- पाने, खोड आणि शेंगा रोगाची लागण होण्यास संवेदनशील असतात.
- शेंगांवर लालसर-तपकिरी रंगाचे लहान, थोडेसे पिचलेले डाग पडतात.
- हे डाग झपाट्याने वाढून रोपावर मोठे, गडद रंगाचे, पिचलेले व्रण तयार होतात.
- आद्र हवामानात या व्रणांमध्ये गुलाबी बीजाणू तयार होतात.
- पानांवरील लागणीमुळे विशेषतः वरील बाजूच्या शिरा काळ्या पडतात.
गव्हातील राखाडी तांबेर्याचे नियंत्रण
गव्हातील राखाडी तांबेर्याचे नियंत्रण
- हा रोग बुरशीजन्य आहे.
- याची लक्षणे 10-14 दिवसात दिसू लागतात.
- ही बुरशी पानांच्या वरील पृष्ठभागावरून सुरू होऊन बुडावर लाल-नारिंगी रंगाचे डाग पाडते. हे डाग 1.5 एम.एम. आकाराचे अंडाकृती असतात.
- या रोगाचा फैलाव 15 -20° से.ग्रे. तापमान असताना होतो.
- याचे जिवाणू हवा, पाऊस, सिंचनाद्वारे संक्रमण करतात.
नियंत्रण-
- पीक चक्र अवलंबावे.
- रोग प्रतिरोधक बियाणे पेरावे.
- बीजसंस्करण किंवा उर्वरक उपचार केल्याने पेरणीनंतर चार आठवडे तांबेर्याचे नियंत्रण होते आणि त्यानंतर औषधे वापरता येतात.
- एकच सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके पुन्हापुन्हा वापरू नये.
- कासुगामाईसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोरिड 45% डब्लू.पी. 320 ग्रॅम/एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ई.सी. 240 मिली /एकर या प्रमाणात फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareगव्हावरील तांबेऱ्याचे निदान
- पानावरील तांबेरा बुरशीमुळे होतो.
- रोगाचे पहिले लक्षण (बीजाणूकजनन) लागण झाल्यानंतर 10-14 दिवसांनी आढळून येते.
- पानाच्या तांबेरा रोगात लालसर-केशरी रंगाचे, 1.5 मिमी आकाराचे, गोल ते अंडाकार बीजाणू तयार करते .
- ते पानाच्या वरील बाजूला आढळतात. हे पानावरील तांबेरा आणि पानाच्या दोन्ही बाजूंच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या खोडावरील तांबेऱ्यातील फरक ओळखण्याचे लक्षण आहे.
- बीजाणूना गव्हावर यशस्वी हल्ला करण्यासाठी 15 ते 20º सेल्सियस तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनाने पानांवर निर्माण झालेली आद्रता आवश्यक असते.
लसूणच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांचा वापर
जवळपास सर्व प्रकारच्या मातीत लसूण पिकवता येतो. रेताड, गाळवट दुमट आणि चिकण लोम माती लसूणाच्या पिकासाठी सर्वोत्तम असते परंतु तो जड मातीतही पिकवता येतो. जड मातीत लसूणाचे पीक सर्या पाडून घ्यावे. माती शुष्क असावी आणि वाढीच्या वेळेस पाणी धरून ठेवण्याची क्षमता तिच्यात असावी. 6 – 7.5 हा आदर्श पीएच असतो. सुरूवातीला रोपाच्या वाढीसाठी नाइट्रोजन उर्वरक @ 40 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात द्यावे. मुळे चांगली धरण्यासाठी फॉस्फरस @ 20 किग्रॅ/ एकर या प्रमाणात द्यावे. पाने आणि कंदांच्या वाढीसाठी पोटाशियम @ 20 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात देणे महत्वाचे असते. सल्फर भरपूर प्रमाणात असल्याने लसूणची तीव्रता वाढते. फुटवा आल्यावर पाने विकसित होताना सल्फर 8 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात द्यावे. तसेच जमीन तयार करताना 4 – 6 टन/एकर या प्रमाणात झाईम किंवा शेणखत घालावे.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Shareभेंडीमधील तणाचे नियंत्रण
भेंडीमधील तणाचे नियंत्रण
- पेरणीपुर्वी खोल नांगरणी करावी.
- पीक चक्र अवलंबावे. त्यासाठी कोणतेही निमुळत्या पानांचे तृणधान्य किंवा लहान दाणे असलेले पीक लावावे.
- पेरणीनंतर 20, 40 आणि 60 दिवसांनी 2-3 वेळा निंदणी-खुरपणी करावी.
- पेरणीनंतर आणि अंकुरणापूर्वी ऑक्सीफ्लोरफेन 23.5 ई.सी. @ 200 मिली/एकर फवारावे.
- पेरणीनंतर 3 दिवसांनी पेंडीमेथलीन 30% ईसी @ 700 मिली प्रति एकर फवारावे.
- निमुळत्या पानांच्या तणासाठी 2 -3 पाने आलेली असल्याच्या अवस्थेत प्रोपाक्विजाफाप 10 % ईसी @ 400 मिली प्रति एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareटोमॅटोच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मात्रा
टोमॅटोच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मात्रा
- टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी अधिक उर्वरकांची आवश्यकता असते.
- पुनर्रोपणापूर्वी एक महिना शेतात 8-10 टन प्रति एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
- डीएपी 50 किलो/एकर, युरिया 80 किलों प्रति एकर आणि म्यूरेट ऑफ पोटाश 33 किलो /एकर या प्रमाणात वापरावे.
- रोपांचे पुनर्रोपण करण्यापूर्वी युरियाची अर्धी मात्रा आणि डीएपी आणि म्यूरेट ऑफ पोटाशची पूर्ण मात्रा शेतात मिसळावी.
- पुनर्रोपणानंतर 20-25 दिवसांनी युरियाची दूसरी मात्रा आणि 45-60 दिवसांनी तिसरी मात्रा द्यावी.
- झिंक सल्फेटची 10 किलो/एकर आणि बोरॉनची 4 किलो/एकर मात्रा उत्पादन वाढवण्यासह गुणवत्तेत सुधार घडवून आणते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareमक्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन
मक्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन
- मक्याची शेती सामान्यता पावसाळ्यास (जून मध्य-जुलै), हिवाळ्यात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) आणि वसंत ऋतुत (जानेवारी-फेब्रुवारी) केली जाते.
- पावसाळी पीक पावसावर आधारित तर हिवाळ्यातील आणि बसंत ऋतुतील पीक सिंचनाधारीत असते.
- हिवाळ्यातील आणि बसंत ऋतुतील पिकाचे पहिले सिंचन बीज अंकुरणानंतर 3-4 आठवड्यांनी करावे.
- बसंत ऋतुतील पिकाचे मार्च महिन्याचा मध्य होईपर्यंत 4-5 आठवड्यांनी सिंचन करावे आणि त्यानंतर 1-2 आठवडयांच्या अंतराने सिंचन करावे.
- पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या पुढील अवस्थात सिंचन करावे.
- पाच सिंचनास पुरेसे पाणी असल्यास – सहा पाने फुटलेली असताना, गुडघ्यापर्यंत उंची असताना, नरमंजिर्या फुटण्याच्या वेळी, 50 % स्री केसर फुटलेले असताना आणि दाणे भरण्याच्या वेळी.
- तीन सिंचनास पुरेसे पाणी असल्यास – गुडघ्यापर्यंत उंची असताना, 50 % स्री केसर फुटलेले असताना आणि दाणे भरण्याच्या वेळी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareगव्हाच्या पिकातील मुळावरील माव्याचे नियंत्रण
- गव्हाच्या पिकात सहसा नोव्हेंबर-फेब्रुवारी या काळात माव्याचा हल्ला होतो.
- पावसाळी पिकात आणि उशिरा पेरणी केलेल्या पिकात ही कीड जास्त हानी करते.
- गव्हाच्या बुडाजवळ लहान पिवळे डास आढळून येतात.
- त्यांनी रोपातला शोषल्याने रोपे पिवळी पडतात.
- हे कीटक विषाणूजन्य रोगांच्या फैलावास देखील मदत करतात.
- या किडीमुळे उत्पादनात 50% पर्यन्त घट येऊ शकते.
नियंत्रण-
- पिकाची पेरणी उशिरा करू नये.
- यूरियाचा अनावश्यक आणि अतिरिक्त वापर करू नये.
- उभ्या पिकावर इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 60-70 मिली प्रति एकर फवारावे.
- किंवा थायमेथॉक्ज़ाम 25% WG @ 100 ग्रॅम प्रति एकर खत/वाळू, मातीत मिसळावे आणि त्यानंतर सिंचन करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareभेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी
भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी
- फळांची लांबी सर्वाधिक होते तेव्हा त्यांची तोडणी करतात. तोडणी करताना फळे कोवळी आहेत याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
- 6 ते 8 सेमी लांब फळे निर्यातीस उपयुक्त असतात.
- भेंडीच्या फळांची तोडणी सामान्यता धारदार चाकू किंवा वाकड्या हुकसारख्या सुरीने केली जाते.
- भेंडीच्या झाडांवर टोचणारे रोम असतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी सूती कपडे आणि हातमोजे वापरावेत.
- शक्य असल्यास तोडणी सकाळी लवकर करावी.
- रात्री भेंडी ठेवावी लागल्यास पाणी शिंपडल्याने ती सकाळपर्यंत ताजी राहील.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareगव्हावरील लष्करी अळी/ कातर किड्यांचे नियंत्रण
गव्हावरील लष्करी अळी/ कातर किड्यांचे नियंत्रण:-
- पानगळ हे या किडीच्या उपस्थितीचे प्राथमिक लक्षण आहे.
- हिचे लार्वा पानांना हानी पोहचवतात.
- तीव्र लागण खूप विनाशकारी असू शकते. अशा परिस्थितीत लार्वा रोपांच्या वरील भागापर्यंत पोहोचून ओंब्यांच्या खालील भागाला कुरतडतात. काही प्रजाती मातीत राहून पिकाच्या मुळांना हानी पोहोचवतात.
- लष्करी अळी सकाळी आणि संध्याकाळी हानी करते.
नियंत्रण-
- या किडीचे लार्वा पानांच्या खालील बाजूस आढळतात. त्यांना सहजपणे हाताने पकडून नष्ट करता येते.
- पक्षांना आकर्षित करण्यासाठी एकरी 4-5 ‘’T’’ आकाराच्या खुंटया गाडाव्यात.
- रासायनिक उपचार करण्यासाठी इमामेक्टिन बेंजोएट (5% एस.जी) 100 ग्रॅम/एकर किंवा फिप्रोनिल (5% एस.सी) 400 मिली/एकरची फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share