Ideal soil for cowpea cultivation

चवळीसाठी आदर्श माती

  • पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या सर्व प्रकारच्या मातीत चवळीची शेती करता येते पण या पिकासाठी लोम माती सर्वोत्तम असते.
  • लवणीय आणि क्षारीय जमीन चवळी किंवा चवळईच्या शेतीस उपयुक्त नसते.
  • वेलांच्या चांगल्या विकासासाठी मातीचा पी.एच स्तर 5.5-6.0 असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of aphid in muskmelon

खरबूजाच्या पिकावरील माव्याचे नियंत्रण

  • ग्रस्त रोपांना उपटून नष्ट करावे. त्यामुळे किडीचा फैलाव रोखला जाईल.
  • माव्याच्या लागणीची लक्षणे दिसताच अ‍ॅसीफेट 75% एसपी @ 300-400 ग्रॅम/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एसएल @ 100 मिली प्रति एकर किंवा अ‍ॅसीटामाप्रिड 20% एसपी @ 150 ग्रॅम प्रति एकर दर 15 दिवसांनी फवारून किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of cowpea pod borer

चवळीच्या शेंगा पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

  • या अळ्या शेंगात भोक पाडून आतील बिया खातात.
  • फुले आणि शेंगा नसल्यास त्या पाने खातात.
  • खोल नांगरणी करून जमिनीतील किडीचा कोश अवस्थेत नायनाट करता येतो. त्याशिवाय पीक चक्र अवलंबून किडीचे नियंत्रण करणे शक्य असते.
  • प्रतिरोधक/सहनशील वाणे पेरावीत.
  • 3 फुट लांब दांड्या हेक्टरी 10 या प्रमाणात पक्षांना बसण्यासाठी रोवाव्यात.
  • क्लोरपायरीफोस 20% ईसी 450 मिली/एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एससी @ 160-200 मिली/एकरचे पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.
  • इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 100 ग्रॅम/ एकर चे पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of White fly in bottle gourd

दुधी भोपळ्यातील श्वेत माशीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे अंडाकार हिरव्या-पांढर्‍या रंगाचे असतात.
  • वाढ झालेले किडे सुमारे 1 मि.ली. लांब असतात आणि त्यांच्या शरीरावर मेणासारखे पांढरे आवरण असते.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील पृष्ठभागावरून रस शोषतात आणि चिकटा सोडतात. त्याने प्रकाश संश्लेषणात अडथळा येतो.
  • पाने रोगग्रस्त दिसतात आणि काळ्या बुरशीने झाकली जातात.
  • ही कीड पर्ण सुरळी रोगाची वाहक असते.
  • पिवळ्या रंगाचे चिकट सापळे शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • पेरणीच्या वेळी कार्बोफ्यूरान 3% जीआर 8 किग्रॅ/एकर मातीत मिसळावे.
  • डायमिथोएट 30%ईसी का 250 ग्रॅम/एकर दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of pod borer in moong

मुगाच्या शेंगा पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

  • अळ्या मोठ्या होतात तेव्हा त्या शेंगामधील बिया खाऊन हानी करतात.
  • शेंगा पोखरणार्‍या अळीच्या संक्रमणामुळे शेंगा वेळेपूर्वी वाळून गळतात.
  • पेरणीपुर्वी शेतात खोल नांगरणी करून मातीतील किड्यांची अंडी आणि कोशांचा नायनाट करावा.
  • पेरणीसाठी मुगाची लवकर परिपक्व होणारी वाणे वापरावीत.
  • मुगाच्या रोपांमध्ये निश्चित अंतर ठेवावे.
  • क्लोरपायरीफॉस 20% ई.सी.450 मिली/एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एस.सी. @ 160-200 मिली/एकर पाण्यात मिसळून फवारावे.
  • इमामेक्टिन बेंझोएट 5% एस.जी. @ 100 ग्रॅम/एकर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable climate for sorghum crop

ज्वारीच्या पिकासाठी उपयुक्त हवामान

  • ज्वारी उष्ण हवेतील पीक आहे.
  • परंतु अत्यधिक तापमानाने ज्वारीचे उत्पादन घटते.
  • ज्वारीच्या पिकासाठी अर्ध-शुष्क हवामान उत्तम असते.
  • ज्वारीच्या पिकासाठी 25-35 oC हे अनुकूल तापमान असते.
  • समुद्र सपाटीपासुन जास्त उंचीवरील (1200 मीटरहून अधिक) जमीन या पिकासाठी अनुकूल नसते.
  • ज्वारीचे पीक 300-350 मिली एवढे वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागातही घेता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Method of sowing in okra

भेंडीच्या पेरणीची पद्धत

  • भेंडीची लागवड समतल जमिनीत किंवा सर्‍यांमध्ये करता येते. भारी मातीत हे पीक सर्‍यांवर पेरावे.
  • भेंडीच्या संकरीत वाणांची पेरणी 75 x 30 सेमी किंवा 60 x 45 सेमी एवढ्या अंतरावर करावी.
  • भेंडीच्या पेरणीपुर्वी 3-4 दिवस निंदणी करणे उपयुक्त ठरते.
  • बियाणे सुमारे 4-5 दिवसात अंकुरित होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of thrips in moong

मुगावरील तेलकिड्यांचे (थ्रिप्स) नियंत्रण

  • ही कीड रोपांमधील रस शोषते. त्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि कमजोर होतात आणि उत्पादन घटते.
  • या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 400 मिली. प्रति एकर किंवा फिप्रोनिल 400 मिली. प्रति एकर किंवा थायमेथोक्झोम 200 ग्रॅम प्रति एकर दर 10 दिवसांनी फवारावे.
  • निंबोणीच्या बियांचा अर्क (NSKE) 5% किंवा ट्रायजोफॉस @ 350 मिली/एक पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil and Climate for coriander

धने/ कोथिंबीरीच्या लागवडीसाठी उपयुक्त माती आणि हवामान

  • पाण्याचा चांगला निचरा होणारी लोम माती धने/ कोथिंबीरीच्या लागवडीसाठी उत्तम असते.
  • पावसाळी शेतीसाठी pH स्तर 6-8 असलेली चिकणमाती उत्तम असते.
  • धने/ कोथिंबीरीच्या लागवडीसाठी 20-25 oC  हे उत्तम तापमान असते.
  • थंड आणि कोरड्या हवामानात हे पीक उत्तम येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of bacterial wilt in tomato

टोमॅटोच्या पिकातील जिवाणूजन्य मर रोगाचे नियंत्रण

  • रोगग्रस्त रोपांची माने पिवळी पडून सुकू लागतात आणि काही काळाने रोप मरते.
  • रोप सुकण्यापूर्वी खालील बाजूची पाने गळून पडतात.
  • रोपाच्या खोडाचा खालील भाग कापला असता त्यात जिवाणू द्रव दिसतो.
  • रोपाच्या खोडाच्या बाहेरील भागावर लहान आणि नाजुक मुळे फुटतात.
  • भोपळा वर्गीय भाजा, झेंडू किंवा भाताच्या पिकाची लागवड करून पीक चक्र अवलंबावे.
  • शेतात रोपे लावण्यापूर्वी ब्लीचिंग पावडरची 6 कि.ग्रॅम प्रति एकर मात्रा फवारावी.
  • स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट I.P. 90% w/w + टेट्रासायक्लिन हाइड्रोक्लोराइड I.P. 10% w/w  20 ग्रॅम/एकर फवारावे.
  • कसुगामायसिन 3% एस.एल. 300 मिली/एकर वापरुन देखील या रोगाला नियंत्रित करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share