टोमॅटोमधील मूळ, बुड पोखरणार्‍या सूत्रकृमिचे नियंत्रण

टोमॅटोमधील मूळ, बुड पोखरणार्‍या सूत्रकृमिचे नियंत्रण:-

हानी:-

  • पानांचा रंग फिकट पिवळा होतो.
  • सूत्रकृमिनी ग्रासलेल्या रोपाची वाढ खुंटते आणि रोप लहान राहते. संक्रमण तीव्र असल्यास रोप सुकून मरते.

नियंत्रण:-

  • प्रतिरोधक वाणे पेरावीत.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी.
  • निंबोणीची चटणी 80 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावी.
  • कार्बोफ्युरोन 3% G 8 किलो प्रति एकर ची मात्रा द्यावी.
  • पेसिलोमाइसेस लिलासिनास -1% डब्ल्यूपी वापरुन बीजसंस्करण 10 ग्रॅम / किलोग्रॅम बियाणे, 50 ग्रॅम/ वर्ग मीटर नर्सरी, 2.5 ते 5 किलो / हेक्टर जमीनीत देण्यासाठी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

श्वेत माशीमुळे होणारी हानी आणि तिचे नियंत्रण

 

श्वेत माशीमुळे होणारी हानी आणि तिचे नियंत्रण:-

  • श्वेत माशी ही रस शोषणारी कीड आहे. ती पानांच्या खालील बाजूवर वसाहत करते. ग्रासलेली रोपे प्रभावित होतात तेव्हा पंख आलेले वाढ झालेले किडे मोठ्या झुंडीने उडतात.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे रोपाच्या कोवळ्या भागातून रस शोषून रोपाची हानी करतात. त्यामुळे वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि उत्पादन घटते. रोपे कमजोर आणि रोगांसाठी अतिसंवेदनशील होतात.
  • माव्याप्रमाणे श्वेत माशीदेखील चिकटा सोडते. त्यामुळे पाने चिकट होतात आणि त्यांच्यावर काळी बुरशी वाढते.
  • ही कीड अनेक विषाणूजन्य रोगांच्या फैलावास जबाबदार आहे.
  • ती 250 हून अधिक पिकांना ग्रासते. यात लिंबू, लाल भोपळा, बटाटा, खिरा, द्राक्षे, टोमॅटो, मिरची इत्यादींचा समावेश आहे.
  • ट्रायज़ोफ़ॉस 40% ईसी 45 एमएल / 15 लीटर पाणी किंवा डायफेनथीओरोन 50% WP 20 ग्रॅम/ 15 लीटर पाणी किंवा अॅसिटामिप्रिड 20 एसपी 10 ग्रॅ/ 15 लीटर पाणी श्वेत माशीच्या विरोधात प्रभावी उपचार आहे.

Share

बटाट्यावरील पर्ण सुरळी विषाणूचे नियंत्रण

    • कोवळ्या पानांचा आकार खूप लहान असतो आणि ती सुरकुतलेली असतात. त्यांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.

 

  • विषाणूपासून मुक्त बियाणे वापरून रोगाचे नियंत्रण करता येते.
  • विषाणूमुक्त बियाणे माव्यापासून मुक्त भागात पेरा.

  • रोगाचा प्रसार करणारी माव्याची कीड योग्य ती कीटकनाशके वापरून नियंत्रित करता येते.

  • माव्याचे नियंत्रण करण्यासाठी असिटामीप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ/ 15 लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड  17.8% एसएल @ 10 मिली/15 लिटर पाणी फवारा.

 

 

Share

बटाट्यावर उशिरा पडलेल्या मर रोगाचे निदान

    • पानांच्या वरील बाजूस काळपट-करड्या रंगाची, पाणथळ, अंडाकार वर्तुळे उमटतात.

 

  • कार्बनडाझिम 12%+ मॅन्कोझेब 63% @ 300 ग्रॅ/ एकर.
  • थिओफॅनेट मेथील 70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅ/ एकर

  • क्लोरोथरलोनील 75% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅ/ एकर.

  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सिक्लोराईड 46% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅ/ एकर.

 

Share

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळ्यांचे नियंत्रण

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळ्यांचे नियंत्रण:-

  • वाढ झालेले आणि शिशु किडे कोवळी पाने आणि पाकळ्यांमधून रोपाचा रस शोषतात. पाने पूर्ण उमलत नाहीत. रोप खुरटलेले, तिरके, वाकडे होते आणि त्यावर पिवळे डाग पडतात.
  • बहुसंख्य पानांच्या कडांवर डाग आढळून येतात.
  • कोळयांच्या प्रभावी नियंत्रणासाठी विरघळणारे सल्फर 80% चे 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात पाण्यातील मिश्रण फवारावे.
  • हल्ला तीव्र असल्यास प्रोपरजाईट 57% 400 मिली. प्रति एकर 7 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण

बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण:-

  • विषाणूमुक्त बियाणे वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते.
  • मावा मुक्त जमिनीत बियाणे तयार करावे.
  • रोगवाहक माव्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त सम्पर्क/दैहिक कीटकनाशके वापरावीत.
  • माव्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी अॅसिटामिप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ / 15 लीटर पाण्यातून किंवा इमिडेकलोप्रिड 17.8% एसएल @ 10 एमएल / 15 लीटर पाण्यातून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीवरील केवडा रोगाचे नियंत्रण

भेंडीवरील केवडा रोगाचे नियंत्रण:-

  • हा रोग श्वेत माशी नावाच्या किडीमुळे होतो.
  • भेंडीच्या पिकाच्या सर्व अवस्थात हा रोग होतो.
  • या रोगामुळे पानांच्या शिरा पिवळ्या पडतात.
  • शिरा पिवळ्या पडल्यावर पाने मुडपतात.
  • रोगग्रस्त फळे फिकट पिवळी, विकृत आणि कडक होतात.

नियंत्रण:-

  • विषाणूग्रस्त रोपे आणि रोपांचे भाग उपटून नष्ट करावीत.
  • परभणी क्रांति, जनार्दन, हरिता, अर्का अनामिका आणि अर्का अभय अशा काही जाती व्हायरससाठी सहनशील असतात.
  • रोपांच्या वाढीच्या वेळेस उर्वरकांचा अतिरिक्त वापर करू नये.
  • शक्यतो भेंडीची पेरणी वेळेपूर्वी करावी.
  • शेतीत वापरली जाणारी सर्व अवजारे स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे उपकरणांच्या द्वारे रोगाचा प्रसार होणार नाही.
  • या रोगाने ग्रस्त पिकांसोबत भेंडीचे पीक घेऊ नये.
  • श्वेत माशीच्या नियंत्रणासाठी -5 चिकट सापळे रचावेत.
  • डाइमिथोएट 30% ई.सी. 250  मिली /एकरचे पाण्यातील मिश्रण फवारावे.
  • इमिडाइक्लोप्रिड 17.8% SL 80 मिली /एकरची मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीच्या पिकासाठी सिंचन

भेंडीच्या पिकासाठी सिंचन:-

  • पहिले सिंचन पाने फुटण्याच्या वेळी करावे.
  • उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • तापमान 400C असल्यास थोडे थोडे सिंचन करत राहावे. त्यामुळे मातीतील ओल टिकून राहील आणि उत्तम फलधारणा होईल.
  • पाणी साचणे किंवा रोपे सुकवणे टाळावे.
  • ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) पद्धतीने 85% पर्यन्त पाणी वाचवता येते.
  • फल/बीजधारणा होताना दुष्काळी परिस्थिति असल्यास पिकाची 70% पर्यन्त हानी होते.

नीचे दिए गए बटन पर क्लिक करके अन्य किसानों के साथ साझा करें।

Share

कारल्यावरील लाल भुंगेऱ्याचे निदान

  • अळी मुळांवर, रोपाच्या जमिनीखालील भागावर आणि जमिनीला टेकलेल्या फळांवर चरते.
  • हानी झालेली मुळे आणि जमिनीखालील खोडाचे भाग सॅप्रोलायटिक बुरशीच्या दुय्यम संसर्गाने सडू लागतात आणि वेलीवरील अपरिपक्व फळे वाळतात.
  • लागण झालेली फळे खाण्यास योग्य राहत नाहीत..
  • वाढ झालेले किडे पानांवर अधाशीपणे चरून भोके पाडतात.

बीजरोपे आणि कोवळ्या पानांवर त्यांचा भर असतो. त्यांच्यामुळे बीजरोपे मरूही शकतात.

Share