Flower promotion in snake gourd

पडवळ/ काकडीच्या पिकातील फुलोर्‍याच्या वाढीसाठी उपाय

  • पडवळ/ काकडीच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • पेरणीनंतर 40-45 दिवसांनी काकडीच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन काकडीच्या पिकातील फुलोर्‍यात वाढ करता येते:
    • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे
    • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे.
    • सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावीत.
    • 2 ग्रॅम/ एकर जिब्रेलिक अॅसिडदेखील फवारू शकता.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to improve production by improving soil health

मातीचे आरोग्य सुधारून उत्पादन कसे वाढवावे

मातीचे आरोग्य कसे सुधारावे –

पिकाच्या उत्पादनात 50% पर्यन्त वाढ करण्यासाठी मातीवर पुढील तीन महत्वपूर्ण उपाय करावेत:

  • मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण वाढवणे
  • मातीची भौतिक अवस्था सुधारणे
  • मातीच्या pH स्तराचे संतुलन कायम राखणे
  1. मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण वाढवण्यासाठी –                        
  • आधीच्या पिकाच्या कापणीनंतर उरलेले पिकाचे अवशेष आग लावून नष्ट करू नयेत.
  • कापणीनंतर शेतात दोन वेळा नांगरणी करावी. त्याने पिकाचे अवशेष विघटित होऊन रोपांना पोषक तत्वे मिळवून देतील.
  • शेतात नांगरणी करताना FYM 10 टन/ एकर किंवा गांडूळ खत 2.5 टन/ एकर + एस.एस.पी. 100 किलो/एकर या प्रमाणात मिसळावे.
  • 1 kg मायक्रोन्यूट्रियंट + PSB 2 कि.ग्रॅ. + KMB 2 kg + NFB 2 कि.ग्रॅ. + ZnSB 4 कि.ग्रॅ. + ट्रायकोडर्मा 3 कि.ग्रॅ./ एकर पेरणी करताना दिल्याने मातीतील पोषक तत्वांच्या मात्रेत वाढ होते.
  1. मातीची भौतिक अवस्था सुधारण्यासाठी –
  • पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या कापणीनंतर शेताची नांगरणी करून स्पीड कम्पोस्ट 4 कि.ग्रॅ./ एकर या प्रमाणात मातीत पसरून सिंचन करावे.
  • 15 – 20 दिवसांनंतर स्पीड कम्पोस्टच्या मदतीने पिकाचे अवशेष चांगल्या प्रकारे विघटित होऊन मातीची संरचना सुधारतात.
  1. मातीच्या pH स्तराच्या संतुलनाच्या रक्षणासाठी –
  • मातीचा pH स्तर नियंत्रित करण्यासाठी संथ गतीने रिलीज होणारी पोषक तत्वे वापरावीत.
  • अधिक क्षार आणि आम्ल स्वभावाच्या उर्वरकांचा वापर संतुलित मात्रांमध्ये करावा.
  • भरघोस उत्पादनासाठी मातीचा pH स्तर 6.ते 7.0 असावा.
  • आम्लीय मातीच्या सुधारणेसाठी कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा मृदा परीक्षण अहवालानुसार द्यावी.
  • क्षारीय मातीच्या सुधारणेसाठी जिप्समची मात्रा मृदा परीक्षण अहवालानुसार द्यावी.

Share