श्वेत माशीमुळे होणारी हानी आणि तिचे नियंत्रण:-
- श्वेत माशी ही रस शोषणारी कीड आहे. ती पानांच्या खालील बाजूवर वसाहत करते. ग्रासलेली रोपे प्रभावित होतात तेव्हा पंख आलेले वाढ झालेले किडे मोठ्या झुंडीने उडतात.
- शिशु आणि वाढ झालेले किडे रोपाच्या कोवळ्या भागातून रस शोषून रोपाची हानी करतात. त्यामुळे वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि उत्पादन घटते. रोपे कमजोर आणि रोगांसाठी अतिसंवेदनशील होतात.
- माव्याप्रमाणे श्वेत माशीदेखील चिकटा सोडते. त्यामुळे पाने चिकट होतात आणि त्यांच्यावर काळी बुरशी वाढते.
- ही कीड अनेक विषाणूजन्य रोगांच्या फैलावास जबाबदार आहे.
- ती 250 हून अधिक पिकांना ग्रासते. यात लिंबू, लाल भोपळा, बटाटा, खिरा, द्राक्षे, टोमॅटो, मिरची इत्यादींचा समावेश आहे.
- ट्रायज़ोफ़ॉस 40% ईसी 45 एमएल / 15 लीटर पाणी किंवा डायफेनथीओरोन 50% WP 20 ग्रॅम/ 15 लीटर पाणी किंवा अॅसिटामिप्रिड 20 एसपी 10 ग्रॅ/ 15 लीटर पाणी श्वेत माशीच्या विरोधात प्रभावी उपचार आहे.
Share