Yellowing leaves may cause more damage in Brinjal

वांग्याच्या पानांमधील पिवळेपणाने थोठे नुकसान होऊ शकते

  • वांगी हे भारतासह पूर्णा जगात मोठ्या प्रमाणात केले जाणारे भाजीचे पीक आहे.
  • पानांचे पिवळेपण वांग्याच्या पिकासाठी खूप हानिकारक असते.
  • पानांमधील पिवळेपणा कीड (कोळी, ढेकण्या आणि रस शोषणारे किडे), रोग (मर आणि विषाणूजन्य रोग) आणि नायट्रोजनचा अभाव अशा वेगवेगळ्या कारणांनी असू शकतो. रोपावर पिवळेपणा आल्याने उत्पादन घटते आणि परिणामी आर्थिक नुकसान होते.
  • नायट्रोजनची उपलब्धता वाढवण्यासाठी नायट्रोजन उर्वरके वापरावीत तसेच वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढवण्यासाठी फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू @ 2 किलोग्रॅम/ एकर या प्रमाणात शेतात चांगल्या प्रकारे मिसळावेत.
  • वांग्याच्या पिकावरील किडीचे निवारण करण्यासाठी प्रॉपरझाईट 50% EC @ 400 मि.ली. (कोळ्यांसाठी) आणि डायक्लोरोवस 76% EC @ 300 मि.ली. (पांढर्‍या किडीसाठी) प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • रोगांमुळे येणार्‍या पिवळेपणाला रोखण्यासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% WP @ 200 ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लीन 20 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>