ट्रायकोडर्मा म्हणजे काय?

  • ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशीनाशक आहे.
  • ट्रायकोडर्मा हेे वनस्पती रोग व्यवस्थापनासाठी एक अतिशय प्रभावी जैविक साधन आहे,
  • ट्रायकोडर्मा हा एक प्रभावी बायोकंट्रोल एजंट आहे आणि त्याचा वापर फ्यूझेरियम, फायटोफोथोरा, स्क्लेरोसिस इत्यादींसारख्या माती-जनित रोगांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
  • ट्रायकोडर्मा ग्रोथ एजंट म्हणून देखील कार्य करते, नेमाटोड्स संरक्षित स्वरूपात वापरल्यास तो देखील नियंत्रित केला जातो.
  • हे बियाण्यांच्या उपचारासाठी देखील वापरले जाते, बियाण्यांवर उपचार करून उगवण फार लवकर होते तसेच बीजजन्य रोगांपासून संरक्षण होते.
  • ट्रायकोडर्मा रूट रॉट, स्टेम रॉट, विल्ट रोग इत्यादींचा प्रभावी नियंत्रक म्हणून वापरला जातो.
Share

Symptoms and control of Fusarium wilt in Okra

फ्यूजेरियम मर रोगापासून भेंडीच्या पिकाचा बचाव

  • प्रारंभिक अवस्थेत रोप तात्पुरते सुकते पण रोगाचा प्रभाव वाढल्यावर रोप कायमचे सुकते.
  • ग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • बुरशी मूळसंस्थेवर हल्ला करून संवहन उतींवर वसाहत बनवते.
  • त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे वहन थांबते आणि बुरशीच्या विषाच्या प्रभावामुळे संवहन उती आणि कोशिका काम करणे थांबवतात.
  • ग्रस्त रोपाचे खोड कापल्यास मध्यभाग गडद राखाडी रंगाचा दिसतो.

नियंत्रण

  • सतत एकाच शेतात भेंडीची लागवड करू नये.
  • कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2-3 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे किंवा थायोफनेट मिथाइल 45% WP + पायरक्लोस्ट्रोबिन 5% FS @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • थायोफनेट मिथाइल 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डेफ़नकोनाज़ोल 11.4% एससी @ 200 मिली/ एकर वापरावे.
  • जैविक प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा विरिडीने ड्रेंचिंग आणि पानांवर फवारणी करावी. त्याचा वापर पिकातील जवळपास सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Transplanting Precautions in Chilli

मिरचीचे पुनर्रोपण करताना बाळगण्याची सावधगिरी

  • मिरचीची लागवड जुलै – सप्टेंबर या काळात केली जाते.
  • ऑगस्ट महिना मिरचीच्या लागवडीस सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
  • पुनर्रोपणापूर्वी 5-7 दिवस टेबुकोनाझोल वापरुन फवारणी किंवा ड्रेंचिंग केल्याने आर्द्र गलनाची समस्या येत नाही. पुनर्रोपणापूर्वी रोपांच्या मुळांना मायकोराइजाच्या द्रावणात (100 ग्रॅम/ 10 लीटर पाणी) बुडवावे.
  • रोपातील अंतर (दोन ओळीत X दोन रोपात – 3.5-5 फुट X 1-1.5 फुट अनुक्रमे) योग्य प्रमाणात ठेवावे.
  • शेतात किडीचा तीव्र उपद्रव झाल्यास कार्बोफुरॉन 3G @ 8 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे. रोपे सुकत असल्यास ट्रायकोडर्मा 4 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of Trichoderma :- When, How and Why ?

ट्रायकोडर्मा केव्हा, कसे आणि कशासाठी वापरावे

ट्रायकोडर्मा कोबीवर्गीय पिके, कापूस, सोयाबीन अशा सर्व प्रकारच्या रोपे आणि भाज्यांसाठी आवश्यक असते.

  • बीजसंस्करण:  1 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति क्विंटल बियाणे या प्रमाणात वापरुन पेरणीपुर्वी ते द्रावण बियाण्यात मिसळावे.
  • मुळांच्या उपचारासाठी: 10  किलो उत्तम प्रतीचे शेणखत आणि 100 लीटर पाण्यात मिसळून द्रावण करावे आणि त्यात 1 किलो  ट्रायकोडर्मा पावडर मिसळून रोपणापूर्वी त्या मिश्रणात रोपांची मुळे 10 मिनिटे बुडवावी.
  • मृदा उपचार: 4  किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति एकर या प्रमाणात 50 किलो शेणखतात मिसळून मूलभूत मात्रा द्यावी.
  • उभ्या पिकात: उभ्या पिकात वापर करण्यासाठी एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून बुडाजवळच्या मातीचे ड्रेंचिंग करावे.

खबरदारी

  • ट्रायकोडर्मा वापरल्यावर 4-दिवस कोणतेही रासायनिक बुरशीनाशक वापरू नये.
  • कोरड्या मातीत ट्रायकोडर्मा वापरू नये. त्याच्या वाढीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी ओल आवश्यक असते.
  • संस्कारित बियाणे उन्हात ठेवू नये.
  • ट्रायकोडर्मा जास्त वेळ FYM मध्ये मिसळून ठेवू नये.

अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field Management in cotton

जमिनीच्या चांगल्या व्यवस्थापनाद्वारे भरघोस उत्पादन

  • केवळ चांगल्या जमीन व्यवस्थापन पद्धतीद्वारेच भरघोस पीक उत्पादन मिळवणे शक्य असते.
  • कापसाच्या पेरणीपुर्वी शेताची 2 ते 3 वेळा खोल नांगरणी करून शेत 2-3 दिवस मोकळे ठेवावे.
  • खोल नांगरणी केल्याने शेतातील तण नष्ट होते आणि माती भुसभुशीत झाल्याने तिची जल धारण क्षमता वाढते व शेतातील किडीचे कोश नष्ट होतात. त्यानंतर शेतात वखर चालवून शेत समतल करावे.
  • पेरणीनंतर 10-15 दिवसांनी शेतात 10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत एकसमान मिसळावे.
  • कापसातील मातीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा विरिड + ट्रायकोडर्मा हर्ज़िनियम @ 2 किग्रॅ/ एकर + 50 किलो शेणखत वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Bio-fungicide:- Trichoderma; Application and Benefits

जैव जिवाणूनाशक ट्रायकोडर्मा:- वापर आणि लाभ

रोगांच्या, विशेषता मृदाजन्य रोगांच्या, प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा उत्तम जैविक माध्यम आहे. ती एकप्रकारची मुक्त जीवित बुरशी असून सामान्यता माती आणि मूळसंस्थेत असते.

ट्रायकोडर्माचे लाभ:-

रोग नियंत्रण, रोपांच्या वृद्धिस पोषक, रोगांसाठी जैव रासायनिक रोधक, ट्रान्सजेनिक रोपे आणि जैव उपचार।

वापराची पद्धत:-

बीजसंस्करण:- पेरणीपुर्वी बियाण्यात 6-10 ग्रॅम/ किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावी.

नर्सरीतील उपचार:- नर्सरीच्या 100 वर्ग मी. आकाराच्या वाफ्यामध्ये 10-25 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळावी.

कलमे आणि रोपांचा उपचार:- 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति ली. पाण्याचे मिश्रण बनवून कलमे आणि रोपे त्यात 10 मिनटे ठेवून अशा प्रकारे उपचार केलेली कलमे आणि रोपे लागवडीसाठी वापरावीत.

मृदा उपचार:- 1 किलो ट्रायकोडर्मा 100 किलो शेणखतात मिसळून पॉलीथिनने 7 दिवस झाकून ठेवावे. त्यावर अधूनमधून पाणी घालावे आणि 3-4 दिवसांनी पलटावे. 7 दिवसांनंतर शेतात भुरभुरावे.

रोपाचा उपचार:- एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून रोपांजवळ खोडाच्या सर्व बाजूंवर आणि जमीनीवर शिंपडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share