दुधी भोपळ्यासाठी खताची मात्रा
- शेताची मशागत करताना एकरी 10 टन शेणखत मातीत मिसळावे.
- शेवटच्या नांगरणीच्या वेळी एकरी 30 कि. ग्रॅम यूरिया, 80 कि. ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 30 कि. ग्रॅम पालाश (पोटाश) मातीत मिसळावे.
- युरियाची उरलेली 30 कि. ग्रॅम मात्रा दोन ते तीन समान भागात विभागून द्यावी.
- फॉस्फरस, पालाश (पोटाश) ची संपूर्ण मात्रा आणि नत्राची (नायट्रोजन) एक तृतीयांश मात्रा प्रत्येक आळ्यात पेरलेल्या बियंपासून 8 ते 10 से.मी. अंतरावर पेरावी.
- शेतात नत्राचा (नायट्रोजन) अभाव असल्यास पाने आणि वेली पिवळ्या रंगाची होतात आणि वेलांची वाढ खुंटते.
- जमिनीत पोटॅशियमचा अभाव असल्यास रोपांची वाढ आणि पानांचा आकार कमी होऊन फुले गळतात आणि फलधारणा बंद होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share