कृषी व्यवसायासाठी 20 लाख कर्जावर 8.8 लाख अनुदान, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सुशिक्षित तरुणांना शेतीत आणण्याकरीता सरकार बरेच प्रयत्न करत आहे. आता केंद्र सरकारने शेतीशी संबंधित व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना जोडण्यासाठी योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे.

अर्ज करणा-या व्यक्तीला स्वतंत्रपणे 20 लाख रुपये आणि पाच जणांच्या गटाला एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. सामान्य श्रेणी अर्जदारांना या कर्जावर 36 टक्के तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला अर्जदारांना 44 टक्के अनुदान देण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला 45 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणानंतर, जर व्यक्ती या कर्जास पात्र ठरली, तर नाबार्ड त्याला कर्ज देईल. या योजनेत सामील होण्यासाठी या लिंकला भेट द्या.
https://www.acabcmis.gov.in/ApplicantReg.aspx

Share

See all tips >>