- या किडीचा जोरदार प्रादुर्भाव पावसाळ्यापूर्वी होतो.
- त्याची लागण पानांच्या खालच्या पृष्ठभागावर अधिक दिसून येते.
- हे कीटक पानांच्या शिराजवळ अंडी देतात.
- त्याच्या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पाने फिकट पिवळसर होतात.
- या किडीच्या नियंत्रणासाठी प्रॉपरजाइट 57% ईसी 400 ग्रॅम / एकर किंवा स्पैरोमेसीफेंन 22.9% एससी 200 मिली / एकर किंवा एबामेक्टिन 1.9% ईसी 150 मिली / एकरी दराने फवारणी करावी.
- यासह, बवेरिया बेसियानाचा वापर एकरी प्रति 250 ग्रॅमजैविक उपचार म्हणून वापर करा.
वेलवर्गीयपिकामध्ये लाल किडे ओळखणे:-
- लाल कोळी किडे एक मिमी लांब असतात आणि ते नुसत्या डोळ्यांना दिसणे कठीण असते.
- कोळी किडे पानांच्या खालच्या बाजूला वस्त्या बनून राहतात.
- अळ्या तरुण आणि प्रौढ कीटक पानांच्या खालच्या बाजूने भेगा पाडतात.
- ते पानांच्या पेशीतील रस शोषून घेतात त्यामुळे वेल आणि पानांमध्ये पांढऱ्या रंगाचे डाग तयार होतात
Soil requirement for muskmelon
खरबूजाच्या शेतीसाठी उत्तम माती:-
- खरबूजाची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते.
- त्यासाठी रेताड दोमट मृदा सर्वोत्तम असते.
- मातीत पाण्याचा निचरा उत्तम व्हावा आणि कार्बनिक पदार्थ भरपूर असावेत.
- मातीचा पी.एच. स्तर 6.0 ते 7.0 असल्यास उत्पादन अधिक होते आणि फळांचा स्वाद देखील वाढतो.
- मातीचे तापमान 15° सेंटीग्रेडहून कमी झाल्यास बीजाची वाढ आणि रोपाचा विकास खुंटतो.
- लवण आणि क्षारीय जमीन खरबूजाच्या शेतीसाठी उत्तम समजली जात नाही.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareManagement of Red Spider Mites in Cucurbitaceae
भोपळावर्गीय पिकांवरील लालकोळी किडीचा बंदोबस्त:-
कशी ओळखावी:-
- लालकोळी कीड 1 मिमी. लांब असते. तिला डोळ्यांनी सहज पाहता येत नाही.
- लालकोळी कीड पानांच्या खालील बाजूस झुंडीने राहते.
- लालकोळी कीडीच्या एका वसाहतीत 100 पर्यन्त किडे रहातात.
- अंडी गोल, पारदर्शक आणि फिकट पिवळ्या पांढर्या रंगाची असतात.
- वयात आलेल्या किडयाचे आठ पाय असतात. शरीर अंडाकार असते आणि डोक्याच्या बाजूला दोन लाल नेत्र बिंदु असतात.
- मादीच आकार नराहून मोठा असतो आणि तिच्या शरीरावर खोल चट्ट्यासारखा आकार असतो. शरीर कठोर आवरणाने झाकलेले असते.
- अंड्यातून निघालेल्या लार्वाला फकटा सहा पाय असतात.
हानी:-
- लार्वा, लहान किडे आणि वयात आलेले किडे पानाची खालची बाजू फाडून खातात.
- लहान किडे आणि वयात आलेले किडे पाने आणि अंकुराचा कोशिका रस शोषतात. त्यामुळे पाने आणि अंकुरावर पांढरे डाग पडतात.
- अधिक प्रसार झाल्यास पानाच्या खालील बाजूस जाळे विणून त्यांना हानी पोहोचवतात.
नियंत्रण:-
- सकाळी सूर्योदयापूर्वी पानांच्या खालील बाजूस निंबाचे तेल शिंपडावे.
- प्रोपारजाईट 57% EC 3 मिली प्रति लीटर पाणी या मात्रेला 7 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareDowny Mildew in Cucurbitaceae
भोपळावर्गीय पिकांमधील केवळा (डाऊनी मिल्ड्यु) रोग:-
- पानांच्या खालील भागावर पाणी भरलेले डाग उमटतात.
- पानांच्या वरील भागावर कोणीय डाग उमटतात तसेच पानांच्या खालील भागावर देखील उमटतात.
- सर्वात आधी डाग जुन्या पानांवर उमटतात आणि नंतर हळूहळू नवीन पानांवर उमटतात.
- रोगग्रस्त वेलांवर फलधारणा होत नाही.
नियंत्रण:-
- रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करा.
- रोगप्रतिरोधक जातीचे बियाणे वापरावे.
- मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. च्या मात्रेची पानांच्या खालील भागावर फवारणी करावी.
- पीक चक्र वापरुन आणि शेताची साफसफाई करून रोगाची आक्रमकता आटोक्यात येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareRed Pumpkin Beetle in Cucurbitaceae
भोपळावर्गीय पिकावरील लाल कीड:-
ओळख:-
- अंडी गोलाकार, पिवळ्या- गुलाबी रंगाची असून थोड्या दिवसांनी नारंगी रंगाची होतात.
- अंड्यांमधून निघणारा नवा लार्वा मळकट पांढर्या रंगाचा असतो. परंतु वाढ झालेला लार्वा 22 सेमी. लांब आणि पिवळट क्रीम रंगाचा असतो.
- प्यूपा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. तो जमिनीत 15 ते 25 मिमी. खोल असतो.
- पूर्ण वाढ झालेले किडे 6-8 मिमी. लांब असून त्यांचे पंख चमकदार पिवळ्या लाल रंगाचे असतात आणि ते संपूर्ण शरीर झाकतात.
नुकसान:-
- अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीला टेकलेल्या फळांना खातात.
- त्यानंतर ग्रस्त मुळे आणि भूमिगत भागांवर मृतजीवी बुरशीचा हल्ला होतो. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
- किड्यांनी हल्ला केलेली फळे खाण्यास अयोग्य असतात.
- किडे पानांना खाऊन भोके पाडतात.
- रोपाच्या अवस्थेत वेली असताना किड्यांचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानि पोहोचवतात. त्यामुळे रोपे मरतात.
नियंत्रण:-
- खोल नांगरणी करण्याने जमिनीतील प्यूपा आणि ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
- बीजाला अंकुर फुटल्यावर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पसरावेत.
- किड्यांना एकत्र करून नष्ट करावे.
- साईपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2 मि.ली. प्रति लीटर पाणी या मात्रेची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्रॅम प्रति ली पाण्याचे मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 15 दिवसांनी आणि दुसरी फवारणी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share