Role of Potassium In Plant Growth

रोपांच्या वाढीत पोटॅशियमची भूमिका

पोटॅशियम (K) अनिवार्यपणे झाडांच्या शारीरिक प्रक्रियांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. त्यामुळे रोपांच्या योग्य वाढीसाठी आणि प्रजननासाठी पोटॅशियम अत्यावश्यक आहे. जेठावर रोपांना आवश्यक पोषक तत्वांचा संबंध आहे तेथवर नायट्रोजननंतर पोटॅशियम महत्वपूर्ण मानले जाते. रोपाच्या अनेक जैविक आणि रासायनिक प्रक्रियांमध्ये त्याचे योगदान असल्याने त्याला “गुणवत्ता पोषक तत्व” असेही म्हणतात. रोपांमध्ये पोटॅशियम पुढील भूमिका बजावते:-

प्रकाश संश्लेषणात पोटॅशियम स्टोमेटाच्या उघडण्या-बंद होण्याला नियंत्रित करते आणि त्याद्वारे CO2 ग्रहण नियंत्रित करते.

पोटॅशियम एंझाइम्सच्या क्रियेला सक्रिय करते आणि अ‍ॅडेनोसिन ट्रायफॉस्फेट (एटीपी)च्या निर्मितीसाठी आवश्यक असते. एटीपी रोपाच्या उतींमध्ये होणार्‍या अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्वाचा ऊर्जा स्रोत असते.

रोपांमधील पाण्याच्या व्यवस्थापनात (वाष्प-नियमन) पोटॅशियम प्रमुख भूमिका निभवते. पोटॅशियमच्या माध्यमातून रोपे मुळातून पाणी शोषतात आणि स्टोमेटामुळे पाण्याची हानी प्रभावित होते.

शुष्क प्रतिरोध वाढवण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असते.

रोपात प्रोटीन आणि स्टार्च संश्लेषणासाथी पोटॅशियमची आवश्यकता असते. प्रोटीन संश्लेषणाच्या जवळपास प्रत्येक चरणात पोटॅशियम आवश्यक असते. स्टार्च संश्लेषण प्रक्रियेला जबाबदार एंझाइम पोटॅशियमद्वारा सक्रिय होते.

एंझाइम्सचे सक्रियण – रोपातील वाढीशी संबंधित अनेक एंझाइम्सच्या सक्रियणात पोटॅशियम महत्वपूर्ण भूमिका बजावते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>