कलिंगडासाठी वाढ नियामकांचा वापर:- कलिंगडात हार्मोन उपचार करण्यासाठी पिकास उपयुक्त असलेले आणि ज्यांचा कलिंगडाच्या पिकावर अनिष्ट परिणाम होणार नाही, ज्यांच्यामुळे कलिंगडाची फळे धरणार्या मादी फुलांची संख्या वाढेल, ज्यांच्यामुळे अधिक उत्पादन मिळेल असेच हार्मोन्स वापरावेत. या उद्दिष्टांसाठी कलिंगडाच्या शेतीत चांगल्या उत्पादनासाठी हार्मोन उपचार महत्वपूर्ण ठरतात.
कलिंगडाच्या वेलास 2-4 पाने फुटल्यावर इथ्रेल च्या 250 पी.पी.एम (4 मिली./पम्प) मिश्रणाची फवारणी केल्यास मादी फुलांची संख्या वाढते आणि उत्पादन अधिक होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share