Manures and fertilisers for Mustard

मोहरीसाठी खत आणि उर्वरकांचे व्यवस्थापन

शेताच्या मशागतीच्या वेळी एकरी 6-8 टन शेणखत, 25-40 किलो नायट्रोजन, 25 किलो  फॉस्फरस आणि 16 किलो पोटॅश द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of sowing for mustard

मोहरीच्या पेरणीसाठी योग्य काळ

  • मोहरीची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.
  • सामान्यता मोहरीच्या पिकासाठी दोन ओळींमधील अंतर 30-45 सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर 10-15 सेंटीमीटर राखतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Cauliflower Diamondback moth

फुलकोबीवरील पतंगाचे (डायमण्ड बॅक मोथ किंवा कॅबेज मोथ) नियंत्रण

  • डायमण्ड बॅक मोथच्या नियंत्रणासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात.
  • प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 500 मिली/ एकर किंवा सायपरमेथ्रिन 4% ईसी + प्रोफेनोफॉस 40% ईसी @ 400 मिली/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारावे.
  • स्पायनोसेड (25 एस.सी.) 100 मिली/ एकर किंवा ईंडोक्साकार्ब 300 मिली/ एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट @ 100 ग्रॅम/ एकर पाण्यात मिश्रण करून फवारावे. पेरणीनंतर 25व्या दिवशी पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  • जैविक नियंत्रणासाठी बेवेरिया बैसियाना @ 1  किलो/ एकर वापरावे.
  • टीप:- प्रत्येक फवारणीच्या वेळी स्टीकर मिसळणे आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा. 

Share

Cauliflower Diamondback moth

पतंग (डायमण्ड बॅक मोथ किंवा कॅबेज मोथ)

ओळखण्याची लक्षणे

  • अंडी पांढऱ्या-पिवळ्या आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी लांब, फिकट पिवळ्या-हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण अंगावर सूक्ष्म रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी लांब, मातकट करड्या रंगाचे असतात. त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे, पातळ असतात आणि त्यांच्या कडा आतील बाजूने पिवळ्या असतात.
  • वाढ झालेल्या माद्या पानांवर एक एक किंवा समूहात अंडी घालतात.
  • त्यांच्या पंखांवर पांढऱ्या रेषा असतात. पंख मुडपल्यावर त्यांच्यापासून हिऱ्यासारखी आकृती तयार झालेली दिसते.

हानी

  • लहान, सडपातळ, हिरव्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर पानांच्या बाहेरील बाजूचा पृष्ठभाग खाऊन त्यांच्यात भोके पाडतात.
  • हल्ला तीव्र असल्यास पानांच्या शिरांच्या फक्त जाळ्या शिल्लक राहतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

 Why, when and how to add mycorrhiza in the field :- 

शेतात मायकोरायझा का, केव्हा आणि कसे घालावेत

शेतात मायकोरायझा का, केव्हा आणि कसे घालावेत

  • मायकोरायझा रोपांच्या मूळसंस्थेच्या वाढ आणि विकासासाठी साहाय्य करतात.
  • ते मातीतील फॉस्फेट पिकापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात.
  • ते मातीतील नायट्रोजन, पोटॅशियम,लोह, मॅंगनीज,मॅग्नेशियम, तांबे,जस्त, बोरॉन, सल्फर आणि मोलिब्डेनम यासारख्या पोषक तत्वांना मुळांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे रोपांना अधिक मात्रेत पोषक तत्वे मिळतात.
  • ते रोपांना चिवट बनवतात. त्यामुळे रोपे अनेक रोग, पाण्याचा अभाव इत्यादी काही अंशी सहन करू शकतात.
  • ते पिकाची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते.
  • मायकोरायजा मुळांचा पसारा वाढवतात. त्यामुळे पीक जास्त जागेतून पाणी शोषू शकते.
  • मृदा उपचार –  50 किलो उत्तम प्रतीचे शेणखत/कम्पोस्ट खत/गांडूळ खत/ शेतातील मातीत @ 4 किलो मायकोरायजा मिसळून ती मात्रा पेरणी/ पुनर्रोपणापूर्वी मातीत मिसळावी.
  • पेरणीनंतर 25-30 दिवसांनी उभ्या पिकात वरीलप्रमाणे मिश्रण भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Aphid of Cucumber

काकडीवरील मावा

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळ्या नासपतीच्या आकाराचे आणि काळ्या रंगाचे असतात.
  • शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांच्या झुंडी पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात आणि पानांच्या उतींमधून रस शोषतात.
  • रोपांचे ग्रस्त पिवळे पडून, कोमेजून, मुडपतात. हल्ला तीव्र असल्यास पाने वाळतात आणि हळूहळू पूर्ण रोप सुकते.
  • फळांचा आकार आणि गुणवत्ता घटते.
  • माव्याकडून पानांच्या पृष्ठभागावर किंवा रोपाच्या टोकाकडे चिकटा स्रवला जातो. त्यावर भुरा बुरशी विकसित होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया प्रभावित होते आणि रोपाची वाढ खुंटते.
  • भुरा बुरशीने ग्रस्त फळे अनाकर्षक असतात. त्यांना कमी किंमत मिळते.
  • प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 400 मिली / एकर किंवा
  • अ‍ॅसिटामिप्राइड 20% एसपी 40-80 ग्रॅम / एकर किंवा
  • अ‍ॅसफेट 50% + इमिडाक्लोप्रिड8% एसपी @ 300 ग्रॅम / एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fusarium Wilt in Gram

हरबर्‍यातील मर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना:-

हरबर्‍यातील मर रोग फ्यूजेरियम ओक्सीस्पोरस बुरशीमुळे होतो. त्यासाठी उष्ण आणि आर्द्र वातावरण अनुकूल असते. या रोगाच्या प्रतिबंधासाठी पुढील खबरदारीची उपाययोजना करावी:-

  • सहा वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • पावसाळ्यात शेतातील ओलीचे संरक्षण करावे.
  • खोल पेरणी (6-7 इंच) करून शेत सपाट करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @ ग्रॅम/किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • तापमान अधिक असताना पेरणी करू नये. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात पेरणी करावी.
  • नोव्हेंबरमध्ये सिंचन करावे.
  • पीक 15 दिवसांचे असताना माइकोरायज़ा @ 4 किलो प्रति एकर फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/एकर फवारावे.
  • घाटे विकसित होण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil Preparation for Potato Cultivation

बटाट्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत:-

  • बटाट्याच्या पिकात उत्तम कंद बनण्यासाठी भुसभुशीत जमीन आवश्यक असते.
  • बटाट्याचे पीक रब्बीच्या हंगामात घेतले जाते. खरीपाच्या पिकाच्या काढणीनंतर 20-25 से.मी. खोल नांगरणी करून मातीला पालटावे.
  • त्यानंतर 2-3 वेळा दाताळे आडवे फिरवावे किंवा 4-5 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
  • एक दोन वेळा वखर फिरवून जमिनीला सपाट करणे आवश्यक असते.
  • पेरणीच्या वेळी पुरेशी ओल असणे आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Why & how to apply FYM in soil?

शेतात सेंद्रिय खत (एफवायएम) कसे आणि का मिसळावे

  • देशभरातील शेतजमिनीपैकी 11% ते 76% पर्यन्त जमिनीत कार्बनिक कार्बनचा अभाव आढळून येतो.
  • शेणखत कार्बनिक कार्बनचा उत्तम स्रोत आहे.
  • मृदेतील जैविक कार्बन मातीची उर्वरकतेचा प्रमुख कारक आहे. त्यामुळे रोपांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेल्या जलधारण क्षमता, सरंध्रता यात सुधारणा होते.
  • शेणखत हे कार्बनिक खत आहे. ते शेतीत उर्वरकाप्रमाणे वापरले जाते. ते शेताची उर्वरकता वाढवते. उत्तम प्रतीच्या शेणखतात सामान्यता5% नायट्रोजन, 0.2% फॉस्फरस 0.5% आणि पोटॅश असते.
  • ते मातीतील सूक्ष्म पोषक तत्वे आणि पादप पोषक तत्वांची पूर्तता करते आणि त्यांची उपलब्धता वाढवते.
  • विघटनाच्या वेळी उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि उष्णता मातीतील हानिकारक बुरशी आणि कीड नष्ट करतात.
  • पावसाच्या पाण्यामुळे लीचिंग होऊन मातीतील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे नांगरणीपुर्वी शेतात उत्तम प्रतीचे शेणखत 8-10 टन प्रति एकर या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Green house

हरितगृह (ग्रीनहाऊस)

  • हरितगृह (ग्रीनहाऊस) हा ज्याचे छत पारदर्शक आहे असा सांगाडा असतो. त्यात पेरले जाणारे पीक आंतरिक कार्ये सहजपणे करता येतील अशा प्रकारे नियंत्रित वातावरणात केले जाते.

हरितगृहाचे (ग्रीनहाऊस) लाभ:-

  • हरितगृहात (ग्रीनहाऊस) अनुकूलतेनुसार नियंत्रित वातावरण पुरवून चार ते पाच भाज्या वर्षभर सहजपणे लावल्या जाऊ शकतात.
  • त्याद्वारे प्रति एकक क्षेत्रात उत्पादकता वाढवता येऊ शकते, तसेच उच्च गुणवत्ता प्राप्त होते.
  • हरितगृहात पाणी, उर्वरके, बियाणी आणि रासायनिक औषधे अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतात.
  • त्यामध्ये कीड आणि रोगांचे नियंत्रणदेखील सहजपणे करता येते.
  • हरितगृहात बीजअंकुरणाची टक्केवारी अधिक असते.
  • हरितगृहात भाज्या लावलेल्या नसताना हरितगृहाने शोषलेल्या उष्णतेचा वापर उत्पादने सुकवण्यासाठी आणि इतर संबंधित कार्यांसाठी केला जातो.
  • रोपांना सिंचन, वातावरणाचे नियंत्रण आणि अन्य कार्ये कॉँम्प्यूटरद्धारा स्वनियंत्रित प्रकारे केली जातात.

Share