मक्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन
- मक्याची शेती सामान्यता पावसाळ्यास (जून मध्य-जुलै), हिवाळ्यात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) आणि वसंत ऋतुत (जानेवारी-फेब्रुवारी) केली जाते.
- पावसाळी पीक पावसावर आधारित तर हिवाळ्यातील आणि बसंत ऋतुतील पीक सिंचनाधारीत असते.
- हिवाळ्यातील आणि बसंत ऋतुतील पिकाचे पहिले सिंचन बीज अंकुरणानंतर 3-4 आठवड्यांनी करावे.
- बसंत ऋतुतील पिकाचे मार्च महिन्याचा मध्य होईपर्यंत 4-5 आठवड्यांनी सिंचन करावे आणि त्यानंतर 1-2 आठवडयांच्या अंतराने सिंचन करावे.
- पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या पुढील अवस्थात सिंचन करावे.
- पाच सिंचनास पुरेसे पाणी असल्यास – सहा पाने फुटलेली असताना, गुडघ्यापर्यंत उंची असताना, नरमंजिर्या फुटण्याच्या वेळी, 50 % स्री केसर फुटलेले असताना आणि दाणे भरण्याच्या वेळी.
- तीन सिंचनास पुरेसे पाणी असल्यास – गुडघ्यापर्यंत उंची असताना, 50 % स्री केसर फुटलेले असताना आणि दाणे भरण्याच्या वेळी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share