुरण चांगले होण्यासाठी 10°C ते 21°C तापमान उपयुक्त असते.
  • रोपे आणि फुलकोबीच्या विकासासाठी 10°C ते 21°C तापमान अनुकूल असते.
  • 10°C हून कमी तापमानात रोपांचा विकास कमी होतो आणि फुलकोबी उशिरा पक्व होते.
  • अधिक तापमानात फुलकोबीमधून पाने फुटतात.
  • सुयोग्य वाण निवडणे त्यामुळे अत्यावश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control Of Downy Mildew in Cauliflower

फुलकोबीच्या अंगक्षय रोगाचे नियंत्रण:-

  • खोडांवर तपकिरी डाग दिसतात. त्यांच्यावर पांढर्‍या, मुलायम, रोम असलेल्या बुरशीची वाढ होते.
  • पानांच्या खालील बाजूवर जांभळ्या तपकिरी रंगाचे डाग पडतात. त्यांच्यावर पांढर्‍या, मुलायम, रोम असलेल्या बुरशीची वाढ होते.
  • फुलकोबीच्या शेंड्यावर संक्रमण होऊन तो सडतो.

नियंत्रण:-

  • गरम पाणो (50 OC) आणि थायरम (3 ग्रा./ ली.) वापरुन अर्धातास बीजसंस्करण करावे.
  • संक्रमित भाग कापून वेगळे काढावेत आणि कापलेल्या भागावर कॉपर ऑक्सीक्लोराइड (3 ग्रॅम/ली.) लावावे.
  • पिकावर मॅन्कोझेब 75 % @ 400 ग्रॅ/ एकर ची 10-15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • पीक चक्राचे अवलंबन करावे आणि शेतात स्वच्छता ठेवावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Today’s Gramophone Farmer

आजचे ग्रामोफोन शेतकरी

नाव:- मनीष चौधरी

गाव:- सिलोटिया

जिल्हा:- इंदौर

राज्य:- मध्य प्रदेश

शेतकरी बंधु मनीष जी फूलकोबीची शेती ग्रामोफोनच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Share

Irrigation in Cauliflower

फूलकोबीच्या पिकाचे पाणी व्यवस्थापन:-

  • भरघोस पिकासाठी पुरेशी ओल टिकवणे आवश्यक आहे.
  • रोपणानंतर थोडे पाणी द्यावे.
  • ओल टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार 10-15 दिवसांच्या अंतराने थोडे थोडे पाणी देत राहावे.
  • उशिराच्या आणि मध्य हंगामातील पीक पावसावर अवलंबून असते. |
  • फुलोरा येण्याच्या आणि गड्डे विकसित होण्याच्या काळात ओल टिकवणे खूप आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of planting of Cauliflower

फूलकोबीच्या रोपणासाठी सुयोग्य वेळ

  • उशिराने घेतल्या जाणार्‍या जातींची पेरणी मे ते जून या दरम्यान केली जाते.
  • हंगामाच्या मध्यकाळातल्या जातींची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या मध्याच्या दरम्यान केली जाते.
  • हंगामाच्या मध्यकाळात उशिरा केल्या जाणार्‍या जातींची पेरणी ऑगस्ट महिन्यात करतात.
  • उशिराने केल्या जाणार्‍या जातींची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या मध्याच्या दरम्यान केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Control in Cauliflower

फुलकोबीमधील तणाचे नियंत्रण:-

  • पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेताची निंदणी करणे अत्यावश्यक असते.
  • दोन-तीन वेळा हाताने निंदणी आणि एक-दोन वेळा कुदळणी करावी. खोल कुदळणी करू नये.
  • रोपणानंतर पेंडामिथेलीन 30% EC 3-3.5 लीटर प्रति हेक्टर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share