Control of downy mildew in bottle gourd

दुधी भोपळ्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण

  • पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर शुष्क डाग उमटतात.
  • पानांच्या वरील पृष्ठभागावर तसेच डाग उमटतात.
  • सर्वात आधी डाग जुन्या पानांवर उमटतात आणि हळूहळू ते नव्या पानांवर उमटतात.
  • ग्रस्त वेलांवर फलधारणा होत नाही.
  • प्रभावित पाने तोडून नष्ट करावीत.
  • रोग प्रतिरोधक वाणे लावावीत.
  • पीक चक्र अवलंबून आणि शेताची सफाई करून रोगाची आक्रमकता कमी करता येते.
  • मॅन्कोझेब 75% WP @ 400-600  ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्राम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Flower Promotion in bottle gourd

दुधी भोपळ्याच्या फुलोर्‍याच्या वाढीसाठी उपाययोजना

  • दुधी भोपळ्याच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • दुधी भोपळ्याच्या उत्पादनात फुलांच्या संख्येचे खूप महत्वपूर्ण स्थान असते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन पिकावरील फुलांची संख्या वाढवता येते:
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली. /एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/एकर फवारावे.
  • 2 ग्रॅम /एकर या प्रमाणात जिब्रेलिक अॅसिड देखील फवारता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of red pumpkin beetle in bottle gourd

दुधी भोपळ्यातील लाल किडीचे नियंत्रण

  • दुधी भोपळ्याच्या शेताजवळ काकडी, दोडका, तोंडली इत्यादींची पेरणी करू नये कारण ही रोपे या किडीच्या चिवण चक्रात सहाय्यक ठरतात.
  • जुन्या पिकांचे अवशेष नष्ट करावेत.
  • पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत किडे आढळून आल्यास त्यांना हाताने पकडून नष्ट करावे.
  • सायपरमेथ्रिन 25% ईसी 150 मि.ली.प्रति एकर + डायमिथोएट 30% ईसी 300 मि.ली. प्रति एकर मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% डब्लू पी 450 ग्रॅम प्रति एकर द्रावण फवारावे. पहिली फवारणी लावणीनंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.
  • डायक्लोरवास (डीडीवीपी) 76% ईसी 250-350 मिली/एकर फवारून या किडीचे नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of White fly in bottle gourd

दुधी भोपळ्यातील श्वेत माशीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे अंडाकार हिरव्या-पांढर्‍या रंगाचे असतात.
  • वाढ झालेले किडे सुमारे 1 मि.ली. लांब असतात आणि त्यांच्या शरीरावर मेणासारखे पांढरे आवरण असते.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील पृष्ठभागावरून रस शोषतात आणि चिकटा सोडतात. त्याने प्रकाश संश्लेषणात अडथळा येतो.
  • पाने रोगग्रस्त दिसतात आणि काळ्या बुरशीने झाकली जातात.
  • ही कीड पर्ण सुरळी रोगाची वाहक असते.
  • पिवळ्या रंगाचे चिकट सापळे शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • पेरणीच्या वेळी कार्बोफ्यूरान 3% जीआर 8 किग्रॅ/एकर मातीत मिसळावे.
  • डायमिथोएट 30%ईसी का 250 ग्रॅम/एकर दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of fruit fly in bottle gourd

दुधी भोपळ्यातील फळ माशीचे नियंत्रण

  • अळ्या (लार्वा) फळात भोक पाडून रस शोषतात.
  • ग्रस्त फळे खराब होऊन गळतात.
  • माशी अंडी घालण्याच्या भागाने फळात भोक पाडून त्यांना हानी पोहोचवते. या भोकांमधून रस गळताना दिसतो.
  • ग्रस्त फळांना एकत्र करून नष्ट करावे.
  • अंडी घालणार्‍या माशीच्या प्रतिबंधासाठी शेतात प्रकाशित सापळे किंवा फेरोमोन ट्रॅप लावावेत. या सापळ्यात माशा मारण्यासाठी 1% मिथाइल इंजीनाँल किंवा सिनट्रोनेला तेल किंवा अॅसीटिक आम्ल किंवा लॅक्टीक अॅसिडचे मिश्रण बनवून ठेवावे.
  • परगणाच्या क्रियेनंतर लगेचच तयाऱ होणार्‍या फळांना पाँलीथीन किंवा कागदात गुंडाळावे.
  • या माश्यांचे नियंत्रण करण्यासाठी दुधी भोपळ्याच्या शेतात ओळींच्या मध्ये मक्याची लागवड करावी. या रोपांची ऊंची जास्त असल्याने माशा त्याच्या पानाखाली अंडी घालतात.
  • ज्या भागात फळ माशीचा उपद्रव जास्त असेल तेथे कार्बारिल 10 प्रतिशत भुकटी मातीत मिसळावी.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशांचा सुप्तावस्थेत नायनाट करावा.
  • डाइक्लोरोवोस 76% ईसी 250 ते 500 मि.ली./ एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of sucking pest in Bottle gourd by neem-based products

निंबोणी आधारित उत्पादनांनी दुधी भोपळ्यातील रस शोषणार्‍या किडीचे नियंत्रण

  • तेलकिडे (थ्रिप्स), मावा, शल्य कीड (स्केल्स), तुडतुडे आणि श्वेत माशी अशा लहान, मुलायम शरीराच्या किडे आणि माश्यांच्या विरोधात निंबोणीचे तेल सर्वाधिक प्रभावी असते.
  • पेरणीच्या वेळी आणि 30 दिवसांनी निंबोणीची पेंड @ 40 किग्रॅ प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावी.
  • 10 दिवसांच्या अंतराने PNSPE (4%) किंवा निंबोणी/ पोंगामिया साबणाच्या द्रावणाची (8-10 ग्रॅम/ लीटर) फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of gummy stem blight in bottle gourd

दुधी भोपळ्यातील खोडावरील चिकटा आणि मर रोगाचे (गम्मी स्टेम ब्लाईट) नियंत्रण

  • या रोगात वेलाची मुळे वगळता इतर सर्व भागावर लागण होते.
  • पानांच्या कडांवर पिवळेपणा/ हिरवेपणाचा अभाव आणि कडांवर पाण्याने भरलेले डाग पारणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे असतात.
  • या रोगाने ग्रस्त वेलांच्या खोडांवर व्रण होतात आणि त्यातून लाल-करड्या, काळ्या रंगाचा द्राव पाझरू लागतो. खोडांवर राखाडी-काळया रंगाचे डाग पडतात आणि नंतर व्रणात मिसळतात.
  • दुधी भोपळ्याच्या बियांवर मध्यम राखाडी, काळे डाग पडतात.

नियंत्रण:

  • निरोगी बियाणे वापरावे.
  • पुनर्रोपणाचे निरीक्षण करावे आणि संक्रमित रोपांना उपटून शेताबाहेर फेकावे.
  • हल्ल्याची लक्षणे आढळताच क्लोरोथालोनिल 75% WP @ 350 ग्रॅम/ एकर किंवा टेबुकोनाज़ोल 25.9% EC @ 200 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Alternaria leaf blight control in bottle gourd

दुधी भोपळ्यातील अंगक्षयाचे (एल्टरनेरिया) नियंत्रण

  • पानांवर पिवळे डाग पडतात. ते आधी राखाडी रंगाचे होऊन नंतर काळे पडतात.
  • हे डाग कडांपासून सुरू होऊन नंतर केन्द्रित होतात.
  • तीव्र लागण झालेल्या वेलांवर कोळशासारखी भुकटी जमा होते.
  • रोग रोखण्यासाठी शेतात स्वच्छता राखावी आणि पीक चक्र अवलंबावे.
  • बुरशिनाशक मॅन्कोझेब 75 % डब्ल्यू पी @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा हेक्साकोनाज़ोल 5% एससी @ 300 मिली/ एकर 10 दिवसांच्या अंतरावे फवारावे.
  • क्लोरोथालोनिल 75 डब्ल्यू पी @ 300  ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of mosaic virus in bottle gourd

दुधी भोपळ्यातील केवडा रोगाचे नियंत्रण

  • रोपे पुर्णपणे सुकतात. पानांवर पिवळे डाग पडतात.
  • रोपाची पाने खालील बाजूला मुडपतात आणि त्यांचा आकार सर्वसामान्य पानांहून लहान असतो.
  • फळांचा आकार बदलून लहान होतो. हा रोग माव्याद्वारे फैलावतो.

नियंत्रण: –

  • तण आणि रोगग्रस्त रोपे उपटल्याने संक्रमणाची शक्यता कमी होते.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरुन काही शेतकरी विषाणूचा फैलाव रोखतात.
  • इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) @ 100-120 मिली प्रति एकर किंवा अॅसीफट (75% SP ) @ 140- 200 ग्रॅम प्रति एकर वापरुन रोग फैलावणार्‍या किडीचे नियंत्रण करावे.

 

Share

Collar rot control in bottle gourd

दुधी भोपळ्यातील खोड कूज रोगाचे नियंत्रण

  • खोडाच्या आधारावर गडद राखाडी हिरव्या रंगाचे पाणी भरलेले डाग उमटतात. शेवटी संपूर्ण रोप मरते.
  • या रोगाच्या संक्रमण अवस्थेत पांढर्‍या रंगाच्या धाग्यासारख्या तंतुंचा विकास होतो.
  • ग्रस्त रोपे खोडापासून जमिनीतून उखडली जातात पण खोडाचा मुळे असलेला भाग जमिनीतच राहतो.
  • कार्बेन्डाजिम @ 2.5 ग्रॅम प्रति कि. ग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • बियाणी वाफ्यात वरवर पेरावीत.
  • मुळांजवळ मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाजिम 12% WP @  400 ग्रॅम / एकर किंवा थायोफनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर जिवाणूनाशक वापरुन ड्रेंचिंग करावे.
  • शेतात पूर्वी लावलेल्या पिकाचे अवशेष जमिनीत खोल गाडावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share