फळ माशीपासून भोपळ्याच्या पिकाचे संरक्षण कसे करावे?

How to avoid fruit borer in Bottle Gourd
  • एकच पीक एकाच शेतात सतत घेऊ नका, पीक चक्र अनुसरण करा.
  • प्रौढ माशी फुलांमध्ये अंडी घालते. अंडी अळ्या बनतात, आणि फळांच्या आतील भाग खातात आणि फळे सडतात.
  • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी, फवारणीआधी फळे काढून टाका.
  • संक्रमित फळांचा आकार खराब होतो आणि दुर्गंधी येते.
  • कीटकांची संख्या नियंत्रित करण्यासाठी फेरोमोन सापळे 4 प्रति एकर प्रमाणे लावा.
  • कीटकांच्या प्रतिबंधासाठी, प्रति एकर इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी 100 ग्रॅम + बिवारिया बेसियाना 250 ग्रॅम प्रति एकर दराने फवारणी करा.
  • क्लोरपायरिफॉस 20% ईसी 300 मिली दराने 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • बायफेंथ्रीन10% ईसी 400 मिली / एकर फवारणी करावी.
Share

दुधी भोपळ्यावरील अल्टरनारिया लीफ  ब्लाईट किंवा पानांच्या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण कसे करावे

image source -https://www.exportersindia.com/saravana-enterprises/fresh-bottle-gourd-dindigul-india-1371932.htm
  •       शेत स्वच्छ ठेवावे आणि आळीपाळीने पिके घेण्याची सवय ठेवावी. त्यामुळे या रोगास प्रतिबंध होतो. 
  •       दर दहा पंधरा दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी प्रति एकरी 400 ग्राम फवारावे किंवा
  •       किटाझिन 48.00 डब्ल्यू /डब्ल्यू प्रति एकरी 400 मिली दर 10-15 दिवसांनी फवारावे
  •       दर दहा दिवसाच्या अंतराने क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी प्रति एकरी 300 ग्रॅम फवारावे.
Share

 दुधी भोपळ्यावरील अल्टर्नेरिआ लीफ ब्लाईट (पानांचा बुरशीजन्य रोग) कसा ओळखावा?

दुधी भोपळ्यावरील पानांचा बुरशीजन्य रोग खालील लक्षणांवरून ओळखता येतो.

  •      पानांवर सुरुवातीला पिवळे डाग दिसतात ते नंतर तपकिरी रंगाचे होतात आणि जुने झाल्यावर शेवटी काळे बनतात
  •       ते साधारणपणे ते कडेला सुरू होतात आणि एककेंद्रीय वर्तुळे तयार करतात  
  •       खूप जास्त परिणाम झालेल्या वेली जळलेल्या कोळशाच्या प्रमाणे दिसतात
Share

दुधी भोपळा आणि दोडका शेतामध्ये जमिनीची तयारी करताना करायचे खत व्यवस्थापन

image source -https://d2yfkimdefitg5.cloudfront.net/images/stories/virtuemart/product/nurserylive-sponge-gourd-jaipur-long.jpg
  • पेरणी साठी जमिनीची तयारी करताना एकरी 8/10 टन सेंद्रिय खत घालावे.
  • नांगरणी करताना 30 किलो युरिया (नत्र), 70 किलो सुपर फॉस्फेट (स्फुरद), आणि 35 किलो म्युरेट ऑफ पोटाश (पालाश) घालावे.
  • युरियाची (नत्राची) उरलेली 30 किलो मात्रा रोपांना 8-10 पाने फुटल्यावर आणि पीक फुलोर्‍यावर येताना अशा दोन वेळा विभागून द्यावी.
Share

Control of Aphid in Bottle gourd

दुधी भोपळ्यातील माव्याचे नियंत्रण

  • ग्रस्त भाग पिवळा पडून आकसतो आणि वाकडा होतो. हल्ला तीव्र असल्यास पाने सुकतात आणि हळूहळू रोप मरते.
  • अ‍ॅसीफेट 75% एसपी @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली/ एकर किंवा
  • अ‍ॅसिटामिप्रिड 20% एसपी @ 150 ग्रॅम/ एकर या प्रमाणात शिंपडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Aphid in Bottle gourd

दुधी भोपळ्यातील मावा

  • शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांची वसाहत पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर असते. ते पानांच्या उतींमधील रस शोषतात.
  • ग्रस्त भाग पिवळा पडून सुकतो आणि वाकडा होतो. हल्ला तीव्र असल्यास पाने सुकतात आणि हळूहळू रोप मरते.
  • फळांचा आकार आणि गुणवत्ता घटते.
  • किडे पानांच्या पृष्ठभागावर किंवा रोपावर चिकटा सोडतात. त्यावर भुरा बुरशी वाढून रोपाचे प्रकाश संश्लेषण प्रभावित होते आणि रोपाची वाढ खुंटते.
  • भुरा बुरशीने ग्रस्त फळ आकर्षक नसल्याने त्याची किंमत कमी येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of fruit fly in bottle gourd

दुधी भोपळ्यातील फळ माशीचे नियंत्रण

  • अळ्या (लार्वा) फळात भोक पाडून रस शोषतात.
  • ग्रस्त फळे खराब होऊन गळतात.
  • माशी अंडी देण्याच्या भागाने फळात भोक पाडून हानी करते. या भोकांमधून फळांचा रस पाझरताना दिसतो.
  •  ग्रस्त फळे एकत्र करून नष्ट करावीत.
  • अंडी घालणार्‍या माशांचे नियंत्रण करण्यासाठी शेतात प्रकाश सापळे किंवा फेरोमोन ट्रॅप लावावेत. प्रकाश सापळ्यात माशा मारण्यासाठी 1% मिथाइल इंजीनाँल किंवा सिनट्रोनेला तेल किंवा अ‍ॅसीटिक आम्ल किंवा लॅक्टीक अ‍ॅसिड चे मिश्रण ठेवावे.
  • परागण झाल्यावर लगेचच तैय्यार होणार्‍या फळांना पाँलीथीन किंवा कागदाने झाकावे.
  • माशांचे नियंत्रण करण्यासाठी शेतात कारल्याच्या ओळींमध्ये मका लावावा. मक्याच्या रोपांची ऊंची जास्त असल्याने माशा त्यांच्या पानांखाली अंडी घालतात.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशा सुप्तावस्थेत नष्ट कराव्यात.
  • डायक्लोरोवोस 76% ईसी 250 से 500 मि.ली./ एकर किंवा
  • लॅम्ब्डा सायहलोथ्रिन 4.9% सीएस @ 200 मिली/ एकर किंवा
  • प्रोफेनोफॉस 40% ईसी + सायपरमेथ्रिन 4% ईसी @ 400 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms of Fusarium wilt

  • कारक जीव- फ्यूझेरियम ऑक्सिस्पोरम एफ.एस.पी. वासइन्फेक्टम
  • विल्ट हा कापसाचा एक मुख्य आजार आहे.
  • पानांचे रंग बदलणे काठा पासून सुरू होते आणि मध्यशिराच्या दिशेने पसरते.
  • नसा अधिक गडद, अरुंद आणि डागदार होतात.
  • रक्तवहिन्यासंबंधी ऊतक तपकीरी आणि काळे होणे.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Sowing method and seed rate of Bottle gourd

दुधी भोपळ्याची पेरणी करण्याची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण

  • चांगल्या अंकुरणासाठी पेरणीपुर्वी 24-48 तास बियाणे पाण्यात भिजवावे.
  • एक एकर जमीनिसाठी उन्नत वाणाचे 1 ते 1.5 कि. ग्रॅम बियाणे लागते.
  • एका खड्ड्यात चार पाच बिया पेराव्या.
  • अंकुरणानंतर दोन आठवड्यांनी रोगट आणि खुरटलेली रोपे उपटल्याने प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 निरोगी रोपे राहतील.
  • संकरीत आणि खासगी कंपनीच्या बियाण्याचे प्रमाण 300-500 ग्रॅम/ एकर असते. बियाण्याचे प्रमाण वाण आणि लागवडीच्या पद्धतीवर अवलंबून असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase flowering in Bottle gourd?

दुधी भोपळ्यातील फुलोरा कसा वाढवावा

  • दुधी भोपळ्याच्या मादी फुलांपासून जास्त फलधारणा होते आणि त्यामुळे उत्पादन वाढते.
  • वेलाला 6-8 पाने फुटल्यावरइथेलीन किंवा जिब्रेलिक आम्लाचे  0.25 -1ml प्रति 10 लीटर पाण्यात मिश्रण बनवून दुधी भोपळ्याच्या वेलांवर आणि फुलांवर फवारावे. त्यामुळे मादी फुले आणि फळांची संख्या दुप्पटपर्यंत वाढते.
  • या फवारणीचा परिणाम रोपावर 80 दिवस टिकतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share