How to Control Cauliflower Diamondback moth:-

फूलकोबीवरील डायमंड बॅक किडीच्या अळीचे नियंत्रण

ओळखण्याची लक्षणे

  • या किडीची अंडी पिवळसर पांढर्‍या आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळसर हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर लहान रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या आणि गव्हाळ रंगाचे असतात. त्यांना पातळ पंख असून त्यांच्या आतील कडा पिवळ्या रंगाच्या असतात.
  • वाढ झालेल्या माद्या पानांवर एकएकटी किंवा समूहाने अंडी घालतात.
  • त्यांच्या पंखांवर पांढर्‍या रेषा असतात. ते दुमडल्यावर हिर्‍यासारखा आकार दिसतो.

हानी

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांच्या वाहेरील बाजूचा पृष्ठभाग खाऊन त्यात भोके पाडतात.
  • हल्ला तीव्र असल्यास पानांचे फक्त सापळे राहतात.

नियंत्रण:-

  • डायमंड बॅक किडीची वाढ रोखण्यासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर बोल्ड मोहरीच्या दोन ओळी पेराव्यात.
  • प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 500 मिली/ एकर किंवा सायपरमेथ्रिन 4% ईसी + प्रोफेनोफॉस 40% ईसी @ 400 मिली/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारावे.
  • स्पायनोसेड (25 एस.सी.) 100 मिली/ एकर किंवा इंडोक्साकार्ब 300 मिली/ एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट @ 100 ग्रॅम/ एकर पाण्यात या प्रमाणात मिश्रण बनवून रोपणानंतर 25 व्या दिवशी आणि त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा फवारावे.
  • जैविक नियंत्रण करण्यासाठी बेवेरिया बॅसियाना @ 1  किलो/ एकर वापरावे.

टीप:- प्रत्येक फवारणीबरोबर न चुकता स्टीकर मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>