Control of anthracnose in bottle gourd

दुधी भोपळ्यातील क्षतादिरोगाचे (अॅंथ्रेक्नोज) नियंत्रण

  • शेतात स्वच्छता राखावी आणि सुयोग्य पीक चक्र अवलंबावे. त्यामुळे रोगाचा फैलाव थांबेल.
  • कार्बेन्डाजिम 50% WP बुरशीनाशक 2.5 ग्रॅम/ एक किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • 10 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 75%डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizers dose of Bottle gourd

दुधी भोपळ्यासाठी उर्वरकांची मात्रा

  • खाते आणि उर्वरकांचा वापर मातीच्या अवस्थेवर अवलंबून असतो.
  • शेताची मशागत करताना एकरी 11 टन या प्रमाणात शेणखत मातीत मिसळावे.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी एकरी 30 कि. ग्रॅम यूरिया, 80 कि. ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 30 कि. ग्रॅम पालाश (पोटाश) मातीत मिसळावे.
  • युरियाची उरलेली 60 कि. ग्रॅम मात्रा दोन किंवा तीन समान हिश्श्यात विभागून द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Bottle gourd

दुधी भोपळ्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन

  • बियाणे पेरण्यापूर्वी शेतात पहिले सिंचन करावे आणि त्यानंतर एका आठवड्याने पुन्हा सिंचन करावे.
  • फेब्रुवारी – मार्च महिन्यात पेरलेल्या पिकस पेरणीनंतर 2-3 दिवसांनी पहिले सिंचन करावे.
  • त्यानंतर 7-8 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.

ठिबक सिंचन

  • ठिबक सिंचन यंत्रणा बसवून मुख्य आणि उपमुख्य नळ्यांना एकमेकांपासुन 1.5 मीटर अंतरावर ठेवावे. क्रमशः 4 लीटर प्रति तास आणि 3.5 लीटर प्रति तास क्षमतेचे ड्रिपर्स एकमेकांपासुन 60 सेमी आणि 50 सेमी अंतरावर बसवावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer requirements in Bottle gourd

दुधी भोपळ्यासाठी खताची मात्रा

  • शेताची मशागत करताना एकरी 10 टन शेणखत मातीत मिसळावे.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी एकरी 30 कि. ग्रॅम यूरिया, 80 कि. ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 30 कि. ग्रॅम पालाश (पोटाश) मातीत मिसळावे.
  • युरियाची उरलेली 30  कि. ग्रॅम मात्रा दोन ते तीन समान भागात विभागून द्यावी.
  • फॉस्फरस, पालाश (पोटाश) ची संपूर्ण मात्रा आणि नत्राची (नायट्रोजन) एक तृतीयांश मात्रा प्रत्येक आळ्यात पेरलेल्या बियंपासून 8 ते 10 से.मी. अंतरावर पेरावी.
  • शेतात नत्राचा (नायट्रोजन) अभाव असल्यास पाने आणि वेली पिवळ्या रंगाची होतात आणि वेलांची वाढ खुंटते.
  • जमिनीत पोटॅशियमचा अभाव असल्यास रोपांची वाढ आणि पानांचा आकार कमी होऊन फुले गळतात आणि फलधारणा बंद होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing method and seed rate of Bottle gourd

दुधी भोपळ्याच्या पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • अंकुरण उत्तम होण्यासाठी बियाणे पेरणीपुर्वी 24-48  तास पाण्यात बुडवून ठेवावे.
  • एक एकर जमीनिसाठी उन्नत वाणाचे 1 ते 1.5 कि. ग्रॅम बियाणे आवश्यक असते.
  • एका खड्ड्यात चार ते पाच बिया पेराव्यात.
  • बियान्यांचे अंकुरण झाल्यावर दोन आठवड्यांनी रोगट आणि कमी वाढ असलेल्या रोपांना उपटावे. त्यामुळे प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 निरोगी रोपे राहतील.
  • संकरीत वाणाच्या आणि खासगी कंपनीच्या बियाण्यांचे एकरी प्रमाण 300-500 ग्रॅम असते. बियाण्याचे प्रमाण वाण आणि लागवडीच्या पद्धतीवर अवलंबुन असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed Treatment in Bottle gourd

दुधी भोपळ्याचे बीजसंस्करण

  • चांगली गुणवत्ता आणि रोग व किडिपासून बचाव करण्यासाठी पेरणीपुर्वी बीजसंस्करण करणे आवश्यक असते.
  • बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% बुरशीनाशक 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात वापरावे किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5%  2 ग्रॅम/किलोग्रॅम या प्रमाणात वापरावे.
  • रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ. एस. (48%) 1 एम.एल/कि.ग्रॅ. या प्रमाणात  वापरुन बीजसंस्करण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil preparation for Bottle gourd cultivation

दुधी भोपळ्याच्या पिकासाठी शेताची मशागत

  • सुरुवातीच्या तयारीसाठी शेताची तवा नांगराने नांगरणी आणि फुली नांगरणी करावी.
  • नांगरणीच्या वेळी मातीत हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत मिसळावे.
  • शेवटची नांगरणी करताना शेतात वखर चालवून माती भुसभुशीत आणि सपाट करून घ्यावी.
  • शेतात नेमाटोड किंवा पांढर्‍या मुंग्यांची लागण झालेली असल्यास 10 किलो प्रति एकर या प्रमाणात कार्बोफ्यूरान कीटकनाशक पावडर फवारावी.
  • शेत सपाट केल्यावर 40 ते 50 से.मी. रुंदीच्या नळ्या एकमेकांपासुन 2 ते 2.5 से.मी. अंतरावर पाडाव्या.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and Soil Condition For Bottle Gourd

दुषी भोपळ्याच्या लागवडीसाठी उत्तम वातावरण आणि माती:-

वातावरण –

  • दुधी भोपळा ही उपोष्णकटिबंधीय भाजी असून तिच्या वेगवान विकास आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण आणि आर्द्र हवामान आवश्यक असते.
  • अर्द्ध शुष्क परिस्थिती या पिकास उपयुक्त असते.
  • त्याच्या योग्य विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान क्रमशः 18-22 °C आणि 30-35 °C उत्तम असते.
  • 25-30°C तापमानात बीज अंकुरण लवकर आणि उत्तम होते.
  • योग्य तापमानात घेतलेल्या पिकात मादी फुले आणि फळे-फुले/ रोप यांचे प्रमाण उच्च असते.

माती –

  • दुषी भोपळ्याची लागवड सर्व प्रकारच्या मातीत होते पण खूप आम्ल, लवणीय आणि क्षारीय मातीत हे पीक घेऊ नये.
  • बलुई ही रेताड लोम माती मिट्टी दुषी भोपळ्यासाठी उत्तम असते.
  • पाण्याचा चांगला निचरा होणारी कार्बनिक माती दुषी भोपळ्याच्या लागवडीसाठी उत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Soil for Bottle Gourd Cultivation

दुधीभोपळ्याच्या लागवडीसाठी उपयुक्त माती

  • सर्व प्रकारच्या जमिनीत दुधीभोपळ्याची लागवड सहजपणे करता येते पण जमीन जास्त आम्लीय किंवा क्षारीय किंवा लवणीय नसावी.
  • दुधीभोपळ्याच्या लागवडीसाठी दोमट किंवा रेताड दोमट मृदा सर्वाधिक उपयुक्त असते.
  • मृदेत कार्बनिक पदार्थ असावेत आणि जमिनीतून पाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था असावी.
  • पिकाला मृदाजनित रोगांपासून वाचवण्यासाठी शेतात किमान दोन वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of sowing of Bottle Gourd

दुधीभोपळ्याच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • दुधीभोपळ्याच्या पिकाची लागवड जानेवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते डिसेंबरचा मध्य या काळात केली जाते.
  • पावसावर अवलंबून असलेल्या भागात दुधीभोपळ्याची पेरणी मे ते जून महिन्याचा पहिला आठवडा या काळात पाऊस सुरू होण्यापूर्वी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share