रोपात फॉस्फरसची भूमिका
सर्व जीवांसाठी फॉस्फरस (P) आवश्यक असतो. रोपांच्या नैसर्गिक विकास आणि परिपक्वतेसाठी फॉस्फरस लागतो. फॉस्फरस रोपांमध्ये प्रकाश संश्लेषण, श्वसन, ऊर्जा साठवण आणि हस्तांतरण, कोशिका विभाजन, कोशिका विकास आणि इतर अनेक प्रक्रियात भूमिका बजावतो. फॉस्फरस हा सर्व जीवितांचे आनुवांशिक “स्मृति एकक” असलेल्या डीएनए चा महत्वपूर्ण घटक असतो. फॉस्फरस रोपांचे “ऊर्जा एकक” असलेल्या एटीपीचा महत्वपूर्ण घटक असतो. अशाप्रकारे सर्व वनस्पतींच्या निरोगीपणा आणि शक्तीसाठी फॉस्फरस आवश्यक असतो. वाढीचे पुढील घटक फॉस्फरसशी संबंधित असतात:
- मुळांच्या विकासास चालना देणे
- खोड आणि फांद्यांची शक्ती वाढवणे
- चांगला फुलोरा आणि बीज उत्पादन
- पिकाची अधिक समान आणि लवकर परिपक्वता
- द्विदलांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण क्षमता वाढवणे
- पिकाच्या गुणवत्तेत सुधारणा
- रोपांमधिल रोग प्रतिकार शक्तीत वाढ
- संपूर्ण जीवनचक्राच्या दरम्यान विकासात मदत
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share