Aphid of Cucumber

काकडीवरील मावा

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळ्या नासपतीच्या आकाराचे आणि काळ्या रंगाचे असतात.
  • शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांच्या झुंडी पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात आणि पानांच्या उतींमधून रस शोषतात.
  • रोपांचे ग्रस्त पिवळे पडून, कोमेजून, मुडपतात. हल्ला तीव्र असल्यास पाने वाळतात आणि हळूहळू पूर्ण रोप सुकते.
  • फळांचा आकार आणि गुणवत्ता घटते.
  • माव्याकडून पानांच्या पृष्ठभागावर किंवा रोपाच्या टोकाकडे चिकटा स्रवला जातो. त्यावर भुरा बुरशी विकसित होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया प्रभावित होते आणि रोपाची वाढ खुंटते.
  • भुरा बुरशीने ग्रस्त फळे अनाकर्षक असतात. त्यांना कमी किंमत मिळते.
  • प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 400 मिली / एकर किंवा
  • अ‍ॅसिटामिप्राइड 20% एसपी 40-80 ग्रॅम / एकर किंवा
  • अ‍ॅसफेट 50% + इमिडाक्लोप्रिड8% एसपी @ 300 ग्रॅम / एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>