Seed treatment of Muskmelon

खरबूजासाठी बीजसंस्करण:-

  • खरबूज पेरणीपासून काढण्याच्या वेळेपर्यंत वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्याचे उत्पादन घटते.
  • खरबूजावरील या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी बीजसंस्करण महत्वाचे असते.
  • बीजसंस्करण कार्बेन्डाजिम 50% WP 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे वापरुन करावे.
  • किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37. 5 % ग्रॅम /किलोग्रॅम बियाणे बीजसंस्करणासाठी वापरावे.
  • विषाणूजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ.एस (48%) 1 एम.एल./किलोग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • रासायनिक बीजसंस्करणानंतर ट्रायकोडर्मा विरिडी @ 4 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे वापरुन उपचार करणे शक्य असते.
  • एका रसायनानंतर दुसर्‍या रसायनाने उपचार करण्यात 20-30 मिनिटांचे अंतर ठेवावे.
  • बीजसंस्करण केल्यावर बियाणे सुमारे 30 मिनिटे सावलीत सुकवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>