Control strategies of Maize Stem Borer

मक्यातील खोड पोखरणार्‍या किडीचे नियंत्रण

  • ही मक्याच्या पिकावरील प्रमुख आणि सर्वाधिक हानी करणारी कीड आहे.
  • खोड पोखरणार्‍या किडीची अळी मक्याच्या खोडात शिरून भोक पाडते.
  • ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपांना पाणी आणि आहार मिळत नाही. रोपे हळूहळू पिवळी पडून सुकतात आणि मरतात.

नियंत्रण: –

  • पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फ़ोरेट 10%जी 4 किलो/एकर या प्रमाणात किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/एकर या प्रमाणात 50 किलो मातीत मिसळून पसरावे सिंचन करावे.
  • दाणेदार कीटकनाशक वापरलेले नसल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • किंवा पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • करटाप हाईड्रो क्लोराईड 50% SP 400 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>