Nutrient Management in Pea

मटारसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी 12 किलो नायट्रोजन प्रति एकरची आधारभूत मात्रा सुरुवातीच्या वाढीस उत्तेजन देण्यास पुरेशी असते. नायट्रोजनची अधिक मात्रा ग्रंथींच्या स्थिरीकरणावर दुष्प्रभाव टाकते. पीक फॉस्फरसच्या वापरास चांगली प्रतिक्रिया देते कारण ते मुळावरील गाठी वाढवून नायट्रोजन स्थिरीकरणास मदत करते. त्यामुळे मटारची उगवण आणि गुणवत्ता वाढते. रोपांची उगवण आणि नायट्रोजन स्थिरीकरण क्षमता वाढवण्यात पोटॅश उर्वरकांचाही प्रभाव कार्य करतो.

सामान्य शिफारस:-

उर्वरकांच्या वापरासाठीची सामान्य शिफारस पुढील बाबींवर अवलंबून असते:-

  • मृदा उर्वरकता आणि दिल्या जाणार्‍या कार्बनिक खतांची/ शेणखताची मात्रा
  • सिंचनाची परिस्थिति:- पावसावर अवलंबून की सिंचित
  • पावसावर अवलंबून असलेल्या पिकास उर्वरकांची अर्धी मात्रा देतात.

मात्रा किती, केवढी द्यावी:-

  • मटारच्या भरघोस उत्पादनासाठी 10 किलोग्रॅम यूरिया, 50 किलोग्रॅम डी.ए.पी, 15 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश आणि 6 किलोग्रॅम सल्फर 90% डब्लू.जी. प्रति एकर वापरतात.
  • शेताची मशागत करताना यूरियाची अर्धी मात्रा आणि डी.ए.पी, म्यूरेट ऑफ पोटॅश आणि सल्फरची पूर्ण मात्रा वापरतात. युरियाची उरलेली मात्रा दोन वेळा सिंचनाच्या वेळी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mealy Bug in Cotton

कापसावरील ढेकणीचे (मिली बग) नियंत्रण

  • संपूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
  • शेताची निगा राखावी. त्यामुळे सुरुवातीसच कीड दिसते.
  • जास्तीतजास्त नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच उपाययोजना करावी.
  • आवश्यकता असल्यास लिंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा लिंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प यासारखी लिंबोणी आधारित वंनस्पतीजन्य कीटकनाशके फवारावीत.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Mealy Bug in Cotton

कापसावरील ढेकणी (मिली बग)

  • ढेकण्या कापसाच्या पानांखाली वसाहती करून मोठ्या संख्येने राहतात आणि तेथे मेणचट थर बनवतात.
  • ढेकण्या मोठ्या प्रमाणात चिकटा सोडतात. त्यावर काळी बुरशी निर्माण होते.
  • किडग्रस्त रोपे कमज़ोर आणि काळी दिसतात. त्यांची फलन क्षमता कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Critical stage of irrigation in Potato

बटाट्याच्या सिंचनातील क्रांतिकारक अवस्था

  • बटाट्याच्या पिकासाठी हंगामाच्या दरम्यान मातीत उच्चतम ओलावा राखण्यासाठी उच्च स्तरीय व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन खूप महत्वाचे असते –
  • 1). अंकुरण अवस्था
  • 2). कंद निर्माण होण्याची अवस्था
  • 3). कंद वाढण्याची अवस्था
  • 4). पिकाची अंतिम अवस्था
  • 5). खोदाईपूर्वी

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time, Planting and Seed Rate of Garlic

लसूणची लागवड करण्याची वेळ, लागवडीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण

  • मध्य भारतात पाकळ्यांची चोपाई सप्टेंबर – नोव्हेंबर या दरम्यान करतात.
  • लसूनच्या पाकळ्या गाठीपासून सोडवाव्यात. हे काम पेरणीच्या वेळीच करावे.
  • पाकळ्यांचे साल निघाल्यास त्या पेरणीस उपयुक्त नसतात.
  • कड़क मान असलेला, प्रत्येक पाकळी सुट्टी आणि कडक असलेला लसूणचा गड्डा उपयुक्त असतो.
  • मोठ्या (1.5 ग्रॅमहून मोठ्या आकाराच्या) पाकळ्या निवडाव्यात. लहान, रोगग्रस्त, क्षतिग्रस्त पाकळ्या काढाव्यात.
  • लसूणच्या बियाण्याचे प्रमाण 160-200 किलो प्रति एकर.
  • निवडलेल्या पाकळ्या 2 सेमी खोलीवर एकमेकांपासुन 15 X 10 सेमी अंतरावर लावाव्यात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Prevention of Fusarium Wilt in Gram

हरबर्‍यावरील मर रोखण्यासाठी करण्याची उपाययोजना

हरबर्‍यावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी उपाय:- फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरम बुरशीमुळे मर रोग होतो. उष्ण व दमट हवामान त्यासाठी अनुकूल असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना कराव्यात –

  • सहा वर्षांचे पीकचक्र अवलंबावे.
  • पावसाळ्यास शेताचे ओलीपासून संरक्षण करावे.
  • खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समतल करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • कार्बोक्सीन5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/ किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @ 5 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • तापमान जास्त असताना पेरणी करू नये. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात पेरणी करावी.
  • नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिंचन करावे.
  • 15 दिवसांच्या पिकावर मायकोरायझा @ 4 किलो प्रति एकर फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • घाटे लागण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Potato crop

बटाट्याच्या पिकासाठी शेताची मशागत

शेताच्या मशागतीच्या वेळी देण्याची उर्वरकांची मात्रा

  • एसएसपी @ 80 किग्रॅ/ एकर
  • डीएपी @ 40 किग्रॅ/ एकर
  • यूरिया @ 20 किग्रॅ/ एकर
  • पोटाश @ 50 किग्रॅ/ एकर

पेरणीच्या वेळी

  • समुद्री शेवाळ (लाटू ) 5 किग्रॅ/ एकर
  • फिप्रोनिल जीआर (फॅक्स जीआर / हरीना जीआर) @ 8 किग्रॅ/ एकर
  • एनपीके बॅक्टीरियाचे मिश्रण (टीबी 3 ) @ 3-4 किग्रॅ/ एकर
  • ZnSB (तांबे जी ) @ 4 किग्रॅ/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Damping off disease in Onion

कांद्यावरील रोप कुज रोग

  • विशेषता खरीपाच्या हंगामात जमिनीतील अतिरिक्त ओल आणि मध्यम तापमान या रोगाच्या विकासाची मुख्य कारणे असतात.
  • बियाण्यात आधीच आणि रोपांचे आर्द्र गलन होते.
  • त्यानंतरच्या अवस्थेत रोगजनक रोगाच्या बुडावर हल्ला करतात.
  • शेवटी रोपाची मान गलित होऊन रोप कुजून मरते.
  • पेरणीसाठी निरोगी बियाणे निवडावे.
  • कार्बेन्डाझिम12% + मॅन्कोझेब 63% किंवा थियोफीनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी 50 ग्रॅम प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate of onion crop

कांद्याच्या पिकासाठी बियाण्याचे योग्य प्रमाण

  • सामान्यता 3-4 किलोग्रॅम प्रति एकर हे बियाण्याचे प्रमाण राखावे.
  • 3 x 0.6 मीटर आकाराचे 40– 44 वाफे एक एकर शेतात पेरणी करण्यासाठी पुरेसे असतात.
  • कांद्याचे बियाणे शेतात थेट फेकून देखील पेरले जाते. बी फेकून पेरण्याची पद्धत वापरताना बियाण्याचे प्रमाण 6 – 8 किलोग्रॅम प्रति एकर ठेवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Downy Mildew in Cauliflower:-

फुलकोबीमधील मर रोगाची (डाउनी मिल्ड्यू) लक्षणे

  • खोडावर भुरकट दबलेले डाग आढळतात. त्यांच्यात बुरशीचा पांढरा भुरा वाढतो.
  • पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर जांभळ्या भुरकट रंगाचे डाग आढळतात. त्यांच्यातही बुरशीचा भुरा वाढतो.
  • या रोगामुळे फुलकोबीचा शेंडा संक्रमित होऊन नासतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share