शेतात सेंद्रिय खत (एफवायएम) कसे आणि का मिसळावे
- देशभरातील शेतजमिनीपैकी 11% ते 76% पर्यन्त जमिनीत कार्बनिक कार्बनचा अभाव आढळून येतो.
- शेणखत कार्बनिक कार्बनचा उत्तम स्रोत आहे.
- मृदेतील जैविक कार्बन मातीची उर्वरकतेचा प्रमुख कारक आहे. त्यामुळे रोपांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेल्या जलधारण क्षमता, सरंध्रता यात सुधारणा होते.
- शेणखत हे कार्बनिक खत आहे. ते शेतीत उर्वरकाप्रमाणे वापरले जाते. ते शेताची उर्वरकता वाढवते. उत्तम प्रतीच्या शेणखतात सामान्यता5% नायट्रोजन, 0.2% फॉस्फरस 0.5% आणि पोटॅश असते.
- ते मातीतील सूक्ष्म पोषक तत्वे आणि पादप पोषक तत्वांची पूर्तता करते आणि त्यांची उपलब्धता वाढवते.
- विघटनाच्या वेळी उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि उष्णता मातीतील हानिकारक बुरशी आणि कीड नष्ट करतात.
- पावसाच्या पाण्यामुळे लीचिंग होऊन मातीतील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे नांगरणीपुर्वी शेतात उत्तम प्रतीचे शेणखत 8-10 टन प्रति एकर या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share