Irrigation in Cauliflower

फूलकोबीच्या पिकाचे पाणी व्यवस्थापन:-

  • भरघोस पिकासाठी पुरेशी ओल टिकवणे आवश्यक आहे.
  • रोपणानंतर थोडे पाणी द्यावे.
  • ओल टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार 10-15 दिवसांच्या अंतराने थोडे थोडे पाणी देत राहावे.
  • उशिराच्या आणि मध्य हंगामातील पीक पावसावर अवलंबून असते. |
  • फुलोरा येण्याच्या आणि गड्डे विकसित होण्याच्या काळात ओल टिकवणे खूप आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Germination before sowing in bitter gourd

कारल्याच्या बियाण्याचे पेरणीपूर्वीचे अंकुरण:-

  • कारल्याच्या बियांचे आवरण कडक असते. त्यामुळे 2-3 महीने जुन्या बियांना रात्रभरासाठी पाण्यात भिजवून ठेवावे.
  • बियांना चांगले अंकुर फुटण्यासाठी 1-2 दिवस ओल्या कापडात गुंडाळून ठेवावे.
  • अंकुरण झाल्यावर लगेचच बियाणे पेरावे.
  • बियाणे 2 सेमी. खोल पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of planting of Cauliflower

फूलकोबीच्या रोपणासाठी सुयोग्य वेळ

  • उशिराने घेतल्या जाणार्‍या जातींची पेरणी मे ते जून या दरम्यान केली जाते.
  • हंगामाच्या मध्यकाळातल्या जातींची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या मध्याच्या दरम्यान केली जाते.
  • हंगामाच्या मध्यकाळात उशिरा केल्या जाणार्‍या जातींची पेरणी ऑगस्ट महिन्यात करतात.
  • उशिराने केल्या जाणार्‍या जातींची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या मध्याच्या दरम्यान केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cabbage:-

पानकोबीसाठी शेताची मशागत:-

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून मातीला भुसभुशीत करावे आणि कुळव चालवून सपाट करावे.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.
  • हंगाम आणि जमिनीच्या पोतानुसार वाफ्यात, सरींमध्ये आणि नळयात पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Coriander

कोथिंबीरीतील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • नांगरणीच्या पूर्वी 25 टन शेणखत, एझोस्पिरिलियम आणि पीएसबी कल्चर 2-2 kg प्रति हेक्टर द्यावे.
  • 100 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस आणि 50 पोटाश प्रति हेक्टर दोन भागात अर्धी मात्रा पेरणीपुर्वी आणि अर्धी पेरणीनंतर 30 दिवसांनी असे द्यावे.
  • 50 किलो मॅग्नीशियम सल्फेट प्रति हेक्टर पेरणीपुर्वी द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of White fly in Green Gram

मुगातील पांढर्‍या माशीचे नियंत्रण

मुगातील पांढर्‍या माशीचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील भागातून रस शोषतात आणि चिकट द्राव सोडून प्रकाश संश्लेषणात अडथळा आणतात.
  • पाने रोगग्रस्त दिसतात, सुटी मोल्डने झाकली जाते. ही कीड पिवळा शिरांचे मोज़ेक विषाणू आणि पान मुरड रोगाची वाहक असते.
  • नियंत्रण:- पिवळ्या रंगाचे चिकट कागद शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • डायमिथोएट 30 मिली./पम्प किंवा थायमेथोक्जोम 5 ग्रॅम/पम्प किंवा एसीटामीप्रिड 15 ग्रॅम/ पम्प ची फवारणी 10 दिवसांच्या अंतराने 4-5 वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation for Ginger/Turmeric

आले/हळदीसाठी शेताची मशागत:-

  • जमीन 20 सेमी. खोल नांगरावी.
  • ढेकळे फोडावीत.
  • त्यानंतर पुन्हा आडवी नांगरणी करावी.
  • सुमारे 25 टन शेणखत प्रति हे. ची मात्र द्यावी.
  • खत मिसळण्यासाठी बखर फिरवावी.
  • त्यानंतर लेव्हलर वापरुन जमीन समपातळीत आणावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Cotton

कापसासाठी शेताची मशागत:-

  • शेताची चार वेळा नांगरणी करून त्यानंतर कुळव फिरवून जमीन नरम, भुसभुशीत आणि सपाट करावी.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणी पेंड आणि कोंबडी खत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते आणि उर्वरकांची मात्रा कमी करता येते.
  • फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्र आणि नायट्रोजनची 25 ते 33 टक्के मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Coriander

कोथिंबीरीसाठी शेताची मशागत:-

  • शेतात दोन वेळा खोल नांगरणी करून आणि दोन किंवा तीन फेर्‍यात वखर चालवून मातीला भुसभुशीत करावे आणि आवश्यक असल्यास कुळव चालवून सपाट करावे.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • कोथिंबीरीचे पीक सपाट जमिनीवर घेतात.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Red Pumpkin Beetle in Bitter Gourd

कारल्यातील लाल किड्यांचे नियंत्रण:-

  • अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीच्या संपर्कात येणारी फळे खातात.
  • ग्रसित मुळे आणि भूमिगत भागावर त्यानंतर मृतजीवी बुरशी हल्ला करते. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
  • ग्रसित फळे वापरास निरुपयोगी असतात.
  • बीटल पाने खाऊन त्यात भोके पाडतात.
  • लहान असताना बीटलचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानी करतात. त्याने रोपे मरतात.

नियंत्रण:-

  • खोल नांगरणी केल्याने जमिनीतील प्यूपा किंवा ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
  • बियाण्याच्या अंकुरणानंतर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पेरावेत.
  • बीटल एकत्र करून नष्ट करावेत.
  • सायपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2  मि.ली. प्रति लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्राम प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे. पहिली फवारणी रोपणानंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share