गव्हावरील लष्करी अळी/ कातर किड्यांचे नियंत्रण

गव्हावरील लष्करी अळी/ कातर किड्यांचे नियंत्रण:-

  • पानगळ हे या किडीच्या उपस्थितीचे प्राथमिक लक्षण आहे.
  • हिचे लार्वा पानांना हानी पोहचवतात.
  • तीव्र लागण खूप विनाशकारी असू शकते. अशा परिस्थितीत लार्वा रोपांच्या वरील भागापर्यंत पोहोचून ओंब्यांच्या खालील भागाला कुरतडतात. काही प्रजाती मातीत राहून पिकाच्या मुळांना हानी पोहोचवतात.
  • लष्करी अळी सकाळी आणि संध्याकाळी हानी करते.

नियंत्रण-

  • या किडीचे लार्वा पानांच्या खालील बाजूस आढळतात. त्यांना सहजपणे हाताने पकडून नष्ट करता येते.
  • पक्षांना आकर्षित करण्यासाठी एकरी 4-5 ‘’T’’ आकाराच्या खुंटया गाडाव्यात.
  • रासायनिक उपचार करण्यासाठी इमामेक्टिन बेंजोएट (5% एस.जी) 100 ग्रॅम/एकर किंवा फिप्रोनिल (5% एस.सी) 400 मिली/एकरची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>