भोपळावर्गीय पिकावरील लाल कीड:-
ओळख:-
- अंडी गोलाकार, पिवळ्या- गुलाबी रंगाची असून थोड्या दिवसांनी नारंगी रंगाची होतात.
- अंड्यांमधून निघणारा नवा लार्वा मळकट पांढर्या रंगाचा असतो. परंतु वाढ झालेला लार्वा 22 सेमी. लांब आणि पिवळट क्रीम रंगाचा असतो.
- प्यूपा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. तो जमिनीत 15 ते 25 मिमी. खोल असतो.
- पूर्ण वाढ झालेले किडे 6-8 मिमी. लांब असून त्यांचे पंख चमकदार पिवळ्या लाल रंगाचे असतात आणि ते संपूर्ण शरीर झाकतात.
नुकसान:-
- अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीला टेकलेल्या फळांना खातात.
- त्यानंतर ग्रस्त मुळे आणि भूमिगत भागांवर मृतजीवी बुरशीचा हल्ला होतो. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
- किड्यांनी हल्ला केलेली फळे खाण्यास अयोग्य असतात.
- किडे पानांना खाऊन भोके पाडतात.
- रोपाच्या अवस्थेत वेली असताना किड्यांचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानि पोहोचवतात. त्यामुळे रोपे मरतात.
नियंत्रण:-
- खोल नांगरणी करण्याने जमिनीतील प्यूपा आणि ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
- बीजाला अंकुर फुटल्यावर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पसरावेत.
- किड्यांना एकत्र करून नष्ट करावे.
- साईपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2 मि.ली. प्रति लीटर पाणी या मात्रेची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्रॅम प्रति ली पाण्याचे मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 15 दिवसांनी आणि दुसरी फवारणी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share