Seed rate, sowing time and sowing method of Soybean

सोयाबीनच्या बियाण्याचे प्रमाण, पेरणीसाठी योग्य वेळ आणि पेरणीची पद्धत:-

बियाण्याचे प्रमाण:- वेगवेगळ्या वाणाच्या बियाण्याच्या आकारानुसार सामान्य अंकुरण क्षमता असलेल्या पुढील बियाण्याचा खालील प्रमाणात वापर करावा:- (1) लहान दाणे असलेली वाणे – 28 किलो प्रति एकर (2) मध्यम दाणे असलेली वाणे – 30 ते 32 किलो प्रति एकर (3) मोठे दाणे असलेली वाणे– 36 किलो प्रति एकर. |

पेरणीसाठी योग्य वेळ:- 20 जून ते जुलै महिन्याचा पहिला आठवडा हा कालावधी पेरणीसाठी उचित काळ असतो. सुमारे 3-4 इंच पाऊस झालेला असताना पेरणी सुरू करावी. उशिरा पेरणी करावी लागल्यास बियाण्याचे प्रमाण सव्वा पट वाढवावे आणि दोन ओळींमधील अंतर 30 सेमी. ठेवावे. उशिरा पेरणी केल्यास लवकर तयाऱ होणार्‍या जातीची लागवड करावी.

पेरणीची पद्धत:- सोयाबीनची पेरणी ओळींमध्ये करावी. बियाण्याला दोन ओळीत 45 से.मी. अंतर सोडून 3-5 सेमी. खोलीवर पेरावे. पेरणीसाठी सीडड्रिल आणि फ़र्टिलाइज़र वापरल्याने खत खाली आणि बियाणे वर असे खत आणि बियाण्याचे वेगवेगळे रोपण करता येते. बियाणे आणि उर्वरक यांचा पेरणी करताना एकत्र वापर करू नये.

स्रोत:- https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>