Girdle beetle in Soybean

सोयाबीनवरील मेखला कीड (गर्डल बीटल):- या किडीला रिंग कटर असेही म्हणतात. या किडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर सर्वात जास्त परिणाम होतो.

हानीची लक्षणे:-

  • खोडाला आतून लार्वा खातो आणि त्यात भोक पडते.
  • संक्रमित भागातील रोपाच्या पानांना पोषक तत्वे मिळत नाहीत आणि ती वाळतात.
  • नंतर रोपजमिनीपासून सुमारे 15 ते 25 सेमी अंतरावर तुटते.

नियंत्रण:-

  • उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करावी.
  • मका किंवा ज्वारीबरोबर सोयाबीन लावू नये.
  • पीक चक्राचा वापर करावा.
  • अतिरिक्त नायट्रोजन उर्वरकांपासून सावध रहावे.
  • 10 दिवसातून किमान एक वेळा रोपाच्या रोपग्रस्त भागांना काढून टाकावे आणि त्यांना खताच्या खड्ड्यात गाडावे.

प्रतिबंध:-

  • पेरणीच्या वेळी फोरेट 10 G @ 10 किलो / हेक्टर किंवा कार्बोफूरॉन 3 G @ 30 किलोग्रॅम/ हेक्टर घालावे.
  • क्विनालफॉस 25% EC किंवा ट्रायजोफॉस 40% EC @ 3 मिली / लीटर पाण्याची फवारणी पीक 30-35 दिवसांची असताना करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Doses of Fertilizer and Manure in Onion Crop

कांद्याच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • कांद्याची चांगल्या उत्पादनासाठी उर्वरकांची अधिक आवश्यकता असते.
  • रोपण केल्यावर एका महिन्यात शेणखताची 8-10 टन प्रति एकर मात्रा द्यावी.
  • नायट्रोजन 50 किलो/एकर, फॉस्फरस 25 किलों प्रति एकर आणि पोटाश 30 किलो /एकर
  • रोपणापूर्वी नायट्रोजनची अर्धी मात्रा आणि फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्रा मातीत मिसळावी.
  • रोपणानंतर 20-25 दिवसांनी नायट्रोजनची दुसरी आणि 45-60 दिवसांनी तिसरी मात्रा द्यावी.
  • झिंक सल्फेटची 10 किलो/एकर आणि बोरॉनची 4 किलो/एकर मात्रा उत्पादन वाढवते आणि कंदांची गुणवत्ता सुधारते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Co-operative Farming boost the income Of Farmers

सहकारी शेती शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवू शकते:-
सहकारी शेतीचा संदर्भ अशा संघटनेशी आहे जिच्यात सदस्य असलेला प्रत्येक शेकातरी व्यक्तिगत रूपात आपल्या जमिनीचा मालक राहतो पण शेती संयुक्त रूपात केली जाते. फायदा सदस्य-शेतकर्‍यांच्यामध्ये मालकीच्या जमिनीच्या प्रमाणात वाटून घेतला जातो. मजुरी सदस्य-शेतकर्‍यांमध्ये काम केलेल्या दिवसांच्या प्रमाणात वाटून घेतली जाते.

     “आज शेतकरी (शेतीशी संबंधित सामान) किरकोळीच्या भावात खरेदी करतात आणि ठोक भावात (उत्पादनाची) विक्री करतात. याच्या उलटे केले जाऊ शकते काय? त्यांनी खरेदी ठोक भावात (इनपुट) केल्यास आणि किरकोळीच्या भावात विक्री केल्यास त्यांना कोणीही, अगदी दलाल देखील, लुटू शकणार नाही.

फायदे :-

  • शेताचा आकार, कूपनलिका, ट्रॅक्टरचा वापर करण्याचा प्रति हेक्टर खर्च कमी होतो.
  • सहकारी समिति शेतकर्‍यांना उत्पादन आणि नंतरच्या पिकाचे व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शन पुरवते, तसेच साक्षरता, व्यापार किंवा विपणनाबाबतचे शिक्षण याबाबत शिक्षण देते. ते त्याचा मानवी भांडवल म्हणून वापर करू शकतात.
  • सहकारी समित्या लोकशाही आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित असल्याने  त्या खास करून विकसनशील देशातील महिलांचे सबळीकरण करण्यात ठोस भूमिका बजावू शकतात.
  • सहकारी समित्या शेतकर्‍यांची सौदेबाजी करण्याची क्षमता वाढवणे, कर्ज मिळवणे सुलभ करणे, खर्च कमी करणे आणि माहिती मिळवण्यास सहाय्यक ठरतात.
  • सर्व लघु आणि सीमांत शेतांचे एकत्रीकरण करून, सहकारी शेतीचे मोठ्या प्रमाणातील शेतीचे सर्व लाभ मिळवू शकतात. बियाणे, उर्वरके अशा शेतीविषयक सामग्रीची (इनपुट) खरेदी करताना समिति ते ठोकीने मिळवू शकते आणि अशा प्रकारे खर्चात घट होते.
  • ट्रॅक्टर, कापणी मशीन अशी मोठी यंत्रे संघटनेद्वारे खरेदी केली जाऊ शकतात आणि शेती अधिक वैज्ञानिक तंत्राच्या आधारे करता येऊ शकते.

“आपण व्यक्तिहून समुहाच्या स्वरुपात जास्त मजबूत असतो. सहकारी आणि सामुहिक पद्धतीने विचार करा, स्थानीय खाद्यकेंद्रे स्थापन करा आणि समुदाय बनवा.”

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit Rot and Dieback in Chillies

मिरचीतील फळ कुजव्या आणि डायबेक रोगाचे नियंत्रण

मिरचीतील फळ कुजव्या आणि डायबेक रोग:- याची लक्षणे फुलोरा आल्यावर आढळून येतात. पानांवर काळे डाग पडतात आणि रोप मधून तुटते. फुले सुकतात आणि रोप वरुन खाली सुकत जाते.

नियंत्रण:- रोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी थायोफिनेट मिथाईल 70% @ 30 ग्रॅम/पंप किंवा हेक्झाकोनाझोल 5 % +केपटान 70% WP @ 25 ग्रॅम/पम्प फवारावे. पहिली फवारणी फुलोरा येण्यापूर्वी, दुसरी फलधारणा सुरू होताच आणि तिसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Yellow Mosaic Virus in Legumes crops

द्विदल धान्यांच्या पिकावरील केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस)

केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस):- केवडा रोगाचा (पिवळा मोझेक व्हायरस)  उपद्रव मुख्यत्वे खरीपाच्या हंगामात सोयाबीन, उडीद, मूग आणि इतर काही पिकांमध्ये होतो. सोयाबीन, उडीद इत्यादि पिकांची केवडा रोगामुळे मोठी हानी होते. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा रोग 4-5 दिवसात शेतात सर्वत्र पसरतो आणि पीक पिवळे पडू लागते. या रोगाच्या प्रसारात पांढर्‍या माशीचा महत्वाचा सहभाग असतो.

रोग पसरण्याची मुख्य कारणे:-

  • रस शोषणारी कीड आणि पांढरी माशी या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करते.
  • योग्य ते बीजसंस्करण न करणे, माहितीचा अभाव आणि दीर्घकाळ पडलेला दुष्काळ हे घटक देखील विषाणूच्या प्रसारास जबाबदार असतात.
  • कीटकनाशकांचा अतिवापर, योग्य माहिती नसताना औषधांचे मिश्रण फवारणे.
  • योग्य ते पीक चक्र स्वीकारण्यातील शेतकर्‍यांचे अपयश याचे मुख्य कारण असते.
  • शेताभोवतीच्या बांधांची साफसफाई न करण्याने देखील रोगाचा फैलाव होतो.
  • पांढरी माशी रोपच्या पानावर बसून रस शोषते आणि तेथेच लाळ गाळते. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढतो.

रोगाची लक्षणे:-

  • सुरुवातीच्या काळात गडद पिवळे दाग दिसू लागतात.
  • रोगग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • रोगग्रस्त रोपांच्या पानांमधील शिरा स्पष्ट दिसू लागतात.
  • रोपांची पाने खरखरीत होतात.
  • ग्रस्त रोप खुरटते.

प्रतिबंधाचे उपाय :-

यांत्रिक पद्धती:-

  • सुरुवातीलाच ओगग्रस्त रोपांना उपटून जाळून टाकावे.
  • शेतातील पांढर्‍या माशीला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक हेक्टरात 5-6 पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
  • पिकाच्या चहुबाजूला झेंडूची लागवड करून सापळा रचावा.

जैविक पद्धत:-

  • सुरुवात होताच रोपांवर  प्रत्येक हेक्टरसाठी 1-1.5 ली.निंबोणीचे तेल+चिकट पदार्थ+200-250 ली. पाण्याच्या मिश्रणाच्या मात्रेची फवारणी करावी.
  • 2 किलो शेवग्याची पाने बारीक वाटून 5 ली. गोमूत्र आणि 5 ली. पाण्यात मिसळून ठेवावे. 5 दिवसांनी हे मिश्रण गाळून घ्यावे. 500 मिलीलीटर मिश्रण 15 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. हे पिकासाठी टॉनिक म्हणून कार्य करते.

रासायनिक पद्धत:-

  • डायमिथिएट  250-300 मिलीलीटर  किंवा थायोमेथाक्सोम 25WP 40 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 40 मिलीलीटर किंवा अ‍ॅसिटामाप्रीड 40 ग्रॅम प्रति एकर 200-250 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Pumpkin Production

दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान:-

  • ऊष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी उपयुक्त असते.
  • निम शुष्क आणि थंड वातावरण देखील या पिकासाठी अनुकुल असते.
  • या पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18-22 C आणि 30-35 C यादरम्यान असावे. 25-30 C तापमानात बीज अंकुरण वेगाने होते.
  • अनुकूल तापमान असताना रोपावरील मादी फुले आणि फळांच्या संख्येत वाढ होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of Transplanting of Chilli

मिरचीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • मिरचीची पेरणी जुलै ते सप्टेंबर या काळात केली जाते.
  • मिरचीच्या पेरणीसाठी ऑगस्टचा महिना सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबरचा महिना उत्तम असतो.
  • ऑगस्ट महिन्यात एरणी केल्यास रोपांची वाढ आणि उत्पादन यात वाढ होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Soybean

सोयाबीनच्या पिकातील तणावर नियंत्रण

  1. यांत्रिक पद्धत (कामगारांकडून निंदणी आणि कुदळणी):- सोयाबीनमध्ये 20-25 दिवसांनी आणि 40 -45 दिवसांनी अशी दोन वेळा निंदणी करणे आवश्यक असते. शक्यतो पेरणीनंतर 30 दिवसांनी कुदळणी करावी. कुदळणी करताना रोपांच्या मुळांना हानी होणार नाही अशी खबरदारी घ्यावी.
  2. तणनाशक रसायनांचा वापर:- शिफारस केलेल्या तणनाशकाचे 700 -800 लीटर पाण्यात मिश्रण करून त्याची फवारणी करावी. त्यासाठी फवारणी यंत्रात फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून त्याचा उपयोग करावा. फवारणी ओलसर जमिनीवरच करावी. सोयाबीनच्या पिकासाठी शिफारस केलेल्या तणनाशकापैकी एखाद्याचाच वापर करावा आणि दरवर्षी रसायन बदलून वापरावे.

सोयाबीनच्या पिकासाठी शिफारस करण्यात आलेली तणनाशके

वापरासाठी योग्य वेळ रासायनिक नाव मात्रा/ हे
पेरणीपुरवी 1 फ्लुक्लोरालीन 2.2 लीटर
2 ट्राईफ्लुरालीन 2.0 लीटर
पेरणीनंतर लगेचच 1 मेटालोक्लोर 2 लीटर
2 क्लोमाझोन 2 लीटर
3 पेंडीमेथालीन 3.25 लीटर
4 डाक्लोरोसुलन 26 ग्रॅम
पेरणीनंतर 10-15 दिवसांनी 1 क्लोरोम्युरान इथाइल 36 ग्रॅम
पेरणीनंतर 15-20 दिवसांनी 1 इमेझेथापर 1 लीटर
2 क्बिज़ेलोफाप इथाइल 1 लीटर
3 फेनाक्सीफ्रोप इथाइल 0.75 लीटर
4 प्रोपाक्विजाफोप 0.75 लीटर

source:- https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soybean Seed Treatment

सोयाबीनचे बीजसंस्करण:- सोयाबीनच्या पेरणीपुरवी कार्बाक्सिन 37.5% + थायरम 37.5 WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल मात्रा वापरुन बिजसंस्करण करावे किंवा सोयाबीनचे बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाझिम 12 % + मॅन्कोझेब 63% WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल ही किंवा थायोफिनेट मिथाईल 45% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% FS 200 मिली प्रति क्विंटल ही मात्रा वापरावी. त्यानंतर कीटकनाशक ईमिडाक्लोरप्रिड 30.5% SC 100 मिली प्रति क्विंटल किंवा थायमेथोक्साम 30% FS 250 मिली प्रति क्विंटलने सोयाबीनचे बीजसंस्करण केल्यास रस शोषक किडिपासून 30 दिवसांपर्यंत संरक्षण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate, sowing time and sowing method of Soybean

सोयाबीनच्या बियाण्याचे प्रमाण, पेरणीसाठी योग्य वेळ आणि पेरणीची पद्धत:-

बियाण्याचे प्रमाण:- वेगवेगळ्या वाणाच्या बियाण्याच्या आकारानुसार सामान्य अंकुरण क्षमता असलेल्या पुढील बियाण्याचा खालील प्रमाणात वापर करावा:- (1) लहान दाणे असलेली वाणे – 28 किलो प्रति एकर (2) मध्यम दाणे असलेली वाणे – 30 ते 32 किलो प्रति एकर (3) मोठे दाणे असलेली वाणे– 36 किलो प्रति एकर. |

पेरणीसाठी योग्य वेळ:- 20 जून ते जुलै महिन्याचा पहिला आठवडा हा कालावधी पेरणीसाठी उचित काळ असतो. सुमारे 3-4 इंच पाऊस झालेला असताना पेरणी सुरू करावी. उशिरा पेरणी करावी लागल्यास बियाण्याचे प्रमाण सव्वा पट वाढवावे आणि दोन ओळींमधील अंतर 30 सेमी. ठेवावे. उशिरा पेरणी केल्यास लवकर तयाऱ होणार्‍या जातीची लागवड करावी.

पेरणीची पद्धत:- सोयाबीनची पेरणी ओळींमध्ये करावी. बियाण्याला दोन ओळीत 45 से.मी. अंतर सोडून 3-5 सेमी. खोलीवर पेरावे. पेरणीसाठी सीडड्रिल आणि फ़र्टिलाइज़र वापरल्याने खत खाली आणि बियाणे वर असे खत आणि बियाण्याचे वेगवेगळे रोपण करता येते. बियाणे आणि उर्वरक यांचा पेरणी करताना एकत्र वापर करू नये.

स्रोत:- https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share