Management of Wilt in Pea

  • कार्बोक्सिन 37.% + थीरम 37.5% @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम या प्रमाणात किंवा ट्रिकोडर्मा व्हीरिडी @ 5 ग्रॅम/ किलोग्रॅम या प्रमाणात वापरुन पेरणीपुर्वी बिजसंस्करण करा आणि तीव्र लागण झालेल्या भागात लवकर पेरणी करणे टाळा. 
  • तीन वर्षांनी पालटून पीक घ्या.  
  • रोगाचे वाहक असलेले तण नष्ट करा. 
  • पेरणीनंतर 15 दिवसांनी मायकोरिझा @ 4 किलोग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरा. 
  • थियाफनेट मेथील 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फुलोरा येण्यापूर्वी फवारा. 
  • शेंगा तयार होण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% ईसी @ 125 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms of Wilt in Pea

  • मुळे काळी पडतात आणि त्यानंतर कुजतात. 
  • रोपाची वाढ खुंटते, पर्णसंभार पिवळा पडतो, पल्लव आणि पालवी खालील बाजूस वळते. 
  • संपूर्ण रोप मरते आणि खोड सुरकुतते.

Share

Symptoms and control of Fusarium wilt in Okra

फ्यूजेरियम मर रोगापासून भेंडीच्या पिकाचा बचाव

  • प्रारंभिक अवस्थेत रोप तात्पुरते सुकते पण रोगाचा प्रभाव वाढल्यावर रोप कायमचे सुकते.
  • ग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • बुरशी मूळसंस्थेवर हल्ला करून संवहन उतींवर वसाहत बनवते.
  • त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे वहन थांबते आणि बुरशीच्या विषाच्या प्रभावामुळे संवहन उती आणि कोशिका काम करणे थांबवतात.
  • ग्रस्त रोपाचे खोड कापल्यास मध्यभाग गडद राखाडी रंगाचा दिसतो.

नियंत्रण

  • सतत एकाच शेतात भेंडीची लागवड करू नये.
  • कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2-3 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे किंवा थायोफनेट मिथाइल 45% WP + पायरक्लोस्ट्रोबिन 5% FS @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • थायोफनेट मिथाइल 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डेफ़नकोनाज़ोल 11.4% एससी @ 200 मिली/ एकर वापरावे.
  • जैविक प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा विरिडीने ड्रेंचिंग आणि पानांवर फवारणी करावी. त्याचा वापर पिकातील जवळपास सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Wilt in Pea

मटारमधील मर रोगाचे नियंत्रण:-

  • किकसित झालेल्या पल्लव आणि पानांच्या कडा कोपर्‍यातून मूडपणे आणि पाने वेडीवाकडी होणे हे या रोगाचे पहिले आणि मुख्य लक्षण आहे.
  • रोपांचा वरील भाग पिवळा पडतो, कळ्यांची वाढ थांबते, खोड आणि वरील बाजूची पाने जास्त कडक होतात, मुळे ठिसुळ होतात आणि खालील बाजूची पाने पिवळी पडून झडतात.
  • पूर्ण वेल कोमेजतो आणि खोड खालील बाजूने आकसते.

नियंत्रण:-

  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @  5 ग्रॅम /किलो बियाणे वापरुन पेरणीपुर्वी बीजसंस्करण करावे आणि जेथे संक्रमण अधिक आहे त्या भागात पेरणी करू नये.
  • 3 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • या रोगाचे आश्रयस्थान असलेले तण नष्ट करावे.
  • माइकोरायझा @ 4 किलो प्रति एकर @ 15 दिवस फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/एकर फवारावे.
  • शेंगा लागताना प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Prevention of Fusarium Wilt in Gram

हरभर्‍यावरील मर आणि पानगळीचा रोग फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम जिवाणुंमुळे होतो. उष्ण आणि दमट वातावरण त्यांच्यासाठी पोषक असते. या रोगापासून बचाव करण्यासाठी पुढील खबरदारीचे उपाय योजावेत:

  • सहा वर्षाच्या उत्पादनाचे चक्र अवलंबावे.
  • पावसाळ्यातील शेतातील ओल टिकवावी.
  • खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समपातळीत आणावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोगप्रतिकारक जाती लावाव्यात.
  • एक किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम या प्रमाणात कार्बेन्डाजिम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • तापमान अधिक असताना (उष्ण वातावरणात पेरणी करू नये. ऑक्टोबरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात पेरणी करावी.
  • नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाणी द्यावे.

Share