या वर्षी पासून वर्षी शेतकऱ्यांना कंबाइन हार्वेस्टरच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे.
शेतकऱ्यांना शेती उपकरणांच्या खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आलेली आहे.
मध्य प्रदेश सरकार आता लघु, मध्यम आणि अनुसूचित जाती जमाती तसेच महिला प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणांच्या खरेदीमूल्याच्या 50 टक्के एवढ्या रकमेचे तर अन्य शेतकऱ्यांना ४० टक्के रकमेचे अनुदान देणार आहे.