बटाट्यावरील पर्ण सुरळी विषाणूचे नियंत्रण

    • कोवळ्या पानांचा आकार खूप लहान असतो आणि ती सुरकुतलेली असतात. त्यांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.

 

  • विषाणूपासून मुक्त बियाणे वापरून रोगाचे नियंत्रण करता येते.
  • विषाणूमुक्त बियाणे माव्यापासून मुक्त भागात पेरा.

  • रोगाचा प्रसार करणारी माव्याची कीड योग्य ती कीटकनाशके वापरून नियंत्रित करता येते.

  • माव्याचे नियंत्रण करण्यासाठी असिटामीप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ/ 15 लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड  17.8% एसएल @ 10 मिली/15 लिटर पाणी फवारा.

 

 

Share

कांद्याला चीर पडणे या वैगुण्याचे नियंत्रण

  • एकसमान सिंचन आणि खत घालण्याच्या पद्धतीचे पालन करून कंद फाटणे रोखता येते.
  • कंद सावकाश वाढणाऱ्या जातींची लागवड करून या वैगुण्याला आळा घालता येतो.
Share

वाटाण्यावरील करपा आणि मर रोगाचे नियंत्रण

  • निरोगी बियाणे वापरावे आणि कार्बनडाझिम + मॅन्कोझेब @ 250 ग्रॅम/ क्विंटल वापरून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.  
  • फुलोरा येण्याच्या वेळी आणि त्यानंतर 10-15 दिवसांच्या अंतराने रोगग्रस्त पिकावर मॅन्कोझेब 75% @ 400 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
  • रोगग्रस्त पिकावर थियोफानेट मिथाईल  70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
  • रोगग्रस्त पिकावर क्लोरोथ्रलोनील 75% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/  एकर फवारावे.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.   
  • पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करावी.
Share

मटारवरील माव्याचे नियंत्रण

  • लहान किडे हिरवे असतात. वाढ झालेले किडे मोठ्या नासपतीच्या आकाराचे हिरव्या, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे असतात.

हानी:-  

  • पाने, फुले आणि शेंगांमधून रस शोषतात. 
  • ग्रस्त पाने वाकतात किंवा अनियमित आकाराची होतात. कोंब खुरटतात आणि विकृत आकाराचे होतात.   
  • माव्यांनी सोडलेल्या चिकट्यावर भुरी वाढते. 
Share

Control of Root-Knot Nematode in Tomato

  • कीड प्रतिकारक वाणे वापरावीत. 
  • सूत्रकृमींचा बंदोबस्त करण्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. 
  • निंबोणीची पेंड 80 किग्रॅ/ एकर या प्रमाणात वापरावी.
  • कार्बोफ्युरॉन 3 जी 8 किग्रॅ/ एकर या प्रमाणात वापरून मृदा उपचार करावेत. 
  • पेसीलोमायसेस इलासिनस -1% डब्ल्यूपी @ 10 ग्रॅ/ किग्रॅ बियाणे वापरून बीज संस्करण करावे, नर्सरी उपचारासाठी 50 ग्रॅ/ चौ मीटर वापरावे, 2.5 ते 5 किग्रॅ/ हेक्टर मृदा उपचारासाठी वापरावे.

Share

Management of root aphid in Wheat

  • उशिरा पेरणी करणे टाळावे..
  • नत्र खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • उभ्या पिकात लागण झाल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 60-70 मिली/ एकर फवारावे
  • किंवा सिंचन करण्यापूर्वी थियामेथोक्साम 25% डब्ल्यूजी @ 100 ग्रॅम + ब्यूव्हेरिया बसीयाना 2 किग्रॅ/ एकर या प्रमाणात खत/ वाळू/ मातीत मिसळून शेतात घालावे.

Share

Major Diseases and Their Control Measures of Wheat

तांबेरा (गेरवा) हा गव्हाच्या पिकावरील मुख्य रोग असून गव्हामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा), पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा),काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) यासह चार प्रकारच्या तांबेर्‍याचा संसर्ग आढळतो.

लक्षणे –

 

  • पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा):- पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) हा रोग प्यूसीनिया स्ट्रिफॉर्मिस बुरशीमुळे होतो.नारिंगी-पिवळ्या रंगाच्या बीजामुळे तो गव्हावरील इतर प्रकारच्या तांबेर्‍याहून लगेच वेगळा ओळखता येतो. या  बीजातून एकमेकांना चिकटलेल्या सूक्ष्म पुटकुळया निर्माण होतात आणि पानांच्या शिरांना समांतर असे त्यांचे चट्टे तयार होतात. बीजे पानांच्या वरील बाजूस, पर्णआवरणावर, कुसळांवर आणि तुसांमध्ये आढळतात. 

 

  • पोषक परिस्थिति:- थंड आणि दमट हवामानात पिकामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) रोगाची लागण होते. संसर्ग होण्यासाठी पानांवर ओल असणे आणि 10-15°C इष्टतम तापमान आवश्यक असते. लागण झाल्यापासून 10-14 दिवसात पुटकुळया तयार होतात. रोगामुळे उत्पादनात 25% पर्यंत घट होऊ शकते. 

 

  • पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा):- पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा) प्यूसिनिया ट्राइटिसिनिया बुरशीमुळे होतो. हा रोग राय धान्य आणि ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील होतो. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) लालसर-नारिंगी रंगाची बीजे निर्माण होतात आणि त्यापासून लहान 1.5 मिमी आकाराच्या, वर्तुळाकार ते अंडाकार आकाराच्या पुटकुळया तयार होतात. त्या पानांच्या वरील बाजूला असतात. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात तर पिवळ्या तांबेर्‍यामुळे  (पट्टेरी तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या दोन्ही बाजूला असतात.  

 

  • पोषक परिस्थिति:- पुटकुळया येण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते. संसर्ग झाल्यावर 10-14 दिवसांनी उठणार्‍या पुटकुळया हे रोगाचे आढळून येणारे पहिले लक्षण असते. कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणार्‍या गव्हाच्या रोपांमुळे रोगाची साथ चालू राहत असल्याने अशी रोपे काढून  पानांच्या तांबेर्‍याचे (गेरवा तांबेरा) नियंत्रण करणे किंवा त्याच्या साथीला काही काळ रोखणे शक्य होते. 

 

  • Black Rust (Stem Rust):– काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग पुसिनिया ग्रॅमिनिस बुरशीमुळे होतो. गव्हाशिवाय बार्ली राय आणि  ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील या रोगाची लागण होते. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगामध्ये लालसर-करड्या रंगाच्या, लंबगोल पुटकुळ्या किंवा चट्टे खोड आणि पानांवर उमटतात. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगाच्या पुटकुळ्या पानांच्या दोन्ही बाजूला असतात तर पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात. पुटकुळ्या फुटून बाहेर पडलेला भुरा वारा आणि अन्य वाहक इतर रोपांपर्यंत पोहोचवतात आणि रोगाचा प्रसार वाढतो.

 

  • पोषक परिस्थिति:- काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग इतर प्रकारच्या तांबेऱ्याहुन अधिक म्हणजे 18-30°C तापमान असताना होतो. संसर्ग होण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते आणि सुमारे सहा तासात पूर्ण रोपाला लागण होते. संसर्ग झाल्यानंतर 10-20 दिवसांनी पुटकुळया आढळून येतात. 

नियंत्रण:-

  • कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणारी गव्हाची रोपे नष्ट करा. 
  • पिवळे डाग पडल्यास पीकपालट करणे महत्वाचे असते. 
  • रोग प्रतिकारक वाण वापरण्याने कमी खर्चात आणि पर्यावरण पोषक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करता येते. 
  • वाढीच्या काळात पिकाचे बारकाईने निरीक्षण करणे रोगाचे तातडीने निदान होण्यासाठी आवश्यक असते. 
  • एकाच घटकाचा समावेश असलेल्या बुरशीनाशकांचा पुन्हापुन्हा वापर टाळा. 
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्युपी 320 ग्रॅम/ एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाझोल 25% ईसी 240 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of leaf miner in pea

सिस्टिमिक कीटकनाशकाची फवारणी करा

  •       डेल्टामेथ्रीन २.८ इसी @ २०० मिली/ एकर किंवा
  •       ट्रायझोफॉस ४०%  इसी @ ३५०-५०० मिली/ एकर किंवा
  •       क्लोरपायरीफॉस २०% इसी @ ५०० मिली/ एकर किंवा
  •       कारटॅप हायड्रोक्लोराइड ५०% एस पी @ २५० ग्राम/ एकर हे शिफारस केले आहे.

 

खालील बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकर्यांना पाठवा.

Share

Management of Mealy Bug in Cotton

कापसावरील ढेकणीचे (मिली बग) नियंत्रण

  • संपूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
  • शेताची निगा राखावी. त्यामुळे सुरुवातीसच कीड दिसते.
  • जास्तीतजास्त नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच उपाययोजना करावी.
  • आवश्यकता असल्यास लिंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा लिंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प यासारखी लिंबोणी आधारित वंनस्पतीजन्य कीटकनाशके फवारावीत.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share