फ्यूजेरियम मर रोगापासून भेंडीच्या पिकाचा बचाव
- प्रारंभिक अवस्थेत रोप तात्पुरते सुकते पण रोगाचा प्रभाव वाढल्यावर रोप कायमचे सुकते.
- ग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
- बुरशी मूळसंस्थेवर हल्ला करून संवहन उतींवर वसाहत बनवते.
- त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे वहन थांबते आणि बुरशीच्या विषाच्या प्रभावामुळे संवहन उती आणि कोशिका काम करणे थांबवतात.
- ग्रस्त रोपाचे खोड कापल्यास मध्यभाग गडद राखाडी रंगाचा दिसतो.
नियंत्रण
- सतत एकाच शेतात भेंडीची लागवड करू नये.
- कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2-3 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे किंवा थायोफनेट मिथाइल 45% WP + पायरक्लोस्ट्रोबिन 5% FS @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
- थायोफनेट मिथाइल 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
- एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डेफ़नकोनाज़ोल 11.4% एससी @ 200 मिली/ एकर वापरावे.
- जैविक प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा विरिडीने ड्रेंचिंग आणि पानांवर फवारणी करावी. त्याचा वापर पिकातील जवळपास सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share