Symptoms and control of Fusarium wilt in Okra

फ्यूजेरियम मर रोगापासून भेंडीच्या पिकाचा बचाव

  • प्रारंभिक अवस्थेत रोप तात्पुरते सुकते पण रोगाचा प्रभाव वाढल्यावर रोप कायमचे सुकते.
  • ग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • बुरशी मूळसंस्थेवर हल्ला करून संवहन उतींवर वसाहत बनवते.
  • त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे वहन थांबते आणि बुरशीच्या विषाच्या प्रभावामुळे संवहन उती आणि कोशिका काम करणे थांबवतात.
  • ग्रस्त रोपाचे खोड कापल्यास मध्यभाग गडद राखाडी रंगाचा दिसतो.

नियंत्रण

  • सतत एकाच शेतात भेंडीची लागवड करू नये.
  • कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2-3 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे किंवा थायोफनेट मिथाइल 45% WP + पायरक्लोस्ट्रोबिन 5% FS @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • थायोफनेट मिथाइल 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डेफ़नकोनाज़ोल 11.4% एससी @ 200 मिली/ एकर वापरावे.
  • जैविक प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा विरिडीने ड्रेंचिंग आणि पानांवर फवारणी करावी. त्याचा वापर पिकातील जवळपास सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fusarium Wilt in Gram

हरबर्‍यातील मर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना:-

हरबर्‍यातील मर रोग फ्यूजेरियम ओक्सीस्पोरस बुरशीमुळे होतो. त्यासाठी उष्ण आणि आर्द्र वातावरण अनुकूल असते. या रोगाच्या प्रतिबंधासाठी पुढील खबरदारीची उपाययोजना करावी:-

  • सहा वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • पावसाळ्यात शेतातील ओलीचे संरक्षण करावे.
  • खोल पेरणी (6-7 इंच) करून शेत सपाट करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @ ग्रॅम/किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • तापमान अधिक असताना पेरणी करू नये. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात पेरणी करावी.
  • नोव्हेंबरमध्ये सिंचन करावे.
  • पीक 15 दिवसांचे असताना माइकोरायज़ा @ 4 किलो प्रति एकर फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/एकर फवारावे.
  • घाटे विकसित होण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Prevention of Fusarium Wilt in Gram

हरबर्‍यावरील मर रोखण्यासाठी करण्याची उपाययोजना

हरबर्‍यावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी उपाय:- फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरम बुरशीमुळे मर रोग होतो. उष्ण व दमट हवामान त्यासाठी अनुकूल असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना कराव्यात –

  • सहा वर्षांचे पीकचक्र अवलंबावे.
  • पावसाळ्यास शेताचे ओलीपासून संरक्षण करावे.
  • खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समतल करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • कार्बोक्सीन5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/ किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @ 5 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • तापमान जास्त असताना पेरणी करू नये. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात पेरणी करावी.
  • नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिंचन करावे.
  • 15 दिवसांच्या पिकावर मायकोरायझा @ 4 किलो प्रति एकर फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • घाटे लागण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fusarium wilt in cotton crop

कापसातील फ्यूजेरियम मररोगाचे नियंत्रण

  • सहा वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समतल करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावी.
  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/ किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @  5 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • मायकोरायझा @ 4 किलो प्रति एकर 15 दिवसांच्या पिकात भुरभुरावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • बोंडे निर्माण होण्याच्या वेळी प्रोपिकोनाज़ोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms of Fusarium wilt in cotton

कापसातील फ्यूजेरियम मररोगाची कारणे आणि लक्षणे

  • हा रोग फ्यूजेरियम ऑक्सीस्पोरम एफ.एस.पी. मुळे होतो.
  • हा कापसावरील मुख्य रोग आहे.
  • या रोगात पाने कडांवर सुकू लागतात आणि मुख्य शिरांच्या बाजूने सुकत जातात.
  • पानांच्या शिरा खोल, निमुळत्या होतात, त्यांचावर डाग पडतात आणि शेवटी रोप सुकून मरते.
  • मुलांजवळ खोडाला आतील बाजूने हानी होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fusarium wilt in cotton crop

  • खोल नांगरणी नंतर सपाट करा (6-7 इंच).
  • रोग-मुक्त बियाणे वापरा.
  • 6 वर्षांच्या पीक फिरण्यांचे अनुसरण करा.
  • प्रतिरोधक जात उगवणे.
  • कार्बॉक्सिन 37% + थिरम 37.5% @ २ ग्राम / कि.ग्रा. किंवा ट्रायकोडर्मा वाईराईड @ ५ ग्राम/ कि.ग्रा सह बियाणे उपचार.
  • पेरणी केल्यानंतर १५ दिवसांनी मायकोरिझा @ ४ कि.ग्रा./एकर घाला.
  • फूल येण्या आधी थियाफानेट मिथाईल 75% डब्ल्यूपी @ 300 ग्राम/ एकर फवारणी करा.
  • शेंग तयार होण्याच्या टप्प्यावर प्रोपिकोनॅझोल 25% इसी @ 125 मिली / एकर फवारणी करा.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Symptoms of Fusarium wilt

  • कारक जीव- फ्यूझेरियम ऑक्सिस्पोरम एफ.एस.पी. वासइन्फेक्टम
  • विल्ट हा कापसाचा एक मुख्य आजार आहे.
  • पानांचे रंग बदलणे काठा पासून सुरू होते आणि मध्यशिराच्या दिशेने पसरते.
  • नसा अधिक गडद, अरुंद आणि डागदार होतात.
  • रक्तवहिन्यासंबंधी ऊतक तपकीरी आणि काळे होणे.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Control of fusarium wilt in muskmelon

खरबूजावरील फ्यूजेरियम जिवाणूजन्य मर रोगाचे नियंत्रण

  • जिवाणूजन्य मर रोगाची सुरुवातीची लक्षणे जुन्या पानांवर दिवसात. पाने पिवळी पडून सुकतात. या रोगाची लक्षणे उन्हाळ्यात स्पष्ट दिसतात.
  • देठांवर राखाडी चिरा दिसतात. त्यांच्यातून लाल-राखाडी रंगाचा दाट स्राव पाझरतो.
  • निरोगी बियाणे पेरणीसाठी वापरा.
  • शेताची खोल नांगरणी, तणाचा नायनाट आणि पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था आवश्यक असते.
  • फ्यूजेरियम मर रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रॉपिकोनाझोल 25% ईसी @ 200 मिली/ एकर किंवा थियोफॅनेट-मिथाइल 500 ग्रॅम प्रति एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fusarium wilt in watermelon

कलिंगडातील मर रोगाचे नियंत्रण

  • रेताड मातीत हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • संक्रमित रोपे नष्ट करावीत.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • पेरणीपुर्वी कार्बेन्डाजिम @ 2 ग्रॅम/किलोग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कलिंगडाच्या रोपांवर रोग दिसताच प्रॉपिकोनाझोल @ 80-100 मिली/एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share