कांदा आणि लसूणच्या खोड आणि कंदामधील सूत्रकृमी:- सूत्रकृमी रोपाच्या मुख किंवा जखमांमार्फत रोपांमध्ये प्रवेश करते आणि रोपांमध्ये गाठी किंवा रोगट वाढ निर्माण करतात. त्यामुळे बुरशी आणि जिवाणू यासारख्या माध्यमिक रोगकारकांना रोपात प्रवेश मिळतो. वाढ खुंटणे, कंद रंगहीन होणे व सूज येणे ही सूत्रकृमीच्या लागणीची लक्षणे आहेत.
उपाय:- •
- रोगयुक्त कंद बियाण्यासाठी ठेवू नयेत.
- शेत आणि उपकरणे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कारण सूत्रकृमी लागण झालेल्या रोपांच्या अवशेषात जीवंत राहतात आणि पुन्हा उत्पन्न होतात.
- सूत्रकृमींच्या चांगल्या नियंत्रणासाठी कार्बोफ्यूरॉन 3% दाणेदार @ 10 किग्रॅ / एकर जमिनीत मिसळून द्यावे.
- सूत्रकृमींच्या के कार्बनिक नियंत्रणासाठी निंबाची पेंड @ 200 किग्रॅ / एकर जमिनीत मिसळून द्यावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share