जाणून घ्या भेंडीमध्ये पांढऱ्या भुरीच्या हल्ल्यापासून बचाव

  • पानांच्या वरच्या आणि  खालील पृष्ठभागावर पांढरी-तपकिरी पावडर विकसित होते. ज्यामुळे फळ विकासात मोठी घट होत आहे.
  • हे बुरशीच्या भेंडीला गंभीरपणे संक्रमित करते.
  • पंधरा दिवसांच्या अंतराने प्रति एकर 200 ते 250 लिटर पाण्यात हेक्जाकोनाजोल 5% एससी 400 मिली किंवा थियोफेनेट मिथाइल 70 डब्ल्यू.पी. किंवा एज़ोक्सिस्ट्रोबिन 23 एससी घेऊन फवारणी करा.
Share

हवामानातील बदलांमुळे कीटकांचे हल्ले होऊ शकतात

Pest attacks may occur in the change of weather
  • हवामानातील बदल पाहता अनेक प्रकारचे कीटक पिकांवर हल्ला करु शकतात. कारण ओलसर वातावरण त्यांच्यासाठी योग्य आहे.
  • उन्हाळ्यात काकडीवर्गीय भाज्यांमध्ये लाल बीटल किडीचा हल्ला होण्याची शक्यता असते. या किडीची संख्या जास्त असल्यास, सायपरमेथ्रीन 4% ईसी + प्रोफेनोफॉस 40% ईसी 400 मिली किंवा बायफेनथरीन 10% ईसी 200 मिली किंवा डायक्लोरव्हॉस 76 ईसी 300 मिली / एकर फवारणी करावी.
  • भेंडीमध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे इत्यादी रस शोषक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, थायोमेथॉक्झोम 25 डब्ल्यू जी ग्रॅम / 15 लिटर पाण्यात फवारणी करावी.
  • कांद्यामध्ये थ्रिप्स ( तेला ) ची उच्च शक्यता आहे, म्हणून प्रोफेनोफॉस 50 ईसी, 45 मिली किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन 4.9% से. 20 मिली किंवा स्पिनोसॅड 10 मि.ली. किंवा फिप्रोनिल 5 एस.सी. 15 लिटर पाण्याच्या दराने फवारणी करावी.
  • 0.5 मिली मिश्रण कीटक नाशकासोबत 15 लिटर पाण्यामध्ये वापर, जेणेकरून कीटकनाशक रोपांमध्ये योग्यरीत्या शोषले जाईल.
Share

भेंडीच्या प्रत्येक तोडणीला जास्त फळे कशी मिळवावी

  • भेंडीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीपूर्वी 2 आठवडे शेतात एकरी 10 टन जैविक खत घालावे. त्यामुळे रोपांमधील सूक्ष्म पोषक तत्वांची क्षमता वाढते. 
  • पेरणीच्या वेळी, नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या आणि फॉस्फरस विरघळवणाऱ्या जिवाणूंची खतासह 2 किग्रॅ/ एकर मात्रा द्यावी.
  • नायट्रोजनची 60-80 किग्रॅ/ एकर मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी आणि उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी. त्यामुळे प्रत्येक फांदीवरील फळांची संख्या वाढून उत्पादनात 50% वाढ होईल. 
  • पेरणीनंतर सुमारे 40 ते 50 दिवसांनी भेंडीला फळे लागतात. 
  • पहिल्या तोडणीपूर्वी कॅल्शियम नायट्रेट + बोरॉन @ 10 किग्रॅ/ एकर, मॅग्नेशियम सल्फेट 10 किग्रॅ/ एकर + युरिया @ 25 किग्रॅ/ एकर आणि नायट्रोजन स्थितीकरण करणाऱ्या आणि फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू @ 1 किग्रॅ/ एकर द्यावे.
  • भेंडी फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना अमोनियम सल्फेटची 55-70 किग्रॅ/ एकर मात्रा द्यावी. फळांच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. 
Share

भेंडीमधील तणाचे नियंत्रण

भेंडीमधील तणाचे नियंत्रण

  • पेरणीपुर्वी खोल नांगरणी करावी.
  • पीक चक्र अवलंबावे. त्यासाठी कोणतेही निमुळत्या पानांचे तृणधान्य किंवा लहान दाणे असलेले पीक लावावे.
  • पेरणीनंतर 20, 40 आणि 60 दिवसांनी 2-3 वेळा निंदणी-खुरपणी करावी.
  • पेरणीनंतर आणि अंकुरणापूर्वी ऑक्सीफ्लोरफेन 23.5 ई.सी. @ 200 मिली/एकर फवारावे.
  • पेरणीनंतर 3 दिवसांनी पेंडीमेथलीन 30% ईसी @ 700 मिली प्रति एकर फवारावे.
  • निमुळत्या पानांच्या तणासाठी 2 -3 पाने आलेली असल्याच्या अवस्थेत प्रोपाक्विजाफाप 10 % ईसी @ 400 मिली प्रति एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी

भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी

  • फळांची लांबी सर्वाधिक होते तेव्हा त्यांची तोडणी करतात. तोडणी करताना फळे कोवळी आहेत याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
  • 6 ते 8 सेमी लांब फळे निर्यातीस उपयुक्त असतात.
  • भेंडीच्या फळांची तोडणी सामान्यता धारदार चाकू किंवा वाकड्या हुकसारख्या सुरीने केली जाते.
  • भेंडीच्या झाडांवर टोचणारे रोम असतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी सूती कपडे आणि हातमोजे वापरावेत.
  • शक्य असल्यास तोडणी सकाळी लवकर करावी.
  • रात्री भेंडी ठेवावी लागल्यास पाणी शिंपडल्याने ती सकाळपर्यंत ताजी राहील.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीवरील केवडा रोगाचे नियंत्रण

भेंडीवरील केवडा रोगाचे नियंत्रण:-

  • हा रोग श्वेत माशी नावाच्या किडीमुळे होतो.
  • भेंडीच्या पिकाच्या सर्व अवस्थात हा रोग होतो.
  • या रोगामुळे पानांच्या शिरा पिवळ्या पडतात.
  • शिरा पिवळ्या पडल्यावर पाने मुडपतात.
  • रोगग्रस्त फळे फिकट पिवळी, विकृत आणि कडक होतात.

नियंत्रण:-

  • विषाणूग्रस्त रोपे आणि रोपांचे भाग उपटून नष्ट करावीत.
  • परभणी क्रांति, जनार्दन, हरिता, अर्का अनामिका आणि अर्का अभय अशा काही जाती व्हायरससाठी सहनशील असतात.
  • रोपांच्या वाढीच्या वेळेस उर्वरकांचा अतिरिक्त वापर करू नये.
  • शक्यतो भेंडीची पेरणी वेळेपूर्वी करावी.
  • शेतीत वापरली जाणारी सर्व अवजारे स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे उपकरणांच्या द्वारे रोगाचा प्रसार होणार नाही.
  • या रोगाने ग्रस्त पिकांसोबत भेंडीचे पीक घेऊ नये.
  • श्वेत माशीच्या नियंत्रणासाठी -5 चिकट सापळे रचावेत.
  • डाइमिथोएट 30% ई.सी. 250  मिली /एकरचे पाण्यातील मिश्रण फवारावे.
  • इमिडाइक्लोप्रिड 17.8% SL 80 मिली /एकरची मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीच्या पिकासाठी सिंचन

भेंडीच्या पिकासाठी सिंचन:-

  • पहिले सिंचन पाने फुटण्याच्या वेळी करावे.
  • उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • तापमान 400C असल्यास थोडे थोडे सिंचन करत राहावे. त्यामुळे मातीतील ओल टिकून राहील आणि उत्तम फलधारणा होईल.
  • पाणी साचणे किंवा रोपे सुकवणे टाळावे.
  • ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) पद्धतीने 85% पर्यन्त पाणी वाचवता येते.
  • फल/बीजधारणा होताना दुष्काळी परिस्थिति असल्यास पिकाची 70% पर्यन्त हानी होते.

नीचे दिए गए बटन पर क्लिक करके अन्य किसानों के साथ साझा करें।

Share

Control of Yellow Mosaic Disease in Okra

  • रोगाचा दुय्यम प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त पाने खुडून/ रोपे उपटून नष्ट करा.
  • परभणी क्रांती, जनार्दन, हरिता, अर्का अनामिका आणि अर्का अभय या जाती पीत चित्रन्यास (केवडा) रोग प्रतिकारक आहेत.
  • रोपांच्या वाढीच्या अवस्थेत उच्च खते वापरू नका.
  • विषाणूचे वाहक असलेल्या अन्य पिकांबरोबर भेंडीची लागवड करू नका.
  • शक्य असल्यास, पीत चित्रन्यास (केवडा) रोगाचे नियंत्रण करण्यासाठी लवकर लागवड करा.
  • पिकात वापरली जाणारी उपकरणे स्वच्छ राखा.
  • श्वेत माशीचा प्रसार रोखण्यासाठी एकरी 4-5 चिकट सापळे वापरा.
  • श्वेत माशीचे नियंत्रण करण्यासाठी इमॅक्लोप्रिड 17.8% एसएलची मात्रा 80 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 
  • डिमेथोएट 30% ईसीची  मात्रा 250 मिलि/ एकर या प्रमाणात पाण्यात मिसळून वापरा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Yellow Mosaic Disease in Okra/Bhindi

  • रोपांच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत शेतामध्ये संसर्ग होऊ शकतो.
  • पानांच्या कडांमधील शिरांचे संपूर्ण जाळे पिवळे होणे हे या रोगाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
  • संसर्ग तीव्र असताना कोवळी पाने पिवळी पडतात, त्यांचा आकार लहान होतो आणि रोपांची वाढ मोठ्या प्रमाणात खुरटते.
  • फुलोरा आणि फळे आल्यास संसर्गामुळे त्याला मर्यादा पडतात. फुले आणि फळे लहान आणि कडक असतात.
  • रोगग्रस्त रोपांना आलेली फळे पिवळी किंवा पांढरी असतात.
  • या रोगाच्या विषाणूचा प्रसार श्वेतमाशीच्या मार्फत होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms and control of Fusarium wilt in Okra

फ्यूजेरियम मर रोगापासून भेंडीच्या पिकाचा बचाव

  • प्रारंभिक अवस्थेत रोप तात्पुरते सुकते पण रोगाचा प्रभाव वाढल्यावर रोप कायमचे सुकते.
  • ग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • बुरशी मूळसंस्थेवर हल्ला करून संवहन उतींवर वसाहत बनवते.
  • त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे वहन थांबते आणि बुरशीच्या विषाच्या प्रभावामुळे संवहन उती आणि कोशिका काम करणे थांबवतात.
  • ग्रस्त रोपाचे खोड कापल्यास मध्यभाग गडद राखाडी रंगाचा दिसतो.

नियंत्रण

  • सतत एकाच शेतात भेंडीची लागवड करू नये.
  • कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2-3 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे किंवा थायोफनेट मिथाइल 45% WP + पायरक्लोस्ट्रोबिन 5% FS @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • थायोफनेट मिथाइल 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डेफ़नकोनाज़ोल 11.4% एससी @ 200 मिली/ एकर वापरावे.
  • जैविक प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा विरिडीने ड्रेंचिंग आणि पानांवर फवारणी करावी. त्याचा वापर पिकातील जवळपास सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share