मातीचे आरोग्य सुधारून उत्पादन कसे वाढवावे
मातीचे आरोग्य कसे सुधारावे –
पिकाच्या उत्पादनात 50% पर्यन्त वाढ करण्यासाठी मातीवर पुढील तीन महत्वपूर्ण उपाय करावेत:
- मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण वाढवणे
- मातीची भौतिक अवस्था सुधारणे
- मातीच्या pH स्तराचे संतुलन कायम राखणे
- मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण वाढवण्यासाठी –
- आधीच्या पिकाच्या कापणीनंतर उरलेले पिकाचे अवशेष आग लावून नष्ट करू नयेत.
- कापणीनंतर शेतात दोन वेळा नांगरणी करावी. त्याने पिकाचे अवशेष विघटित होऊन रोपांना पोषक तत्वे मिळवून देतील.
- शेतात नांगरणी करताना FYM 10 टन/ एकर किंवा गांडूळ खत 2.5 टन/ एकर + एस.एस.पी. 100 किलो/एकर या प्रमाणात मिसळावे.
- 1 kg मायक्रोन्यूट्रियंट + PSB 2 कि.ग्रॅ. + KMB 2 kg + NFB 2 कि.ग्रॅ. + ZnSB 4 कि.ग्रॅ. + ट्रायकोडर्मा 3 कि.ग्रॅ./ एकर पेरणी करताना दिल्याने मातीतील पोषक तत्वांच्या मात्रेत वाढ होते.
- मातीची भौतिक अवस्था सुधारण्यासाठी –
- पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या कापणीनंतर शेताची नांगरणी करून स्पीड कम्पोस्ट 4 कि.ग्रॅ./ एकर या प्रमाणात मातीत पसरून सिंचन करावे.
- 15 – 20 दिवसांनंतर स्पीड कम्पोस्टच्या मदतीने पिकाचे अवशेष चांगल्या प्रकारे विघटित होऊन मातीची संरचना सुधारतात.
- मातीच्या pH स्तराच्या संतुलनाच्या रक्षणासाठी –
- मातीचा pH स्तर नियंत्रित करण्यासाठी संथ गतीने रिलीज होणारी पोषक तत्वे वापरावीत.
- अधिक क्षार आणि आम्ल स्वभावाच्या उर्वरकांचा वापर संतुलित मात्रांमध्ये करावा.
- भरघोस उत्पादनासाठी मातीचा pH स्तर 6.ते 7.0 असावा.
- आम्लीय मातीच्या सुधारणेसाठी कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा मृदा परीक्षण अहवालानुसार द्यावी.
- क्षारीय मातीच्या सुधारणेसाठी जिप्समची मात्रा मृदा परीक्षण अहवालानुसार द्यावी.
Share